Pradnya Tambe-Borhade

Action

3  

Pradnya Tambe-Borhade

Action

हे बोल माझ्यासाठी

हे बोल माझ्यासाठी

2 mins
143


प्रीती : आईच्या हातचे खाऊन आता कंटाळा आला. वहिनी आता श्रावण महिना सुरु होणार सण-उत्सवात मला तुमच्या हातचे खायचे आहे.


वहिनी : नक्की. मी मला जस येते तसे नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल.


आई : घ्या आता..., माझ हातच नको का?? आता.


प्रीती : मस्करी करत होते अग मी.


वहिनी : मला तुमच्या हाता इतकी सुगरण चव नाही आई.


आई : एक विचारायचे राहिले, सूनबाई. तू गोळ्या घेतल्या का. श्रावणात पहिल्या रविवारी आपण सत्यनारायण पूजा पकडतो आहे. उगीच नंतर गोंधळ नको व्हायला.


प्रीती : कसल्या गोळ्या??


वहिनी : मासिक पाळी पुढे ढकलण्या करता. घरात पूजा आहे. त्याच दिवशी माझी तारिख आहे.


प्रीती : काही गोळ्या खायच्या नाही. पुढे खूप समस्या उद्भवतात. आई, आता पूर्वी सारख काही राहिले नाही. अश्याप्रकारे गोळ्या खाल्याने पुढे मुल होण्यासाठी अडथळे निर्माण होऊ शकतात. ते दर महिन्याला येणारं चक्र आहे. या करता इतकी चिंता करण्याची गरज नाही.


आई : अग बरोबर आहे तुझ. पण नंतर नागपंचमीला हिला माहेरी जाव लागेल तशीच ती रक्षाबंधन करुन येणार. ती आली की आपल्याला गावी जावे लागेल. अश्यान कधी धरणार आपण पूजा.


प्रीती : आपल्या सोयीप्रमाणे न धरता वहिनीचे पाळी येवून गेली की धरुयात पूजा. या करता उगाच गोळी खायची गरज नाही.


वहिनी : प्रीती ताई...., तुम्ही किती विचार करता. आईंशी मी नाही बोलू शकत. पण तुम्हीं माझ्या मनाच बोलून दाखवल.


प्रीती : हि वेळ आज ना उद्या माझ्यावरही येणार आहे. वेळीच बोलणं गरजेचे आहे. अस गोळ्या घेवून शरीरावर परिणाम होतो. नंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.


आई : लहान असून प्रीती परखडपणे तुझं मत मांडल. आवडल मला खूप बाळा. आमच्या वेळी अस नव्हतं सासूबाई बोलल्या की चूक असो किंवा बरोबर तसे वागणे भाग असायचे. त्या बोलल्या कि तसेच वागाव लागायचे. मनातले बोलण कोणा समोर बोलावं कळत नव्हते. त्यावेळी नंदाशी देखील मोकळेपणाने बोलता येत नसायचे.


तुम्हां दोघींमधले हे अंतर मैत्रिणी आणि बहिणीच्या नात्यात गुंफले आहे. वेळीच जर मी बोलले असते..., तर मला होणा-या त्रासापासून वाचले असते मी. माझ्या लक्षातच आले नाही, माझ्या मुलीला या गोष्टीतून जायचे आहे. तेव्हा तिची सासू तीला अशी बोलली??? माझ्या मुलीने काही न बोलता गोळ्या खाल्या आणि तिला होणारा त्रास मला बघवणार नाही.

तुम्ही दोघी मला माफ करा. सून हि माझी दुसरी मुलगीच आहे.


वहिनी : अस नका बोलू. तू मोठ्या आहात, आई.


प्रीती : तुला या गोष्टींची जाणीव करुन देणे महत्वाच होते. आपल्या हौसे साठी आपण आपल्या सूनांवर नको त्या बंधनात अडकवू नये. पुढे जाऊन काही समस्या त्यांच्या जीवनात आली तर त्यांनाच दोष देत राहतो. हे थांबवायला हव कुठेतरी.


ही घुसमट थांबवायला हवी. वेळीच बोलून दाखवणे गरजेचे आहे. काय वाटते तुम्हांला कमेंट करुन जरुर कळवा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action