Rohan Bendre

Others

3  

Rohan Bendre

Others

समीरला न्याय

समीरला न्याय

2 mins
208


मकर संक्रन्ती जवळ येत होती. अनील उत्साही होता. तो म्हणाला.

" मकरसाणक्रांतीनिम्मित उत्साही आहे माझे मन

घेऊया तीळगुळाचे लाडवांचे आनंद आपण. "

सुनील म्हणाला.

" तिळगुलासोबत घेऊया पतंग उडवण्याचा आनंद

पतंग उडवण्याचा गर्व असणाऱ्या लोकांचा करूया स्वर बंद. "

दोघे ही बाजारात तिळगुळ व पतंग विकत घ्यायला जातात. त्यांना समीर दिसतो. एका दुर्घटनेत त्याचा चेहरा

भाजल्यामुळे तो कुरूप दिसत असे.

अनील ने समीर ची म्हस्करी केली.

" याचे आगमन जर का असेल सक्रिय

तर आपल्या आनंदाचा बेत शंभर टक्के निष्क्रिय. "

सुनील म्हणाला.

" आपल्या सोबत हा मनुष्य असेल तर पतंगाची झुंज देण्याची गरजच नसेल

याला बघूनच प्रतिस्पर्धी पळेल. "

समीर ला वाईट वाटले. तो रडून गेला. राजेश काकांनी हे संभाषण ऐकले.

राजेश काकांनी अनील व सुनील ला तीळगुळाचे लाडू खायला बोलवले.

दोघांनी तिलगुळाचा लाडू खाल्यानंतर ठसका दिला.

अनील म्हणाला.

या लाडवाची चव होती फार बेकार.

असे पाहुणचार आम्हाला नाही स्वीकार. "

अनील म्हणाला.

" अस्या लाडवांची वाटणी

म्हणजे रुग्णालयात जाणे क्षणोक्षणी. "

राजेश काका म्हणाले.

" तुम्हाला असे लाडू दिल्याबद्दल मी क्षमस्व आहे.

पण या लाडवाचे एक वैशिष्ट आहे.

असे की माणसाच्या स्वभावाप्रमाणे हे चव देते.

जे समजतात समाजात त्यांचे वर्चस्व आहे. "

दोघे म्हणाले.

" तुमचा आशय आम्हाला समजण्यात नाही आला

काय सांगायचा प्रयत्न करताय आम्हाला. "

राजेश काका हसले.

" जसे तिळगुळ खाऊन गोड असण्याची असते अपेक्षा.

मग खऱ्या जीवनमध्ये कडवटपणा दाखवून का करता कोणाची उपेक्षा. "

राजेश काका म्हणाले.

" जेव्हा स्वभावाच्या रूपात लोकं समाजात आपला गोडवा पसरवतील

तेव्हाच मित्रता चे पतंग स्थिरपणे आकाशात जातील. "

अनील व सुनील ला कळले की राजेश काका समीरशी झालेल्या दुरव्याहाराबद्दल बोलत होते.

दोघे म्हणाले.

"सर्वाना एक सम्मान समाजात असू दे प्रेम व मित्रता.

सर्व लोकांबद्दल एक सम्मान भाव ही एक अत्यावश्यकता."

दोघांनी समीरशी माफी मागितली व त्याच्याबरोबर मकर संक्राती साजरा केली.

सर्वाना मकर संक्रन्तीचे हार्दीक शुभेच्छा.


Rate this content
Log in