Anjali Bhalshankar

Action Others

2  

Anjali Bhalshankar

Action Others

मैत्र जीवांचे

मैत्र जीवांचे

2 mins
33


मैत्री!सुंदर शब्द जो माणसाला जगण्याची ऊभारी देतो.जगातल्या सर्व वाटा बंदिस्त झाल्या तरी मैत्रीच क्षितिज आपल्यासाठी खुल असतं शाळेच्या पहील्या दिवशी धडपडताना मागुन खांद्यावर पडलेला चिमुकला हात सुरकुत्यांनी भरून थरथरत तसाच शेवटपर्यंत पर्यंत खांद्यावर पडत रहातो अशी असते मैत्री वर्गात टिफीन पासुन ग्राऊंडवर बॅट पर्यंत नी कॉलेजमध्ये नोट्स पासुन प्रेम पत्र पोहोचविण्या पर्यंत मैत्रीच साथ देत असते.घरात अगदी आईवडिलांना ही माहीत नसलेल्या चांगल्या वाइट सार्याच गोष्टी मैत्री पोटात दडवून ठेवते.मैत्रीची वाक्यात व्याख्याच करायची तर मनाचा आरसा म्हणजे मैत्री असा आरसा ज्यात आपण आपले प्रतिबिंब बेदीककद बेफीकीरीने पाहु शकतो.आपण चुकतो चिढतो रडतो आदळआपट करतो कधी खुपच रागावतो अटटाहास हटट ही करतो कारण आपलयाला समजुन घेणारा खरा मित्रच आहे याची पूर्ण खात्री असते आपल्याला जगताना खुप अनुभव येतात सुखाच्या पायघड्या सह काटेरी दुःखाची वळणेही येतातच मग आपलं सुख पाहुन दुरूनच हसणारा नि दुःखाची सावली सुद्धा आपल्यावर पडू नये म्हणूनच काटेरी पायवाटेवर आपल्या अगोदर चालणारा तो खरा मित्र.असे प्रसंगही कित्येकदा येतात मनुष्य हतबल होऊन सार संपलय आता म्हणून निराश होतो कधी माणुस गमाविणयाच दुःख तर कधी आर्थिक विवंचना अशावेळेस चांगला मित्र कधीही आपल्याला खचु देत नाही ऊलट सर्वतोपरी सहकार्य करायला तत्परतेने पुढे सरसावतो.आपले गुण दोष यांसह तो आपल्याला स्वीकारून वेळोवेळी चांगल्या गोष्टी करायला व वाईटापासुन दूर रहायला समजंस पणे उद्युक्त करतो.भरकटावे असे मोहाचे क्षण अनेकदा येतातच की!पंरतु त्या एक क्षणी नेमक्या वेळेला प्रसंगी चार खडे बोल सुनावत वेळीच बंधनही घालतो मित्र असा असतो.आपले बाबा भाउ हे किंवा आई चांगली मित्र किंवा मैत्रीण होऊ शकतात संवाद महत्वाचा आहे. बोललं पाहीजे व्यक्त झालं पाहीजे मनातलं सार मळभ दुर करायलाच हवं जेणेकरून जगण्यातली घुसमट दुर होऊन मोकळ हलक वाटेल आणि ज्याच्याशी बोलुन अशा भावना जागृत होतील तोच खरा मित्र वा मैत्रीण असते.लहान मुलही चांगले मित्र मैत्रीण होऊ शकतात कित्येकदा ऊदास वाटत आपल्याला तेव्हा निरागस छोट्या मुलांचे मुक्त बागडणे पाहुन मनात नवी पालवी बहरते.अशी हि मैत्री असते निरागस निखळ निस्वार्थी पुनः पुन्हा हवीशी वाटणारी सहवासातुन आनंद विश्वास व मोठा भरवसा देणारी काही क्षणासाठी रूसणारी मात्र जन्मभर साथ देणारी कधी संवादातून तर कधी कृतीतून व्यक्त होणारी निरभ्र आभाळात हेलावणारी स्वच्छंद स्वैर बेंबद मुक्त पंतगासम हो!मात्र प्रखर परखड मजबुत धाग्यात गुंतलेली जो धागा अतुट आहे याची शाश्वती आहे म्हणूनच ती मैत्रीच्या आसमंतांच्या प्रवाहात ऊनाडपणे बागडत रहाते अशी मैत्री वर्तुळाकार असते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action