माझी छोटीशी डायरी
माझी छोटीशी डायरी
डायरी दिनांक - ३ जून २०२१
माझी प्रिय डायरी,
आज मी सकाळी लवकर उठलो आणि पेपर हातात वाचायला घेतला. वर्तमान पत्राला किती आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे. आपली सगळ्यात पहिली आवश्यकता म्हणजे वर्तमान पत्र. आपल्या मधलेच काही लोक अशी आहेत, जी त्यांना वर्तमान पत्र वाचल्याशिवाय ते चहा सुद्धा घेणार नाहीत. आठवा, दिवाळी आणि होळी च्या दुसऱ्या दिवशी जेव्हा वर्तमान पत्र गैरहजर असते तेव्हा आपली सकाळ किती बोरिंग जाईल विचार करा. वर्षातून असे दोन ते तीन दिवस असतील जेव्हा आपल्याला वर्तमान पत्र आपल्या घरी येत नाही.
पेपर वाचून झाल्यानंतर मी तयार होऊन ऑफिसला गेलो.संध्याकाळी ऑफिस मधून घरी आल्यावर मी कडक चहा घेतला आणि स्टोरी मिरर ची गोष्ट लिहण्यास बसलो. जेव्हापासून मी स्टोरी मिररवर लिहण्यास सुरुवात केली, तेव्हापासून माझा दिवस कसा जातो हे मलाच समजत नाही. आणि खरं सांगू स्टोरी मिररवर एवढ्या स्पर्धा असतात कि स्टोरी मिरर असं तुम्हाला खाली बसून देणारच नाही. मला खरंच स्टोरी मिररवर लिहण्यास खूप आवडते. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, माझ्या गोष्टींवरती समीक्षा देणाऱयांना मी ओळखत सुद्धा नाही. तरी सुद्धा स्टोरी मिरर च्या माध्य्मातून माझं त्यांच्याशी एक घट्ट नातं निमार्ण झालं आहे. त्यांच्या समीक्षामुळे मी खूप प्रोत्साहित होतो. स्टोरी झाल्यानंतर मी खूप थकलो असल्यामुळे लवकरच झोपी गेलो.
