Pradnya Tambe-Borhade

Romance

3  

Pradnya Tambe-Borhade

Romance

अनपेक्षित गिफ्ट

अनपेक्षित गिफ्ट

2 mins
146


सोहम मेहनती मुलगा. घराची जबाबदारी सांभाळून नोकरी करत असे. लग्नाकरता योग्य वय झाल्याने सोहमचे लग्न ठरवण्यात आले. रिया त्याला साजेशी पत्नी लाभली. सोहम शिक्षण करता घरापासून बाहेरगावी होता. त्याला सणांचे महत्व फारसे नव्हते. आला दिवस शिक्षण आणि मिळणा-या छोट्या - मोठ्या नोकरी करण्याकडे घालवत असे. परिस्थिती जरा बेताचीच होती. म्हणून पैसे खर्च करण्यापेक्षा तो कमावण्याकडे कल जास्त असायचा. स्वत:ची आवड कधी त्याने जोपासली नाही.


शिक्षण बाहेरगावी असले तरी शिक्षणा बरोबर हाताशी नोकरी सांभाळत दर महिन्याला पैसे कुरिअरने पाठवत असे. महिन्याभराची सुट्टी घेवून तो घरी जात असे. शिक्षण पूर्ण करुन रिया सोबत संसार सुरु झाला. रियाच्या पावलांनी लक्ष्मीच घरा आली. सोहमला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. रिया देखील उच्च शिक्षित असल्याने दोघे ही नोकरी करत होते.


रिया नोकरी सांभाळून घर अगदी स्वच्छ, टापटिपीत ठेवत असे. तीला वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा छंदच जडलेला होता. सोहमला देखील आता घरचे आणि बायकोच्या हातचे खमंग पदार्थ खायला मिळत असायचे. रियाच्या घरी सण येणार म्हटले कि सकाळी लवकर उठून फरशी पुसून लख्ख करणार. पुरणपोळीचा बेत घरात होणार हे ठरलेलं. देवाची पूजा करुन रांगोळीचा गालिचा देखील काढायची. घरात प्रसन्न वातावरण, अगरबत्तीचा दरवळणारा मंद सुवास. सोहमला रियाच्या वागण्याचे नेहमी कौतुक वाटायचे. आजच्या जमान्यात असूनही रिया सण, उत्सव पारंपारिक पद्धतीने पार पाडते.


लग्नानंतरचा पहिला वाढदिवस रियाने सोहम च्या आवडीचे गुलाबजाम, पनीरची भाजी, कांदा भजी,पुरी असा मस्त बेत आखला होता. सोहमला नेमकी त्या दिवशी काम होते. सकाळी जेवण करुन तो कामावर गेला. रियाने नातेवाईक आणि सोहमच्या मित्रांना फोन करुन वाढदिवसाकरता आमंत्रण दिले. सर्वांना हाॅटेला संध्याकाळी यायला सांगितले.


सोहम घरी आल्यावर रियाने बाहेर जावूया थोड. असा हट्ट करुन हाॅटेलला घेवून गेली. हाॅटेलच्या बाहेर सर्व नातेवाईक आणि मित्रांना पाहून सोहम खूप खूश होतो. त्याचा विश्वासच बसत नाही एवढे सगळे कधी आणि केव्हा आले असतील. कळवले नाही की बोलले नाही. खरतर हाॅस्टेलनंतर मित्रांना भेटण्याचा कालावधी दोन वर्षांचा होता. आणि आज वाढदिवशी त्यांची होणारी भेट लाखमोलाची वाटली. किती बोलू आणि किती नाही अशी अवस्था सोहमची झाली होती.


हाॅटेलमध्ये जावून केक कापण्यात आला. पुष्पगुच्छ, टाळ्यांचा स्वागतात वाढदिवस साजरा झाला. एक क्षण रियाकडे पाहून हा मिळणारा सुखद धक्का केवळ तुझ्यामुळेच शक्य झालं अस मनात बोलून सोहमचा आनंद डोळ्यात मावेना. यानंतर सर्वांसोबत फोटो, मनसोक्त गप्पा मारत वाढदिवसाचा क्षण डोळ्यात साठवला. घरी आल्यावर रियाला या मोठं सरप्राईज बद्दल खूप छान आणि आनंद झाला अस बोलला. रियाने सारं सोहमच्या डोळ्यातून वाहणा-या अश्रूंतून केव्हाच हि गोष्ट हेरली होती.



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance