Manisha Awekar

Abstract Tragedy

4.5  

Manisha Awekar

Abstract Tragedy

मैत्री

मैत्री

5 mins
213


सोनल आणि मीनल अगदी लहानपणापासून मैत्रिणी !! मीनल अभ्यासात हुशार तर सोनल खेळ व इतर अॅक्टिव्हिटीजमधे हुशार!! मीनल व सोनल बरोबर अभ्यास करीत. मीनल सोनलला अभ्यासातले जे समजलेले नसे ते समजावून सांगत असे. मीनलचा ओढा खेळाकडे. परीक्षेच्या वेळी मारुन मुटकून अभ्यास करत असे. परीक्षा संपल्यावर मात्र खेळ खेळ अन् खेळ सुरु होई. तेव्हा मात्र मीनलचा नाइलाज होई. आता परीक्षा तोंडावर आल्यावर मीनल म्हणाली, "अगं सोनल अभ्यासाचा गंभीरपणे विचार कर जरा. आयुष्याला दिशा द्यायचे हेच दिवस आहेत. चांगले शिकशील तर चांगली डबल पदवीधर होशील. चांगल्या ठिकाणी नोकरीला लागशील. सारखं खेळखेळ करुन आयुष्याचा खेळखंडोबा का करुन घ्यायचा आहे का? मग सोनल वरमून जाई. ती म्हणाली, "अगं आता मी करीन अभ्यास. अगदी तुझ्यासारखे 75% वगैरे नाही मिळाले तरी मी चांगली पास होईन.


  आज दुपारी बारा वाजल्यापासूनच दोघी अभ्यासाला बसल्या. परीक्षेनंतर All India tournaments होत्या बँडमिंटनच्या. त्याच्या सिलेक्शन गेम्स आज दुपारी होत्या. कॉलेजमधे सुनील गेम्स चँपियन म्हणून प्रसिद्ध!! तो बॅडमिंटनमधे एकदम अव्वल!! ह्यावेळी दोघे बरोबर खेळणार असल्याने सरावही बरोबर करायचे. चार वाजताच सोनलच्या मोबाईलमधे मेसेजेस धडकू लागले. "अगं गेम्स सहा वाजता आहेत. मी पण येणार आहे बघायला. आपले सगळे मित्रमैत्रिणी येणार आहेत चिअरिंगला. आत्तापासून काय चुळबुळ चाललीय तुझी? "अगं आम्हाला ट्रायल घ्यायचीय. काही आडाखे ठरवायचेत खेळाचे. मी निघतीय गं!!" असे म्हणून सोनल निघालीपण. ती सहज बाय करायला नेहमीप्रमाणे खिडकीत उभी राहिली तर खाली उभा असलेला सुनील तिला दिसला. तिने बघून न बघितल्यासारखे केले. सिलेक्शन गेम महत्त्वाची हे खरे असले व आडाखे बांधणेही महत्त्वाचे असले तरी सुनीलने इथे येणे तिला जरा खटकलेच!!


    मनातले मनात ठेवूनच ती आवरुन कॉलेजच्या बॅडमिंटन कोर्टवर गेली. तिथे गेल्यावर सर्वांनी सोनल कधी येणार? असे विचारले. मीनल मनात चमकलीच. चार वाजता निघालेली सोनल गेली कुठे? पण वरकरणी काही न दाखवता, "ती येईल अगं"असे सहजपणे म्हणाली. तेवढ्यात ट्रॅकपँटमधली सोनल व सुनील आल्यावर सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. जाताना तर सोनल सलवार-कमीजमध्ये होती. ती नेहमी त्याच ड्रेसमध्ये खेळायची पण आज टफ फाईट असल्याने आणि सिलेक्शन होणे गरजेचे असल्याने सुनीलनेच तिला ट्रॅकपँट घ्यायला सांगितले. शिवाय All India level ला तोच ड्रेस सक्तीचा होता.


   सुनील गेम्समधे चॅम्पियन व दादा असल्याने त्याने मिक्स्ड डबल्स आधी लावून घेतली. टाळ्यांच्या गजरात दोन्हीही कॉलेजचे खेळाडू आले. होम पीचवर असल्याने सुनील व सोनल खूश झाले. त्यातच त्यांच्या कॉलेजचे मित्र मैत्रिणी असल्याने चिअरिंग पण ह्यांनाच! गेम सुरु होण्यापूर्वी सुनीलने रँकेटच्या इशाऱ्याने तिला पुढे उभे रहायला सांगितले. तिची कोपऱ्यातली बॅकहँड सर्व्हिस प्रतिस्पर्ध्यांना घेणे कठीण जात होते. घेतली तरी कमकुवत परत येत असल्याने दोघे व्यवस्थित आडाख्यांनी खेळत होते.


मीनल एक गोष्ट जाणीवपूर्वक बघत होती. सुरवातीला ज्या जागेवर सोनल उभी होती तिथेच सुनीलने तिला उभे केले होते. फक्त सर्व्हिस करण्यापुरतेच शटल तिच्या हातात यायचे. येणारी सर्व शटल्स सुनील यशस्वी परतवत होता. पॉइंटस घेत होता. Leave it असे म्हणून तिच्यावर अॅटॅक झालेले शटलही मध्ये जाऊन घेत होता. सोनल नुसती उभी होती. हा काय ह्याचा अट्टाहास? मीनलला त्याची तिडीक आली. गेम जिंकली, तरी त्याचा आनंद साहजिकच सुनीलच्या चेहऱ्यावर झळकला.


   येताना सुनीलने कोल्ड ड्रिंकची ऑफरही सोनलने नाकारली. मीनलने तडकून विचारले, "तुम्ही जिंकलात. अभिनंदन! पण अगं ही काय खेळायची पद्धत झाली? 95% खेळ तोच खेळला. तू नुसती सर्व्हिसपुरती. तुलाही खेळू द्यायला हवे होते त्याने." अगं ही गेम स्ट्रँटेजी आहे. ही गेम जिंकायचीच असे ठरवले होते. प्रतिस्पर्धी खूप भारी होते म्हणून आम्ही तसे ठरवले. बॅडमिंटनमध्ये कोणीही शटल घेऊ शकतो. सर्व्हिस नियमाने करावी लागते."


तिला त्यात काही वाटत नाही तर, आपण कशाला जास्त बोला असा विचार करुन मीनल गप्प बसली. आता नो परीक्षा नो अभ्यास त्यामुळे सोनल मीनलच्या भेटी कमी झाल्या. सुनील अन् सोनल झपाटल्यासारखे सराव करु लागले. लेडीज डबल्सची पण मॅच होती पण सुनीलचा जोर मिक्स्ड डबल्सवर होता. तिची पार्टनर प्रँक्टिसला यायची पण एखादीच गेम तिला खेळायला मिळायची. तिला ह्या असल्या राजकारणाचा राग येऊन तिने आपले नाव काढून टाकले. त्यावेळीही मीनलने सोनलला खूप समजावले. "अगं तुमच्या टूर्नामेंटस गुवाहाटीसारख्या लांबच्या ठिकाणी. अशावेळी तुझ्याबरोबर मैत्रीण असणे हिताचे आहे." पण खेळाच्या नादात डुबलेल्या सोनलला काहीच समजत नव्हते.

 

  शेवटी मीनलने खेळालाच हात घालून म्हटले, "अगं ती न आल्याने तुमचे डबल्सचे विजेतेपद जाते आहे, त्याचे काय?" "अगं पुरुषांच्या डबल्सपण नाहीच आहेत."म्हणजे सुनीलचा खेळाडू मित्र येणार नाही?" मीनलने घाबरुन विचारले. "अगं ते बरोबर सायकल चालवत असताना त्याचा मित्र पडला. त्याच्या पायाला फ्रॅक्चर आहे." ह्या धोरणी सुनीलने दोन्हीही पत्ते कट करुन चांगला डाव मांडला आहे. तो मित्र खरंच पडला का सुनीलने त्याला मुद्दाम पाडले? अशी शंकाही तिच्या मनाला चाटून गेली. सोनल व सुनीलची जवळीक मीनलला खटकली. तो सज्जन अभ्यासू मुलगा असता तरी चालले असते, पण हा भयंकर डॉमिनेटींग मवाली मुलगा! कसं सोडवायचं हिला त्याच्या जाळ्यातून?

   

गुवाहाटीला खरेतर कॉलेजतर्फे चौघेजण जाणार होते. धोरणीपणाने सुनीलने दोन पत्ते कट केले. आता सोनल व सुनीलच जाणार असे ठरले. ठरल्याप्रमाणे दोघे जण खेळण्यासाठी कॉलेजतर्फे रवाना झाले. सर्वांनी शुभेच्छा बेस्ट ऑफ लक दिले. लॉटसप्रमाणे गेम्स झाल्या. ठरलेल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे खेळल्याने दोघे विजयी झाले. तिला वाटले उद्या निघायचे. तिने आपले कपडे आवरायला सुरवात केली. "आपले तिकीट चार दिवसांनंतरचे आहे." थंडपणे सुनीलने सांगितले. "काय?" सोनलला अगदीच अनपेक्षित!


"अगं माझे नातेवाईक शिलॉंग चेरापुंजीला असतात म्हणून मीच प्राचार्यांची परवानगी घेऊन चार दिवसांनंतरचे तिकीट काढले आहे."

"अरे पण हे सर्व तू मला पुण्यात सांगायचेस ना! मी आईला तशी कल्पना दिली असती.

"आपण आईला फोन करु", सुनील बेपर्वाईने म्हणाला.


   त्याने सापळातर बरोबर रचला होता. शिलॉंग चेरापुंजीला गेल्यावर नातेवाईकांचे पितळ उघडे पडले. "आपण लास्ट इयरला आहोत. निकाल लागल्यावर नोकरी मिळेल नि मग शुभमंगल!"अशा गोडगोड गप्पा मारुन त्याने आपला कार्यभाग साधला. येताना संपूर्ण प्रवासात सोनल हादरली होती. विजेतेपदाचा आनंद झाकोळला होता. आल्यावर मीनलला वाटले विजयी होऊन परत आलेली सोनल आनंदी, उत्साहाने सळसळलेली असेल, पण जेव्हा ती गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागली, तेव्हा मीनल हादरली. सारे काही तिच्या लक्षात आले.

  

दोन दिवसांनी तिने सर्व काही मीनलला सांगितले. मीनलला खूप वाईट वाटले. आज सुनीलने किती भूलथापा मारुन सोनलला बेमालूम फसवले.

"सोनल एक लक्षात घे, असा फसवेगिरी करणारा, भूलथापा मारणारा सुनील तुझा जीवनसाथी कधीच होऊ शकणार नाही. त्याला संपूर्णपणे सोडून दे. ह्या तुझ्या अविचारासाठी तुला बॅडमिंटनही सोडावे लागणार आहे. तिथे तो तुझ्या मागे असणारच आहे. तू कॉलेजमधे खेळ किंवा बाहेर तो वासावरच असणार आहे. आयुष्यात संसारात सेट होऊन मुले थोडी मोठी झाल्यावर खेळ जमल्यास. 

   

"अगं तुझ्यासारखी जिवलग मैत्रीण मिळाली म्हणून सांगू तरी शकले सगळे. आता मलाच माझे आयुष्य सावरायला हवे. आता खेळ बंद म्हणजे बंद! आता तुझ्या साथीने भरपूर शिकायचंय मला! डोळ्यातील पाणी पुसत सोनल म्हणाली, "शहाणी गं माझी बाय! वेळीच सावरलीस म्हणून बरं झालं गं बाई!" मीनलने सोनलला प्रेमाने जवळ घेतले आणि ती थोपटतच राहिली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract