Pradnya Tambe-Borhade

Children

3  

Pradnya Tambe-Borhade

Children

पाय टिकू दे घरात

पाय टिकू दे घरात

2 mins
146


रिया आणि मोहन चे नुकतेच लग्न झाले होते. रिया नोकरीला असल्याने आठ तास घराबाहेर असायची. स्वयंपाकात फारशी आवड नसणारी रिया शनिवार, रविवारी मात्र सासरी असल्याने स्वयंपाक घरात जावून किचन मध्ये सासूबाईंना मदत करत असे. पण ते ही भाज्या, मिरची, कांदा चिरुन देणे एवढे काम आवरले की मोहनला घेवून वीकेंड म्हणून बाहेर फिरायला घेवून जात असायची.


कधी खरेदी च्या निमत्ताने तर कधी किराणा , भाज्या आणायला म्हणून जाणारी रिया घरात क्षणभरही थांबत नसयची. कस होणार हिचं असा प्रश्न मोहनला मात्र सतावत होता. सुमेधा मोहनची बहिण गरोदरपणासाठी माहेरी आली होती राहायला. तीला सारखं घराजवळ किंवा घरात थांबलेल पाहून न राहवून रिया सुमेधाला बोलते, "ताई तुम्हांला कस थांबवतयं घरात. कंटाळा नाही येत का. मला तर एक क्षण देखील घरात थांबता येणार नाही.


सुमेधा : आत्ता नाही पण... मुल झाल्यावर घराबाहेर जाण आपोआप बंद होत. गरोदर पणात काळजी घेत सर्वजण बाळ आणि आईच्या सुरेक्षाकरता सतत आजूबाजूला असतात. ते सांगतात तसे वागणे आपल्या हिताच ठरते. पहलीच वेळ असते. रिया तुलाही गरोदरपणात तू आत्ता जेवढी घराबाहेर असते. त्या उलट घरात थांबून आराम करावा लागणार आहे. तेव्हा तरी थांबशील ना घरी.


रिया : ताई, त्या गोष्टीला अजून वेळ आहे. मी संध्याकाळी खाऊगल्लीतून येणार आहे. तुमच्यासाठी काय घेवून येवू खायला.


सुमेधा : काजूकतली आणि आंबा बर्फी घेवून ये.


रिया : काळजी घ्या ताई. येते मी आता.


सुमेधा काही दिवसातच गोंडस बाळाला जन्म देते. काही महिन्यांनी ती सासरी निघून जाते. या महिन्यांमध्ये रियाला त्याबाळा बरोबर खेळण्याची, सतत त्याच्या अवतीभवती असण्याची सवय झाली होती. ऑफिसमधून घरी लवकर येवून बाळाबरोबर वेळ घालवायला तीला आवडू लागले होते. घराबाहेर न जाता ती आता घरात जास्त वेळ थांबू लागली होती. घरात ऑफीस काम न करता घरच्यांना वेळ देवू लागली. सासू, नंदे बरोबर गप्पांमध्ये रमू लागली. हे पाहून मोहन सुखावत होता. घरच्यांना रियाने आणि रियाने घरच्यांना ख-या अर्थाने आपलेसे केले आहे.


सुमेधा सासरी निघून गेल्यावर परत रिया पूर्वीसारखी वागू लागली. रियालाही मातृत्वाची आता ओढ लागली होती. काही दिवसातच रियाने गोड बातमी दिली. आता पहिल्यासारखी धावपळ करता नाही येणार तुला. विश्रांती घ्यावी लागेल. मोहन सांगू लागला. आणखी एक रिया, " आता तरी घरात थांबशील ना. गरोदरपणात अस सारखी धावपळ आणि घराबाहेर पडता येणार नाही. सुमेधा ताईचे पाहिले ना तू.


रिया : हो. बाळाला कधी पाहते. आणि कधी खेळते त्याच्याबरोबर अस झाले आहे मला. मी करेल बंद घराबाहेर जाणे. मी घेईल काळजी बाळाची. धावपळ देखील करणार नाही.


लेख कसा वाटला फाॅलो आणि कमेंट करुन नक्की सांगा. जेव्हा एखादी घटनेची ओढ निर्माण होते, तेव्हा कोणत्याही गोष्टी सहन करायला मन आपोआप तयार होत असते हो ना...... रिया सारखे. अश्याच घटना तुमच्या बाबत देखील घडल्या असतील. कमेंट करुन मला नक्की कळवा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Children