Rohan Bendre

Others

3  

Rohan Bendre

Others

एक उत्तम साजरीकरण

एक उत्तम साजरीकरण

2 mins
182


(नाट्य द्वार उघडते )

( छत्रपती शिवाजी महाराज आधुनिक जगात पुनर्मजन्मित होतात ).

ते वेशांतर करून प्रजेची परीक्षण करायचा निर्णय घेतात.

शिवजयंती चा दिवस येतो.

शिवभक्त म्हणतो.

" या दिवसाचे बघत असतो आम्ही शिवभक्त आतुरतेने वाट.

फारच भव्यरूपाने करूया हा दिवस साजरा.

महाराष्ट्राच्या दैवताला माझा मानाचा मुजरा. "

छत्रपती शिवाजी महाराज विनम्रपणे हसतात.

" एका महान व्यक्तिमतवाला माझे वंदन.

तुम्हास शिवजयंतीचे हार्दिक अभिनंदन. "

शिवभक्त म्हणतो.

" आजचा संपूर्ण दिवस छत्रपतींना समर्पित.

गडावरच्या उपलब्धीचा लाभ घ्यायला रहा उपस्थित. "

छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात.

" तुमच्या संभाषणाचा मला नाही कळला अर्थ.

तुमचे आग्रह स्वीकार करण्यास मी आहे असमर्थ. "

शिवभक्त म्हणाला.

" दांडगा उत्सव व्हावे म्हणून आम्ही केले आहे भव्य रूपात आयोजन.

हा सोहळा पार पाडण्यासाठी सांगितवाद्य वाजवण्यास आतुर आहे माझे मन. "

छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात.

" भव्य रूपात आनंद साजरा करण्याची ही कसली पद्धत.

विचार करा त्या अहुत्यांचा ज्यांनी झाले स्वराज्य अवगत. "

शिवभक्त आपल्या निर्णयावर ठाम होता.

" त्या अहुत्यांचा मला ही आहे अभिमान.

म्हणूनच या दिवसाच्या थाटामाटात साजरा करून देऊया मान. "

दुपारची वेळ झाली. रमेश गडावर आला.

शिवभक्तानी रमेश ला थांबिवले.

" तुमचे आगमनास माझा नकार.

फक्त विशिष्ट लोकांची उपस्थिती आहे अपेक्षित.

म्हणून क्षमा करा तुमची उपस्थिती आहे वर्जित. "

छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले.

" छत्रपती शिवाजी महाराज तर सर्वांचे प्रिय.

असे नियम तर फारच कठोर आणि अमाननीय

शिवभक्त म्हणाला.

अस्या माणसांना छत्रपतींची माहिती तरी का असेल.

यांच्या ज्ञान बघून कोणी ही हसेल. "

छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले.

" ज्ञान असू दे अथवा नसू दे.

सर्वांशी एकसम्मान वागणूक असू दे. "

शिवभक्त संतापला.

" तुमच्या वयाचा मान ठेवून मी शांत आहे.

मला शिकवायला तु कोण आहे?. "

छत्रपती शिवाजी महाराज हसले.

" ह्या प्रश्नाचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याच्या इथे आहे.

मी त्या वीरमातेचा पुत्र आहे ज्यांनी हिंदवी स्वराज्याचा पाया ठेवला आहे."

शिवभक्त माफी मागतो.

" राजे माफी मागतो हा शिवभक्त.

तुमच्या जयंतीच्या नादात केला दुरुपयोग मनोसक्त. "

छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले.

" समझा मी भेदभाव केला असता.

तर हिंदवी स्वराज्य कधीही शक्य झाला नसता. "

छत्रपती व शिवभक्त म्हणतात.

" जर का छत्रपतीचे कौतुक करूनही तुम्ही देता जातीवाद व भेदभावला प्रोत्साहन

तर त्वरीत बंद करा असे प्रोत्साहन आणि अश्या गोष्टींविरुद्ध लढा देऊन करा खऱ्या रूपात शिवजयंतीचे साजरीकरण "

समस्त शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दीक अभिनंदन.


Rate this content
Log in