रमेशचा पराक्रम
रमेशचा पराक्रम
रमेश हे एक वृद्ध गृहस्थ होते. काही कारणांमुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले होते.
रमेश म्हणायचे.
" पुन्हा एकदा शिक्षण घेऊन करूया एक पराक्रम.
माझ्यासारख्या गृहस्थांसाठी कुठे आहे का उपक्रम. "
या विषयामुळे लोकं त्यांची मस्करी करत.
लोकं म्हणायची.
" ज्या वयात आपल्या नातवंडाना शाळेत न्यायला केला पाहिजे सहयोग.
त्या वयात शिक्षणासाठी वेळ नाही आहे योग्य.
तुमचे व्यवस्थित आहे का आरोग्य?. "
एक माणुस म्हणाला.
" तुमच्या गणवेशासाठी करावी लागेल एका शिंपीची नेमणूक.
शिंपी स्वतः म्हणेल एवढ्या वयस्कर माणसासाठी गणवेश म्हणजे माझी फसवणूक. "
रमेश ही सगळी थटा म्हस्करी गंभीररित्या घेत नव्हते.
त्यांनी शांतपणे उत्तर दिले.
" शिक्षित व्हायला नसते वयाचे बंधन.
तुमच्या विनोदांमुळे नाही बदलणार माझे मन. "
राजेश काका रमेश चे मित्र होते. रमेश नी सगळा प्रसंग
राजेश काकांना सांगितले.
राजेश काका म्हणाले.
" शिक्षण आहे एक असे रत्न.
जो धारण करतो हे रत्न
या रत्नाच्या मदतीने करतो समाजाची परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न. "
राजेश काका म्हणाले.
" या वयात शिकण्याचा निर्धार आहे फारच धाडसी आणि कौतुकास्पद.
याच विचाराला प्रत्यक्षात आण्याकरिता पुढे कर आपले पद. "
रमेशनी शिक्षणाच्या उपक्रमाचे शोध केले व शिकायला महाविद्यालयात आपले नाव नोंदविले.
काही दिवसानंतर लोकांवर आर्थिक समस्या आली.
शिक्षणाच्या आभावामुळे सावकार आणि इतर उच्च अधिकारी त्यांना फसवत असत.
एक माणुस म्हणाला.
" आमच्या साधेपणाचा उच्च अधिकारी घेत आहेत फायदा.
अस्या अत्याचाऱ्यांना धडा शिकवायला कुठे आहे कायदा. "
दुसरा माणुस म्हणाला.
" अज्ञानी आहोत मूर्ख नाही.
एकत्र होऊन शिकवूया यांना खूप काही. "
रमेश म्हणाला.
" तुमचा राग तुमच्या जागी बरोबर आहे.
पण यांना धडा शिकवण्यासाठी मी एक योजना बनविले आहे. "
रमेश म्हणाला.
" शिक्षण घेऊन मला वाहिखात्यांची चांगली ओळख झाली आहे.
कार्यालयाच्या वाहिखात्याच्या तापसीणीची गरज आहे. "
रमेशनी वाहिखात्याची तपासणी केली. सावकार आणि उच्च कर्मचाऱ्यांनी फार पैसे लुबाडलेले. पोलिस ने सावकार आणि त्याची मदत करण्यारांना तुरुंगात डांबले.
सगळ्यांनी रमेश चे कौतुक केले.
"शिक्षित होण्यात असतो एक चमत्कार.
शिक्षण हा सगळ्यांचा अधिकार.
वय, रंग चे बंधन न टाकता करूया बहुतांश लोकांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित.
आणि अस्या प्रकारे एक बदल घडव्यायला राहूया नेहमी उपस्थित.
विश्व साक्षरता दिवसयाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा. शिक्षित व्हायला प्रोत्साहित करा.
