STORYMIRROR

Pradnya Tambe-Borhade

Fantasy

3  

Pradnya Tambe-Borhade

Fantasy

पुरे झाले हो

पुरे झाले हो

3 mins
187

नीरज आणि उर्वी नोकरी मुळे घरापासून लांब दुस-या शहरात राहत होते. उर्वी उच्च शिक्षित होती परंतु त्या शहरात मनासारखी नोकरी मिळत नाही. लग्ना नंतरही आपल्याला नोकरी करता येईल का???? या विचाराने उर्वीने काही महिने नोकरी केली. तीला ते जमले देखील. पण...., शिक्षणाच्या तुलनेत काम आणि पगाराची योग्य सांगड काही जमत नव्हती. उर्वीने घरी राहूनच काही काम करता येईल का याचा विचार करु लागली.


संसार नव्यानेच सुरु झाला होता. उर्वीला स्वयंपाक घरातली जेमतेम ओळख पटलेली. हळूहळू ती शिकत होती सगळे. आता संसारात उर्वीच मन रमू लागले. पण काय हे घरातले सगळे काम मीच करत आहे. अहो..., थोडी फार मला मदत करत जा. रोज नाही म्हणत मी, निदान सुट्टीच्या दिवशी तरी मला मदत करत जा. ऐकू येवूनही न ऐकल्यासारख करत नीरज तिथून जात असे.


घरी उर्वीचे सासू-सासरे राहायला येतात. नीरज मात्र त्यांच्या समोर उर्वीला मदत करत असे. त्यांच्या समोर मुद्दाम साफ - सफाई करुन दाखवत असे. मी किती मदत करतो हे आई-बाबांना दाखवत असावा. उर्वीला हे सगळे लक्षात येत होत. पण बोलायचं कस. आता तर हद्द झाली, जेवलेली ताटे गोळा करुन, पुसून झाडून काढणे चालू होते. इतक्यात उर्वी, " बास, पुरे झालं आता. असं म्हणताच तीचे लालबुंद डोळे पाहून क्षणभर नीरज घाबरला.अस तीचा पारा चढलेल रूप नीरजने पहिल्यांदाच पाहिल होतं." काय ग, काय झालं तुला.


उर्वी घरात सांगते, आम्ही जरा शतपावली करुन येतो. असे म्हणत नीरजला बाहेर यायला सांगते. ( आई- बाबा थोडे घाबरले होते.भांडण करतात की काय आता दोघे. ) "उर्वी बोलायला सुरवात करते, "काय हो.... एरव्ही कधी काम सांगितलं की करायचं नसतं तुम्हांला." आज आई-बाबा आले आहेत तर अस काम करताय जस कि रोज घरी तुम्ही मला मदत करताय. खोट वागून अस काय मिळणार तुम्हांला.


नीरज उर्वीला बोलतो, " अग मी हात जोडतो. आईने मला आपण घर सोडून निघताना सांगितले होते. उर्वीला मदत करत जा. एकटीवर सगळे घरातले काम टाकत जावू नकोस. दोघांनी मिळून काम करत जा. नोकरी मुळे

मला तसा वेळ मिळालाच नाही तुला मदत करण्यासाठी. पण...., खर सांगू का.... किती काम असत तुला घरी, उर्वी. तुझ्या मनाला मी आजपर्यंत कधी जाणलचं नाही. तुलाही घरातल्या कामाची सवय नाही. आई ने कदाचित या करता मला सांगितले असावं. मला आज काम करताना तुझी मन:स्थिती, त्यावेळी होणारी चिडचिड आज कळते आहे.


मी वचन देतो. यापुढे मी घरातली कामे नक्की वेळात वेळ काढून करणार. दिवसातून एक काम तर नक्की करणार.


अहो.... कळाल्या भावना तुमच्या मला. रोज नाही हो करा म्हणत काम मी. कधी थकवा आलाच तर त्यावेळी मी तुम्हांला आवाज देत असते. मलाही अनुभव आहे. नोकरी करुन दिवसभर मानसिक तणावाखाली वावरत असताना मनाची अवस्था काय होते. त्यातून घरातही कामच करायचं का??? अस वाटत असणार तुम्हांला. माझं बोलणं इतकचं आहे. जेव्हा मला थकवा किंवा एखाद काम होत नाहीये तेव्हा तुमच्या मदतीची गरज असते मला.


हो ग. केव्हाही सांग मला. आई-बाबा येण्याचं निमित्त का असेना, मला तुझं आणि तुला माझं मन ओळखता आलं. आणि जास्त चांगल हे झालं त्यात कि, तू बोलली बास पुरे झालं आता. यामुळे आपण दोघे शतपावली करायला आलो आणि मनाने आणखी जवळ आलो.


पुरे...., झाली मस्करी. चला आता घरी. नाहीतर आई-बाबा बोलतील. आपण आलो तर हे दोघे कुठे जाऊन बसले. हसत-हसत दोघे घरी परत येतात.


प्रश्नार्थक चिन्ह???? चेह-यावर घेऊन गेलेले नीरज आणि उर्वी आता मात्र चेह-यावर गोड हसू घेऊन आले होते.


आई-बाबांनी तर..... नीरज आणि उर्वी कडे पाहून सुटकेचा नि:श्वास टाकावा असे भाव चेह-यावर तरंगले होते.

नीरज ने पानातली आईसक्रीम आणायला लांब चालत गेलो होतो म्हणत , उशीरा येण्याची आपली बाजू सावरत आईसक्रीम खात गप्पांच्या वर्षावात दिवस आनंदाने व्यतीत होतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy