माणुसकीची राखी
माणुसकीची राखी
रमेश एक अनाथ युवक होता. अनाथ असल्यामुळे त्याची सदैव मस्करी व्हायची.
त्याला एक मनुष्य म्हणाला.
" तुला नातेवाईक कोणी नाही.
तुझं अस्तित्वच कशाला आहे मला समझत नाही. "
अजून एक गृहस्थ म्हणाले.
" याला घर देणे ही अशक्य गोष्ट.
भामट्यांबरोबर घेणं देणं हे तर आहे स्पष्ट. "
एक वृद्ध गृहस्थ म्हणाले.
" याला आपल्या चाळीत जागा नाही.
याला इथून चालता करा कसाही. "
इतक्यात एक युवती आली.
" फक्त अनाथ असल्यामुळे कोणी होत नाही असभ्य.
मुळात असे विचारवृत्ती असणे हे मोठे दुर्भाग्य. "
एक मनुष्य मस्करीत म्हणाला.
एवढाच दयाभाव आहे तर याची सोय तूच करावी.
आणि आमच्याकडून याच्या विषयी सकारात्मक मत नसल्याची शमा असावी. "
रमेश कुतज्ञ झाला.
" माझी बाजू समजण्यासाठी मी कृतज्ञ आहे.
पण मला तुमची चिंता आहे. "
युवती हसली.
" माझ्या भावासमोर कोणाची होईल हिम्मत.
मोठ्या मोठ्या नारधमांना दाखवेल आपली करामत. "
रमेश म्हणाला.
" अश्या विराला भेटण्यास माझी आहे उत्सुकता.
जो गरज पडल्यास दाखवतो विरता. "
युवती ने आरशा दाखवला.
" तू स्वतःला समजण्यास का असमर्थ ठरला.
आता तू अनाथ नाही कारण तुझ्यात मला एक बंधू मिळाला. "
त्या दिवसापासून रमेश ला कोणी अनाथ म्हणाले नाही. त्या युवतीने त्याला शिक्षण दिले. रमेशला नौकरी ही लागली.
