Meenakshi Kilawat

Abstract

5.0  

Meenakshi Kilawat

Abstract

माणसाचा दृष्टीकोण"

माणसाचा दृष्टीकोण"

3 mins
1.0K


   अरे माणसा किती धावपळ करतोस , कां असा हरविला आहेस ,आपल सुखच सर्वकाही नाही हे आपण लक्षात घेतल पाहिजे.हे जीवन अमुल्य आहे. माणसाला माया,दया,करूना उबजतच मिळत असतेय. आपल माणुसपण अबधित राखण आपल प्रथम कर्तव्य आहे.जगायला पैसा आवश्यक आहे.पण अती तिथे माती होत असते, रोटी,कपडा,मकान या तीन वस्तू कमवायच्या,जास्त पसारा करायचा कश्याला व कश्यासाठी ? सतत बारा ते पंधरा तास माणूस नित्याच्या दैनंदिन धावपळीत व्यस्त असतोय.एवढ काय करतो तर पैशे कमवण्यासाठी आयुष्याचा अर्ध्यापेक्षा जास्त काळ उठारेटा करतोय.घरीदारी ,बाहेर समाजात कुठे ही गेला तरी तो मनातल्या मनात मोजमाप करत असतोय. आणि कोण करतोय तर बलाढ्य धनवान,खुप श्रीमंत माणुस ,जो करोडो ,अब्जोची उलाढाल करून काय मिळवतो तर चिंता अन टेंशन,एवढ कमवुनसुद्धा त्यांच्या दृष्टीत समाधान दिसत नाही.फक्त स्वार्थ आणि स्वार्थ असतोय.

       अरे माणसा एवढ कुणासाठी म्हणायची वेळ येतेच,आणि हायपर टेंशन घेवून आत्महत्या सुद्धा करतात. एक उदाहरण आठवते मला,एक सुप्रसिद्ध हस्ती होती,अतिशय श्रीमंत व नावाजलेला ,उच्चवर्गीय व्यक्ती, एक दिवस मृत्यूमुखी पडला. त्या गावात स्मशान नव्हते,गावापासून बरच लांब जंगलात खंदक खणुन तयार केलेला खुप मोठा खड्डा बनविलेला होता. तिथे कुणाचा ही मृत्यू झाला असता त्या विशालकाय बंद खंदकात त्या मेलेल्या माणसाला टाकण्यात येई. आणि वरून एक मोठा दगड त्या खंदकावर झाकून बंद करत असे,त्या गावाच्या परंपरे नुसार अंत्यविधी पार पाडल्यानंतर त्या शवाला त्या खंदकात टाकण्यात येत असे. तो सुप्रसिद्ध श्रीमंत व्यक्तीलाही मृत्युनंतर खंदकात टाकण्यात आले होते. सर्व लोक तिथून निघून गेले.पण झाले काय !

     तो माणूस एक दोन तासानंतर शुद्धीवर  आला, तो माणूस मेलेला नव्हता. तो बेशुद्ध होता,जेंव्हा त्याला शुद्ध आली तेंव्हा त्याने खुप आकडातांडव केला पण कुणाला ऐकू येण्याचा प्रश्नच नव्हता. कित्येक दिवस वर्ष तो त्या खंदकात जगत होता.त्या लांशाच्या ढिगात तो जीवंत व्यक्ती कसा राहिला असेल ,रोज आरडा ओरडा करून सांगायच अरे मी जीवंत आहे,काढा मला येथून,भुक लागली तर मेलेल्या सडक्या कुजलेल्या लाशांच मास खात असे.तहान लागली तर झिरपुन येणार पाणी चाटूण पित असे ,रोज प्रार्थणा करायचा ,देवा कोणाची तरी मृत्यु होवू दे ,त्याला घेवून कोणीतरी येईलच आणि मी जीवंत बाहेर निघेन.पण तस झाल नाही. तो कित्येक वर्ष त्या खंदकात जगला ,त्यानंतर कुणाची मृत्यु झाली व तो व्यक्ती बाहेर आला. त्याला कोणी ओळखल नाही. सारे भितीने भूत म्हणुन पळाले.त्याने हातपाय जोडून परीचय सांगितला. तेंव्हा कुठे सऱ्यांना त्यावर विश्वास बसला. 

        त्याला विचारल्या गेले इतके वर्ष तु कसा जगला,तो म्हणाला आशेवर,मला आशा होती मी एक दिवस बाहेर निघेन ,जीवंत रहायला काय खाल्ले,त्याने सर्व खरखर सांगितले. त्याच्याजवळ गाढोडे बघून विचारले ,यात काय आहे ?त्यात होते मृत्युमुखी पडलेल्यांचे अंगावरचे दागिने,सोने कपडे,पैशे इतक्या विषन्न करणाऱ्या स्थितीतही त्या व्यक्तीचा स्वार्थ सुटलेला नव्हता.  

 जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण किती वेगळा होता.इतके कष्ट करून तो जीवंत बाहेर आला पण स्वार्थ सोडला नाही. परिमार्जन म्हणुन काही परोपकारी वृत्ती जोपासली असती.दिनहिन गरीबजणांना मदत केली असती,अनाथांना माया दिली असती,पंगुजीवांना आधार दिला असता, प्राणी मात्रावर प्रेम केल असत,काही संकल्प केले असते,पण या माणसाने अस काहीच केले नाही.

      स्वार्थ विरहित निरामय जीवन भाव आलाच नाही अश्या धूर्त ,कपटी,राक्षसाला काय माणुस म्हणन्याचा अधीकार आहे, अश्या माणसाचे माणुसपण काढून घ्यायला पाहिजे , माणसाला समाजकंटक घोषीत करायला पाहिजे. अनावश्यक लालसा ठेवून जो माणुस कार्य करत असेल,त्या माणसाला जगण्याचा काहीच हक्क नाही.जो व्यक्ती स्व:तापुरता विचार करतो ,त्याला काय म्हणाव.आजकालची पद्धत आहे.माणसातल माणुसपण हरवून तो सुखच्या मागे धावत आहे. आपल्याला त्याने आत्मकेंद्रीत केलेल आहे. नितीमुल्य हरविले आहे.संवेदना संपल्या आहे.दुसऱ्या कुणाला खाली पाडून सवार होतो आहे.सारख्या चढाओढित आजचा माणूस वय व्हायच्या आतच कमजोर , प्रज्ञाशुन्य होवून जींवतपणीच मरण भोगत आहे. सर्वांना सुबुद्धी लाभो,एवढीच इच्छा आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract