Pradnya Tambe-Borhade

Inspirational

3  

Pradnya Tambe-Borhade

Inspirational

अंतर नात्यातले

अंतर नात्यातले

4 mins
215


आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने सतत आपल्या भोवती असावे असे संजयला सतत वाटत असायचे. संजय आणि सीमा काॅलेज पासून एकमेकांच्या प्रेमात होते. दोघे ही उच्चशिक्षित ,आवडही सारखीच त्यामुळे प्रेम हे दिवसेंनदिवस बहरतच चालले होते. काॅलेजमध्ये मित्र-मैत्रिणींनी वहिनी, जिजू चिडवायला सुरवात केली होती.


एकमेकांना चिडवणा-या नावाने दोघे आणखी लाजत होते. सीमा बोलकी होती. तीच्या बोलण्याने ती अनेक माणसांशी जोडली गेली होती. संजय मात्र मोजकेच बोलायचा. सीमाला जेवढ्या मुली मैत्रिणी म्हणून लाभल्या तितकेच मित्रही जिवाभावाचे लाभलेले. त्यातलाच एक मित्र संजय होता. संजयला सीमाने काॅलेजच्या प्रोजेक्ट मध्ये मदत केली होती. तेव्हाच संजय सीमाच्या आणखी जवळ येऊन प्रेमाची कबुली दिली. सीमाने होकार दर्शवला.


संजय कोणतेही काम मनापासून आणि निष्ठेने पूर्ण करतो यावर सीमाचा विश्वास होता. दोघांचे फोनवर बोलण्याचे प्रमाण देखील वाढले. प्रेमात असल्याने सीमा आता सगळ लक्ष आपल्यकडेच देणार असे संजयला मनोमन वाटत होते. पण सीमाचा स्वभाव सगळ्यांशी हसून खेळून राहणे. ती इतर मित्रांशी पण आधी सारखेच बोलायची.


संजयने सीमाला सुनावले तूझ माझ्यावर खरच प्रेम आहे ना??? तू मला वेळ देत नाही. सतत आपल्या ग्रुपच्या मित्र-मैत्रिणींना वेळ देते. सीमा यावर बोलते. संजय मी आधी ही अशीच होते आणि आता ही अशीच आहे. तूला का??? असे वाटते. माझ तूझ्यावर आहे प्रेम.


दोघांमध्ये वादाचे प्रमाण वाढू लागते. काही दिवसांकरता एकमेकांपासून दूर राहूया शांत झाल्यावर जर एकमेकांबद्दल प्रेमाची भावना आहे तशीच राहिली तर सरळ लग्न करायचे. सीमा नेहमीप्रमाणेच जीवन जगत होती. संजयला मात्र सीमाची आठवण येत होती. आपण किती चूकीचे वागलो याची जाणीव झाली.


संजयला चूक समजली आपल जरी सीमावर नितांत प्रेम असले तरी तीला तीच्या पद्धतीने कोणाला किती आणि कसा वेळ द्यायचा हा तिचा वयक्तिक प्रश्न आहे. प्रेमात कोणतेही बंधन नसाव.नाहीतर ते बळजुबरीने ओढवून घेतलेले नात वाटू लागते.


सीमाला तीच्या आयुष्यात जगण्याची स्पेस द्यायला हवी. संजय समजूतदार होता. दोघे काही कालावधी करता दूर झाले खरे. पण एकमेकांशी जोडले गेले ते आयुष्यभराचा जोडीदार म्हणून.


संजय सीमाला भेटला ते आई-वडिलांना बरोबर घेऊनच. सीमाला याचा आनंद झाला. दोघांचे लग्न थाटामाटात पार पडले. दोघांनी सुखी संसारात पदार्पण केले.

आयुष्यात कशाचीही कमतरता नव्हती. सीमाने घरातल्यांना आपलेसे केले होते. तिचा हाच स्वभावाच संजयला आवडत होता.


दुधात साखर म्हणावी तसे काहीसे घडले सीमाने गोड बातमी दिली. आपल्या बाळा बाबत दोघे स्वप्न पाहू लागले. राजबिंड आयुष जन्माला आला. त्याच्या अवतीभवती आता संजय आणि सीमाचा जग घुटमळत होते. आयुषचे लाड पुरवत संजयने आयुषला उत्तम शिक्षण देखील दिले. सीमा आयुषला आवडीचे पदार्थ बनवून देत असायची. आयुषला अभ्यासतही मदत करायची.


आयुष आता नामांकित कंपनी मध्ये रिसर्च डिपार्टमेंट ला काम करत होता. चांगल्या पगाराची नोकरी आणि आई-वडिलांचा आदर्श मुलगा म्हणून आयुषची ओळख सगळ्यांनाच ज्ञात होती. आयुषचे ही लग्न करुन त्याच्या संसाराची स्वप्ने संजय आणि सीमा पाहू लागले.


नात्यातली नेहा आणि आयुषचा जोडा उत्तम दिसतो. नेहाला पाहण्या साठीचा कार्यक्रम फिक्स झाला. दोघांची पसंती झाली. आयुषच्या लग्नात सीमाने चांगलीच हौस करुन घेतली. हळदीला, साखरपुडा, लग्नाला आणि रिसेप्शन करता चार साड्यांची खरेदी केली. लग्नाच्या सोहळ्यात चांगलेच चमकून घेतले सीमाने.


पुढे घडले ते काही निराळेच....


आयुष्यात सगळ सुरळीत चालू म्हणजे दैवी देणगी नाही का??????


नेहाला घरातल्या कामची फारशी सवय नव्हती. तीला जेवण बनवता येत नव्हते. सीमाने हळूहळू सर्व शिकवले. तीन महिने कसे गेले समजलेच नाही. आता जेवण नेहा बनवू लागली. पण आयुषला आईच्या हातचेच आवडायचे. तो आईला तू मला डबा देत जा. नेहाला नको त्रास लवकर उठायचा. नेहाला कळून चूकले आपण बनवलेले आयुषला आवडत नाही.


छोट्या मोठ्या कारणांवरून वाद होऊ लागले. सीमाला मुला विषयी प्रेम होते. लग्ना नंतर नेहा त्याच्या आयुष्याची जोडीदार आहे. आपण आपल लक्ष कमी केले पाहिजे. दोघांना त्यांची स्पेस देणे गरजेचे आहे हे तीला काॅलेज मधल्या त्या काही दिवसांकरता संजय पासून दूर राहिल्यावर संजयला आपल्या बद्दल असेच वाटले असणार याची जाणीव होते.


आपल प्रेम तर असतेच पण जास्त ही त्यावर बंधन येऊन त्याच्या आयुष्यात द्विधा परिस्थिती उत्पन्न होऊ नये. प्रत्येकाला त्याच्या जीवनात स्वत:ची अशी स्पेस देणे हितावह आहे.


वेळीच संजयला काॅलेजच्या दिवसांत आणि सीमाला आयुषच्या संसारात स्पेस बद्दलची जाणीव झाली ती होणे गरजेच आहे.


पुढे आहे अजून लेख..... , संपला नाही.


सीमा आयुषला डबा द्यायच्या वेळी नेहाला सांगून योगा क्लासला जावू लागली. नेहा डबा देण्यासाठी यु ट्यूब वरुन भाज्यांची रेसिपी शोधू लागली. नेहा च्या हाताला आता छान चव आली होती. दोघे एकत्र गप्पा आणि सुखाने राहू लागले. सीमा आणि संजय हे घरात अनुभवत होते.


आयुष्यात सुखाचे क्षण स्पेस दिल्याने घडले. प्रेम आहेच तसेच असते. त्याच्यात तिळमात्र ही बदल घडत नाही. प्रेम कधी कमी होत नसते. एखाद्या बद्दलच्या भावना आहे तश्याच राहतात.


लेख आवडल्यास फाॅलो आणि कमेंट नक्की करा. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नक्कीच नाही. सदर लेखाशी काही बाबी जुळत असल्यास योगायोग समजावा. त्रूटी आढळल्यास क्षमस्व.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational