Author Sangieta Devkar

Abstract Romance

3  

Author Sangieta Devkar

Abstract Romance

माय डेयरी मिल्क

माय डेयरी मिल्क

3 mins
213


अरे प्रीती किती हा गोंधळ चालु आहे.?माझी महत्वाची मीटिंग चालू होणार आहे आता.आणि बेडरूम बघ किती तो पसारा.? मोहित बडबडत होता.आज त्याचे वर्क फ्रॉम होम होते.मीटिंग चालू होणार होती आणि घरात नुसता दंगा. चार वर्षाचा प्रतीक आणि नऊ महिन्यांची रिया.रिया रडत होती तर प्रतीक त्याच्या खेळण्यातल्या गाड्या घेवून आवाज करत बसला होता. प्रीती कामात होती.प्रीती अग रिया कडे बघ ना का रडते.प्रतीक जरा आवाज कमी कर.अहो,मला खूप काम आहेत.आज बाई पण आली नाही.मी एकटी कुठे कुठे लक्ष देणार? जरा तुम्ही घ्या ना रियाला.व्हॉट? अरे मी घरात असलो तरी कामा वर आहे.माझी मीटिंग आहे आता.प्लीज तू बघ ना .मोहित बेडरूम मध्ये गेला.त्याने दार लावून घेतले आणि मीटिंग अटेंड करू लागला.प्रीती ने रियाला दुधाची बॉटल देवून शांत केले.प्रतीक ला शांत बसायला सांगितले.पण तो काही ऐकत नव्हता.मग तिने आपला मोबाईल त्याला दिला.तो गेम खेळत बसला.रिया दूध पिऊन झोपून गेली.तशी प्रीती पुन्हा आपल्या कामाला लागली. लग्ना आधी ती ही जॉब करत होती.मग प्रतीक झाला तेव्हा तिनेच घरी राहायचा निर्णय घेतला.प्रतीक नंतर रिया झाली.वर कामाला बाई होती.पण बाकी सगळ काम आणि ही दोन मुल यांच करता करता ती दमून जायची.मोहित जवळ बसून निवांत गप्पा कधी मारल्या होत्या शेवटच्या हे ही तिला आता आठवत नव्हते.पूर्वी प्रीती खूप मस्त राहत होती. स्व ता कडे लक्ष देत असायची.पण आता तिच्या साठी तिला अजिबात वेळ मिळत नव्हता.ती ही कंटाळून जायची.रात्री मोहित म्हणायचा तिला, प्रीती अग ड्रेस तरी चेंज करत जा.त्याला दुधाचा , मसाल्यांचा च वास येतो.माझी पूर्वी ची प्रीती कुठे हरवली देव जाणे!


तेव्हा प्रीती म्हणायची,मला आता जाम कंटाळा आला आहे.मी काही कपडे वैगेरे बदलत बसणार नाही.आणि तशीच झोपून जायची.मोहित ची मीटिंग झाली.त्याने फोन पाहिला तर सगळ्यानी आज स्टेटस ला चॉकलेट चे फोटो लावले होते.आज चॉकलेट डे होता.आता त्याला क्लिक झाले अरे हा विक तर व्हॅलेंटाईन विक चालू आहे.त्याला आठवले प्रीती ला डेयरी मिल्क कॅडबरी खूप आवडत असायची. तो नेहमी तिला हेच चॉकलेट आणत असायचा.प्रेमाने तो तिला माय डेयरी मिल्क म्हणायचा.मस्त दिवस होते ते दोघांचे.रुसवे फुगवे मग चॉकलेट देवून मनवने.भरभरून जगणं आणि प्रेमात आकंठ बुडून जाणं.मोहित विचार करत होता,प्रतीक झाला आणि प्रीती कामातच बुडून गेली.मुलां साठी नोकरी सोडली.आता रिया च करता करता किती दमते ती.मी प्रेमाने तिला जवळ ही घेतले नाही कित्येक दिवसात.मी तिला कामात मदत करायला हवी.मोहित ने मग एक कॉल केला.थोड्याच वेळात दाराची बेल वाजली. प्रीती ने दार उघडले.मॅडम पार्सल आहे.कोणाचे आहे आणि कोणी दिले.?प्रीती यांचे आहे.मग ते पार्सल तिने घेतले.सोफ्यावर बसून तिने ते उघडले.एका बॉक्स मध्ये सात आठ डेयरी मिल्क चॉकलेट आणि एक ग्रीटिंग होते चॉकलेट डे चे.ती ग्रीटिंग बघत होती तोच मोहित तिच्या मागे येऊन उभा राहिला.तिच्या गळ्यात आपले हात टाकत म्हणाला, हॅपी चॉकलेट डे माय स्वीटडेयरी मिल्क..प्रीती ने त्याच्या कडे हसून पाहिले. अहो,हे कधी आणेल तुम्ही?प्रीती आता बघितले मी व्हॉटसअप वर मग समजले मला.आणि तुला डेयरी मिल्क आवडते हे ही आठवले.प्रितू आमच्या साठी,या घरा साठी तू कष्ट घेतेस आणि मी काहीच तुला मदत करत नाही आय एम सॉरी.अहो,मला सवय झालीय आता.आणि थँक्यु .माझ्या आवडीचे चॉकलेट दिल्या बद्दल.प्रीती आपण तुझ्या मदतीला एखादी मेड ठेवू म्हणजे तुझे काम जरा हलके होईल आणि मला माझी डेयरी मिल्क चाखायला मिळेल हो ना? मोहित ने तिला डोळा मारला.

नक्कीच ...लाजून प्रीती त्याच्या मिठीत शिरली.


समाप्त.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract