अंधारातली दिवाळी
अंधारातली दिवाळी
वार्तापूर नावाचे एक गाव होते. त्या गावात वार्तापूरकर नावाचे एक पत्रकार रहायचे. ते नेहमी भ्रस्टाचारविरुद्ध लेख लिहायचे. त्या गावात बहुतांश माणसे शेतकरी होते.
त्या गावात मुफ्तीशेठ नावाचा लबाड जमीनदार होता.
मुफ्तीशेठ नी एक घोषणा केली.
" माझ्या शेतकरी मित्राना माझा मैत्रीचा हात.
जो इसम माझ्याकडे त्याची जमीन उसने ठेवेल
त्याला दुप्पट जमीन दिली जाईल.
अश्याप्रकारे सगळे फायद्यात राहील.
या योजनेला खूप शेतकरी फसले. त्यांनी न विचार करता
आपली जमीन उसनी ठेवली.
काही दिवसानंतर काही शेतकरी मुफ्तीशेठ यांच्या घरी आले.
एक शेतकरी म्हणाला.
" आमची नवी जमीन बघण्याची आम्हास आहे उत्सुकता.
आम्हास आमची नवी जमीन बघण्याची परवानगी कधी देता?. "
दुसरा शेतकरी म्हणाला.
" फारच आनंद होईल जर का तुम्ही आम्हास जमिनीचे दर्शन घडवून आणले.
अश्या उत्सुकतेने आम्ही आले. "
मुफ्ती शेठ म्हणाले.
" तुम्ही मला जमीन दिली
आणि मी किंमत देऊन ती खरेदी केली. "
मुफ्ती शेठ म्हणाले.
" आता त्या जमिनीवर अनैतिक लोकांना जमीन विकून घेईन फारच फायदा.
माझा काही नुकसान करू शकत नाही कायदा. "
मुफ्ती शेठ नी बाजविले.
" जर का माझ्या विरुद्ध जाल
तर आपल्या कुटुंबाला चांगले जीवन देण्याचे स्वप्न कसे पुरे कराल.
म्हणून माझ्या खेतातच तुम्ही काम कराल. "
मुफ्ती शेठ क्रूरपणे हसत होते. वार्तापूरकरांनी मुफ्ती शेठ विरुध्द लेख लिहला.
दिवाळी जवळ येत होती.
मुफ्ती शेठ ने घोषणा केली.
" दिवाळी जवळ येत आहे. सर्वाना उपहार दिले जातील.
पण जर का वार्तापूरकराला साथ दिली
तर त्याचा विजपुरवठा खंडित केले जातील. "
राजेश काका एक वृद्ध पण तितकेच हुशार इसम होते.
एक शेतकरी त्यांना म्हणाला.
" आता जर का जमीनदाराविरुद्ध तर आम्ही संकटात येऊ.
तुम्हीच मला सांगा वार्तापूरकरांची साथ कशी देऊ. "
राजेश काका हसले.
" तुमचे वाक्य भविष्याकाळात नसून वर्तमानकाळात आले पाहिजे.
तुम्ही आताही संकटात आहात.
तो खोटारडा शेठ जिंकत आहे.
कारण तुम्ही त्याला भीत आहात. "
राजेश काका म्हणाले.
" आपला गणतंत्र देश आहे.
इथे सगळ्यांना एक सम्मान जीवन सुनिशचित करायला प्राधान्य आहे. "
दुसरा शेतकरी म्हणाला.
" ते सर्व मान्य आहे.
पण पुरावा असण्याची ही गरज आहे. "
राजेश काकांनी एक स्थिरचित्र दाखविले.
" या स्थिर चित्रात त्या लबाड माणसाची अनैतिक लोकांची मदत करण्याची कबुली आहे.
आता माझ्यासोबत किती माणसे आहेत?.
अश्या प्रकारे वार्तापूरकर आणि राजेश काकांच्या मदतीने शेतकऱ्यांचा जीवनात प्रकाश आला.
सर्व शेतकरी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली.
या दिवाळीत कोण्याच्या अंधार पसरलेल्या जीवनात प्रकाश आण्याचा प्रयत्न करा.
सर्वाना दिवाळी च्या शुभेच्छा तसेच राष्ट्रीय एकता दिवसाच्या पूर्वरूपी शुभेच्छा.
अन्यायाविरुद्ध एकत्रित व्हा.
