Rohan Bendre

Others

3  

Rohan Bendre

Others

अनील चे योगदान

अनील चे योगदान

1 min
170


अनील एक विद्यार्थी होता. तो सारखा अन्नू्तीर्ण होत असे. त्याची लोकं नेहमी थट्टा करत.

एक माणुस म्हणे.

" अभ्यासात चालत नाही याची बुद्धी.

याला उत्तीर्ण होता होता येईल वृद्धी. "

दुसरा माणुस म्हणे.

" याच्या वयाचे युवक किती पुढे गेले.

अपयश काय असते यांनी सिद्ध केले. "

असे अनिलला रोज लोकं अपमानित करत.

सुनील हा अनिलचा मित्र होता. तो खूप अभ्यासु व हुशार होता. परीक्षेत त्यांनी खूप चांगले गुण आणले.

लोकांनी त्याचे कौतुक केले.

एक माणुस म्हणाला.

" परीक्षेत उत्तम कामगिरी बजावून तु केले आहे सगळ्यांना अभिमानाने सम्मानित.

तुझ्या यशाचे रहस्य सांगतोस का त्वरित. "

सुनील म्हणाला.

" मेहनत आणि कठोर परिश्रम तर आहेच माझ्या यशाचे रहस्य.

पण माझ्या यश्याच्या वाट्यात महत्वाची भूमिका देणारा आहे एक सदस्य. "

सुनील अनिलला संबोधित करत होता.

एक माणुस हसला.

" थट्टा मस्करी करायची वेळ नाही ही बरोबर

ह्या अन्नू्तीर्ण होणाऱ्या मुलाला अभ्यास्याची काय खबर.

दुसरा माणुस बोलला.

"हा कोणाची प्रेरणा असेल तर मठ्ठ आणि बुद्धू मुलांची संज्ञा वाढेल."

सुनील म्हणाला.

" निश्चितच तो अभ्यासात इतका यशस्वी नव्हता

पण मला पुस्तकं देणारा तो एकटाच होता. "

सुनील म्हणाला.

" यशस्वी होण्याचे एक महत्वाचे अंश आहे प्रोत्साहन.

जर का नसेल प्रोत्साहन तर माणुस कितीही हुशार असेल तरी उदास असेल त्याचे मन. "

लोकांना त्यांची चूक कळली. त्यांनी अनिलला प्रोत्साहित केले. अनील यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला.

सर्वाना गुरुपौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा.


Rate this content
Log in