मानसिकता बदलायलाच हवी.
मानसिकता बदलायलाच हवी.
हो !नक्कीच मानसिकताच, बदलायला हवी. कित्येकदा अशा घटना भोवताली,नकळत घडतात,अनुभवही येतात मन विदीर्ण होत सहज,सोप्या साधारण वाटणारया गोष्टी खोलवर विचार केला, तर त्याची दाहकता, पुढे पिढयापिढयान,वाढणारीच आहे,खास करून लहान मुलांच्या बाबतीत तर हे भयंकर, आहे.बाबासाहेबांनी संविधानात तळागाळातील, शोंषिताना न्याय देऊन समाजाच्या, उच्च प्रवाहात आणण्याची तरतूद फार अभ्यास व विचारांती करून ठेवली,जेणे करून अनेक कायदे, पुढे अस्तित्त्वात आले समाजोदधारासाठी. त्यापैकी आरटीई (राईट टू एज्युकेशन) काही वर्षापूर्वीपासून सरकारनी ठरवलेल्या या धोरणामुळे, काही प्रमाणात शिक्षणाचा समान अधिकार मुलांना मिळायला लागला .अगदी वस्ती पातळीवरील,ज्यांची ऐपत नाही,अशा पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, जिथं पुर्वी महानगर पालीका किंवा तत्सम मराठी साधारण शाळेत घालावे लागायचे कितीही ईच्छा असली तरीही मोठ्या, खाजगी, ईंग्रजी माध्यमाच्या शाळेत केवळ परिस्थितीमुळे, प्रवेश घेता येत नव्हता तिथे,या कायद्याने काही प्रमाणात समानता,आली असे वाटले होते,आज तळागाळातील, गरीब,मध्यमवर्गिय,ऐकूनच काय आर्थिक दृष्टया मागासलेल्या, समाजातली मुल,उच्च आर्थिक सक्षम असलेल्या मुलांच्या, माडींला मांडी लावून एका वर्गात बसुन शिक्षण घेऊ लागली.त्या मुलांचे विश्व निरागस,निर्मळ असते त्यांना नाही घेणदेण कोण झोपडीत रहातो,आणि कोण बंगलयात त्यांच्यासाठी फक्त शाळेतला,मित्र किंवा वर्ग मित्र ईतकच असावं,आणि असेल असा माझा समज होता. माझ्या कडे शिकायला येणार्या मुलापैकी काही इंग्रजी माध्यमात आरटिई नुसार,शिकणारी आहेत, त्यांना घेऊन घराजवळील बागेत मी जात असते,मधून मधून काल असेच खोल करून, मुलांचे खेळ घेतांना,अचानक आमच्या, बाजुने ऐक मुलगी पळत गेली मागाहुन एक जोडपं कदाचित तिचे आईबाबाही असावेत सोबत. तिला पाहून माझ्या एका विद्यार्थिनीने स्नेहा (नाव बदलले आहे)अशी जोरात हाक मारली ,अर्थात ती अगदी जवळून जात होती तीला सपष्ट ऐकुही आली.त्या मुलिने वळून पाहिले, परंतु कसलाच प्रतिसाद न देता निर्विकार पणे पुढे गेली.मागाहून येणारे आईवडिलही, हे सार पहात होते.मी त्या हाक मारणारया माझ्या वस्तीतलया मुलीला विचारले,का हाक मारलीस ओळखतेस का ग!तिला तेव्हा ती ,आठ ,नऊ वर्षाची मुलगी अगदी भरभरून तिच्या विषयी बोलू लागली बाई,ती माझी बेस्ट फ्रेंड आहे.आम्ही तर वर्गात एकाच बाकावर बसतो. शाळेत ग्राऊंडवर एकत्र खेळतो. अभ्यास पण करतो,आता का अशी ओळखत नाही काय माहिती.आणि शेवटी हे ही म्हणाली की आता शाळेत गेलयावर ती मला म्हणेल ना बाई, तू तिथ त्या मुलांसोबत काय करत होतीस? का बसली होतीस?हे संभाषण सुरू असताना तीची ती शाळेतील मैत्रीण तोन,चार वेळा आमच्या बाजूने पळत,होती तिच्या सोबत असलेल्या लहान मुलांसह खेळत होती तिचे आईवडिलही बाजुला बसले होते.जरा काही वेळान ती त्यांच्याजवळ जाऊन आमच्या,ग्रुपमधील त्या मुलीकडे पाहुन काहीतरी बोलली,तिचे आईवडिलही आमच्या कडे पाहू लागले आणि सरळ ऊठून जरा दूर जाऊन बसले.अर्थात ती मुलगी तिचा भाऊही आईबाबांच्या आसपास गेले. पुन्हा खेळू लागले.मी हे सार निरीक्षण करीत होते माझ्या सोबतची मुलगी वळून वळून तिच्या कडे पहातच होती, तिची माफक अपेक्षा तिच्या त्या शाळेतल्या खास मैत्रीणी ने तिला ओळख, द्यावी दोन शब्द बोलावे यापेक्षा जास्त बिलकुलच नव्हती, त्यानंतर आम्ही म्हणजे वस्तीतला,दहा पंधरा मुल आणि मी तासभर तिथेच होतो, ती मुलगी ही होती,बाग बंद झाली आम्ही घरी यायला निघालो, गेटमधून बाहेर पडताना लक्षात आलं तिची ती मैत्रीण चोरट्या नजरेने आमच्याचकडे पहात जात होती. तेव्हा दिशा (नाव बदलले आहे ) माझी विद्यार्थीनी मला पुन्हा प्रश्न विचारू लागली बाई ती अशी का वागली? मी तर तीला भांडले ही नव्हते कधीच शाळा सुरू होती तेव्हा.माझ्याकडे पूर्ण नाही,परंतु कांही प्रमाणात ऊत्तर होती त्या छोटीच्या मोठ्या गहन प्रश्नांची.परंतु मला तिला दयायची नव्हती.तू तूझे शोध ऊत्तर आपण कुठे कमी पडतो?आपल्याला स्वताःला ईतक भारी, छान,सक्षम बनवाव लागेल की हि तुझी मैत्रीणीच, काय शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थी सांरयानीच कधीही कूठेही भेटले तर धावत आपल्या कडे आले पाहीजे.असे काहीतरी करून दाखवायला हवे बघ मग तु वस्तीतल्या मुलांसह का बसली होती असे विचारायची हिम्मत तुझी,कोणतीच मैत्रीण करणार नाही.त्यासाठी काय करायला हव मी सर्वांना उद्देशून प्रश्न विचारला सारी मुलं जोरात ओरडली अभ्यास !अभ्यास! अभ्यास !मी मात्र मान फिरवून डोळे टिपले.(मला त्या छोट्याशा चिमुरडीच नाही परंतु तिच्या आईबाबाच वागणं खटकत होत.प्रश्नांची सुरवाती चे मूळ तर तिथेच होत ना!
