शिकवले मज
शिकवले मज
पिंकी घरात जन्म घेवून आली तो दिवस देशपांडे आजीने साजरा करुनच दिला नाही. मोठा मुलगा पहिलच नातवंड हव होत आजीला. पण झाली मुलगी. राघव आणि स्मिता आनंदात होते. पहिली बेटी धनाची पेटी म्हणत पिंकीचे स्वागत केले. राघव दुकानातून बर्फी घेवून आला. देवासमोर त्याने ती बर्फी ठेवली. सगळ्यांना बर्फी वाटायला बाहेर जाणार तेच आजीने देवासमोरची वाटी फेकून दिली. भांडायला उठली. काय एवढा आनंद झाला का तुला?? वाट गावभर मग.
स्मिताला सांग रहा अजून काही महिने माहेरी. नंतरच ये सासरी. राघवला काही कळेनासे झाले. मुलगी काय आणि मुलगा काय शेवटी आमच्याच हाडामासाचा गोळा हे आईला कोण समजून सांगणार. पिंकी गोड गोजिरी होती. तिला पाहताच सगळे दु:ख विसरुन जाव अस वाटत होते. पण आजीला पिंकी विषयी कधीच माया वाटली नाही.
आजीने राघवला सांगितले आता पिंकी तीन वर्षाची झाली. मला नातू हवा.
म्हणून दोघे डाॅक्टर कडे गेले. तर आता तुम्हांला मुल होण्याचे चान्सेस नाहीत असे सांगितले. घरी आल्यावर राघवने आईला सांगितले. आई आता पिंकीच तुझी नात आणि नातू आहे. आजी मात्र रडत राहिली. पिंकीला दोष देत राहिली. अपशकूनी म्हणत पिंकीला नाव ठेवू लागली.
पिंकीला आजी विषयी खूप प्रेम होते. आई च्या मदतीने का होईना पिंकी आजीच्या आवडीचे पदार्थ बनवायला शिकली होती. पिंकी आता शाळेत जायला लागली आजी विषयी मैत्रिणींना भरभरुन सांगायची. पिंकीची आजी आहे तरी कशी हे पाहायला मैत्रिणी घरी आल्या. पिंकी आपल्या आजीविषयी किती भरभरुन बोलते हे देखील सांगितले पण आजीला याचा काहीच फरक पडला नाही.
राघव आणि स्मिता काही दिवसांकरता बाहेर गेले होते. इतक्यात आजी आजारी पडली. तिला अंथरुणातून उठताना मदतीशिवाय चालताच येईना. तरी आजीने उठायच्या प्रयत्नात परत एकदा पडून घेतले. आजीचा मी पणा काही कमी झाला नव्हता. आता काय करावे. पिंकीला आजीचे आवडीचे पदार्थ माहित होते. आजीला ते बनवून ती खाऊ घालू लागली. आजीला चव ओळखीची वाटली. आजीला समजून चुकले म्हणजे पिंकी माझ्यासाठी हे पदार्थ बनवायची तर....., क्षणभर आजीला पिंकीला घट्ट मिठी मारावीशी वाटत होती. पण घराण्याला वंश नाही म्हणून तिच मन खात होतं.
आजी शेवटच्या श्वासापर्यंत पिंकीला अपमानास्पद वागणूक देत होती. वाईट पद्धतीने पिंकीला वागवत होती. पण जेव्हा आजी मृत्यूच्या दारी होती. तेव्हा पिंकीच्या हातानेच शेवटचे जल प्राशन केले आणि जीव सोडला.
