Sagar Bhalekar

Crime Thriller

4.6  

Sagar Bhalekar

Crime Thriller

रहस्यमय खून

रहस्यमय खून

8 mins
483


        साधारणतः १५ वर्षांपूर्वीची गोष्ट. माझे काका पोलीस दलामध्य होते. हि कथा काकांनी मला त्यावेळी सांगितली होती.काका पोलीस दलामध्ये असल्याकारणे त्यांना कधीही, केव्हाही ड्युटीवर बोलवले जात असे. असच एकेदिवशी काकांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून फोन आला. सावंत तुम्ही जिथे असाल तिकडून लगेचच खाडीवर जावा. मी आलोच पाठीमागून….काका घटनास्थळी पोचले आणि त्यांनी ती बॉडी निरखून बघितली. तेव्हा त्या बॉडीचा गळा कापण्यात आला होता. सावंत म्हणाले, कि प्रथम बॉडी कोणी बघितली, तेव्हा तिथे झालेल्या जमावापैकी एका मच्छिमार गृहस्थाने हात वर केला आणि म्हणाला. साहेब, मी पाहिली पहिल्यन्दा बॉडी.तेवढ्यातच तिकडं वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्टर इनामदार तिकडे आले. इन्स्पेक्टर इनामदार आणि सावंत ह्यांनी बॉडी पाहिलेल्या त्या गृहस्थाची कसून चौकशी केली. कसून केलेल्या चौकशीमध्ये असे आढळून आले. 

इन्स्पेक्टर इनामदार - कधी पाहिली साधारण बॉडी तुम्ही????

गृहस्थ - साहेब मी रामभाऊ , बघा मी जेव्हा मासे पकडायला जात होतो तेव्हा समुद्रकिनार्यवर मला ही बॉडी दिसली.

इन्स्पेक्टर इनामदार - म्हणजे नेमकं तुम्ही किती वाजता बघितलात????

गृहस्थ - असं विचारताय! बघा साहेब सकाळी ८ वाजता…..

इन्स्पेक्टर इनामदार - तुम्ही ह्या माणसाला ओळखतात का???

गृहस्थ - हो, साहेब. हे पांडुरंग साठे. गावातील वजनदार व्यक्तिमत्व.दहा एकर शेतजमीन. स्वतःचा प्रशस्त वाडा आणि सगळ्यात महत्वाचं दिलखुलास व्यक्तिमत्तव. पण असं अचानक काही कळायला मार्ग नाही.

इन्स्पेक्टर इनामदार - घरात कोण कोण असत ह्यांच्या???

गृहस्थ - साहेब, त्यांची बायको फक्त. 

इन्स्पेक्टर इनामदार - अजून काही सांगू शकतात ह्यांच्या बद्दल....

गृहस्थ - नाही साहेब.

इन्स्पेक्टर इनामदार - ठीक आहे. सावंत पटकन हॉस्पिटलची ऍम्ब्युलन्स मागवा आणि बॉडी पोस्टमार्टेमसाठी पाठवा. आणि तुम्ही अजून काही कळल्यास लगेचच आम्हला कळवा. 

(इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत दोघेही बॉडी पोस्टमार्टेमला पाठवून पांडुरंग साठे ह्यांच्या घरी चौकशी करण्यास जातात.दारावरची बेल वाजते.)

इन्स्पेक्टर इनामदार - तुम्ही पांडुरंग साठे ह्यांच्या मिसेस का???

अलका साठे - हो, मीच आहे. आणि तुम्ही इथे कशासाठी आला आहात. आणि माझे पती कुठे आहेत.

इन्स्पेक्टर इनामदार - मला माफ करा. तुमचे पती आता ह्या जगात नाही आहेत. त्यांच्यावर कोणीतरी धारधार सुरीने वार केला आहे. 

(जोरजोरात रडतात.थोड्यावेळाने अलका साठे सांगतात.)

अलका साठे - काय म्हणतात साहेब.

इन्स्पेक्टर इनामदार - हो, मॅडम त्यांचा खून झाला आहे.मी समजू शकतो. तुम्हाला कोणावरती संशय वगैरे???

अलका साठे - नाही साहेब. इनमीन घरात आम्ही दोघे. त्यामुळे आता ह्या जमिनीची देखभाल करणार तरी कोण. म्हणून मालकांनी निर्णय घेतला की, त्यातील पाच एकर जमीन विकून टाकूया. आणि ह्याच गावात विजय साळुंखे नावाचे डॉक्टर आहेत. ह्यांना गावांमध्ये हॉस्पिटल उभारायचे होते, त्यांना जमिनीची नितांत गरज होती. आम्हालासुद्धा जमीन विकायची होती म्हणून आम्ही हा व्यवहार केला.

इन्स्पेक्टर इनामदार - त्यांची कोणाशी दुश्मनी वगैरे?????

अलका साठे - नाही साहेब. ते खूप दयाळू, दुश्मनी तर शक्यच नाही. हा, पण एक सांगू शकते त्यांना अस्थमाचा त्रास होता.

इन्स्पेक्टर इनामदार - ठीक आहे, तुम्ही दोघेच एवढ्या मोठया वाड्यात राहतात का??

अलका साठे - नाही. आमच्याबरोबर एक नोकरसुद्धा राहत होता आणि कालच रात्री त्याच्या आईची तब्येत बिघडली असल्याकारणाने तो त्याच्या गावी निघून गेला. 

इन्स्पेक्टर इनामदार - त्याचे संबंध पांडुरंग साठे ह्यांच्याशी कसे होते??

अलका साठे - चांगले होते. गरीब होता बिचारा. ह्यांच्या मित्राच्या ओळखीचा. गरीब म्हणून आम्ही ठेवून घेतलं त्याला कामावर. आमची सगळी काम करायचा. 

इन्स्पेक्टर इनामदार - ठीक आहे. मला तुमच्या नोकराचा पत्ता भेटू शकेल???

अलका साठे - हो, नक्की. साहेब कृपया करून लवकरात लवकर माझ्या पतीच्या खुनाचा शोध लावा. 

इन्स्पेक्टर इनामदार - हो, मॅडम नक्की तुमच्या पतीच्या खूनाचा शोध लावीन तुम्ही अजिबात काळजी करू नका.

(इन्स्पेक्टर इनामदार आणि सावंत दोघेही प्रथम डॉक्टरकडे चौकशी करण्यास जातात .)

इन्स्पेक्टर इनामदार - डॉ. विजय साळुंखे का???? तुमच्याशी थोडं बोलायचं होत.....

डॉ.विजय साळुंखे - हो, मीच या ना साहेब.

इन्स्पेक्टर इनामदार - गावातील पांडुरंग साठे ह्यांना आपण ओळखतां का?????

डॉ.विजय साळुंखे - हो........

इन्स्पेक्टर इनामदार - कशी तुमची ओळख झाली हे तुम्ही सांगू शकतात.

डॉ.विजय साळुंखे - हो नक्कीच. काही दुखलं - खुपलं कि माझ्याकडेच यायचे उपचारासाठी.....

इन्स्पेक्टर इनामदार - बस्स…एवढीच ओळख. ह्या पलीकडेसुद्धा तुमच्या दोघांमध्ये जमीनीचा व्यवहार????

डॉ.विजय साळुंखे - हो हो... नक्कीच तो व्यवहार आमचा पूर्ण झालेला आहे.

इन्स्पेक्टर इनामदार - ठीक आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. ज्याच्याबरोबर तुमचा व्यवहार झाला आहे त्याचा खून झाला आहे.

डॉ.विजय साळुंखे - काय म्हणता साहेब…. कधी आणि कसा झाला????

इन्स्पेक्टर इनामदार - त्याच चौकशीसाठी आम्ही आलो आहोत त्याचा एका धारधार शस्त्राने त्यांचा खून करण्यात आला आहे.

डॉ.विजय साळुंखे - साहेब, ज्याने कोणी हा खून केला असेल त्या नराधमाला लवकर पकडा. आणि माझी काहीही मदत लागली तर नक्की सांगा…

इन्स्पेक्टर इनामदार - ठीक आहे.

(इन्स्पेक्टर इनामदार आणि सावंत निघत असताना त्याच लक्ष कचऱ्याच्या डब्यात जात त्यात तुटलेला पंप दिसून येतो, तेव्हा ते मागे फिरतात.)

इन्स्पेक्टर इनामदार - तुम्हाला दम्याचा त्रास आहे का???

डॉ.विजय साळुंखे - नाही.. असं का विचारलं??? ओह्ह, त्या पम्पबद्दल. actually, तो माझ्या एका रुग्णाचा आहे. बिघडला असल्याकारणाने मी तो कचरायाच्या डब्ब्यात फेकून दिला.

इन्स्पेक्टर इनामदार - ठीक आहे…

(दोघेही तिथून निघून जातात. आणि नोकराचा शोध घेण्यास पुढे सरसावतात.)

इन्स्पेक्टर इनामदार - इथे नंदकुमार जोशी कुठे राहतात???

रस्त्यावरील गृहस्थ - साहेब, इथून डाव्या बाजूला एक प्रशस्थ मैदान लागेल तिथून ५ घर सोडली की, सहावं घर नंदकुमार जोशींचं…

इन्स्पेक्टर इनामदार - ठीक आहे. 

(इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत आता नंदकुमार जोशीच्या घरी जातात.)

इन्स्पेक्टर इनामदार - मला नंदकुमार जोशी ह्यांना भेटायचे आहे???

हरिभाऊ जोशी - हो, साहेब नंदकुमार जोशी इकडेच राहतो. मी त्याचा बाप आहे हरिभाऊ जोशी. नंदकुमार हा पांडुरंग साठे ह्यांच्याकडे कामाला आहे. महिन्यामध्ये एक दिवस इकडे आम्हाला भेटायला येतो. अरे! नंदकुमार तुला विचारण्यास पोलीस आले आहे.

नंदकुमार - साहेब, काय झालं??

इन्स्पेक्टर इनामदार - हे बघ, भोळेपणाचा आव आणू नकोस. तू ज्यांच्याकडे काम करतो त्याचा खून झालेला आहे. त्याच्या चौकशीसाठी तुला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायला आलो आहे. 

नंदकुमार - नाही साहेब, मी काहीच केलं नाही आहे. मला त्याच्या खूनाबद्दल काही माहित नाही आहे. 

इन्स्पेक्टर इनामदार - तू आमच्याबरोबर येतो आहेस कि नाही, नाहीतर आमच्याकडे दुसरेपण मार्ग आहेत. 

(इन्स्पेक्टर नंदकुमारला पोलीस स्टेशन मध्ये आणतात. रितसर पद्दतीने त्याला विचारतात पण तो काही कबुलीजवाब देत नाही. त्यामुळं त्याला थोडी मारहाण करतात.त्यानंतर तो अगदी पोपटासारखा बोलू लागतो.)

नंदकुमार - साहेब, सांगतो. बाईसाहेबांनी तुम्हाला अर्धसत्य सांगितलं आहे, माझ्या आईची तब्येत ठीक नाही. पण त्याकरिता माझ्याकडे तिच्या उपचाराकरता पैसे नाहीत म्हणून मी त्यादिवशी मालकांकडे पैसे मागितले. पण त्यांनी देण्यास नकार दिला. शेवटी नाईलाजाने मला त्यांच्या घरात ५० हजार रुपयाची चोरी करावी लागली. हे मालकाच्या लक्षात आले आणि त्यांनी लगेचच मला कामावरून काढून टाकले हे बाईसाहेबाना माहीत नाही. 

इन्स्पेक्टर इनामदार - म्हणजे तूच खून केला तर स्वतःच्या मालकाचा आणि पैसे घेऊन फरार झाला. 

नंदकुमार - नाही साहेब. मी नाही केला मी खरं बोलतोय. पण त्याच्याबाबतीत मला एक गोष्ट माहीत आहे. मी निघताना असं ऐकलं, साहेब कोणाशीतरी फोनवर बोलत होते.

"मला तू अर्धेच पैसे दिलेस पूर्ण कधी देणार आहेस" एवढेच मी ऐकलं. 

हवालदार सावंत - साहेब, ह्याच्या झडतीत एक कंगवा सापडला आहे. तो पुढील बाजूने कंगवा असून मागली बाजूने टोपण खाली केल्यास छोटंसं धारधार शस्त्र आहे. 

इन्स्पेक्टर इनामदार - (दोन-तीन कानाखाली पेटवून) हे तुझंच आहे ना. बोल ना.आता काय झालं.

नंदकुमार - नाही साहेब. खरंच मी काही केलं नाही आहे.

इन्स्पेक्टर इनामदार - काहीच केलं नाहीस तर हे तुझ्याकडे कस आलं.

(तेव्हाच डॉक्टर शिंदेचा फोन इन्स्पेक्टर इनामदार ह्यांच्या मोबाईलवर येतो.)

इन्स्पेक्टर इनामदार - पोस्टमार्टेम रिपोर्ट मध्ये काही कळले का????

डॉक्टर शिंदे - हो. त्यांचा खून झाला आहे. त्यांना अस्थमाचा त्रास होता.

इन्स्पेक्टर इनामदार - हो, मला त्यांच्या पत्नीकडून कळलं. पण त्याचा गळा कापून खून झाला आहे ना????

डॉ.शिंदे - नाही. खुनी फार चलाख आहे आणि त्याने दिशाभूल करण्यासाठी केल आहे.

इन्स्पेक्टर इनामदार - म्हणजे????

डॉ.शिंदे - रात्री साधारण १०च्या सुमारास त्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. आणि नंतर दोन तासांनी दिशाभूल करण्यासाठी त्याचा गळा कापण्यात आलेला आहे.

इन्स्पेक्टर इनामदार - बापरे! म्हणजे खून दोन तास अगोदर झालेला आहे आणि तो पण गुदमरून....

डॉ.शिंदे - आणि इनामदार साहेब, एक सांगतो, जो कोणी खुनी आहे त्याला माहित आहे कि, त्यांना अस्थमाचा त्रास होता ते.

(इन्स्पेक्टर इनामदारांनी डॉ.विजय साळुंखे ह्यांच्याकडे तुटलेला पंप बघितला आणि त्यांच्या लक्षात आले, अर्धा पंप तर डॉक्टरांकडे बघितला. नोकरांकडून काही पैश्या बाबतसुद्धा साठ्येच्या बाबतीत ऐकले होते. तर एकदा तलाठी ऑफिसला जाऊन जमिनीसंदर्भातील व्यवहाराबाबत माहिती काढूया. आता इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत दोघेही तलाठी ऑफिसमध्ये जातात.)

इन्स्पेक्टर इनामदार - साहेब, मला पांडुरंग साठे आणि डॉ.विजय साळुंखे ह्यांच्यातील जमिनीबद्दलच्या व्यवहाराची माहिती हवी आहे????

तलाठी ऑफिसर - हो, नक्की. त्या दोघांमध्ये व्यवहार झाला आहे पण पैसे अर्धेच दिले गेले आहेत.

इन्स्पेक्टर इनामदार - काय??? अजून काही तुम्हाला ह्याबद्दल माहिती आहे.

तलाठी ऑफिसर - नाही. तुम्ही आमच्या रेकॉर्ड मध्ये तपासू शकता.

इन्स्पेक्टर इनामदार - ठीक आहे.

(इन्स्पेक्टर इनामदार स्वतःशीच पुटपुटतात. "तो डॉ. खोटं का बोलले"?? तो पंप जरी बिघडला असला तरी तोडायची गरज काय होती. आणि डॉक्टरांना साठेयच्या अस्थमाबद्दलची माहिती सुद्धा असणारच. डॉक्टर आपल्याला गुमराह करतात आणि आपण चुकीच्या माणसाला आत टाकलंय असं वाटतंय.ताबडतोब इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत आपली गाडी डॉक्टरांच्या क्लीनीक कडे वळवतात. आणि बघतात तर काय, डॉ.विजय साळुंखे निघण्याच्या गडबडीत असतात. तेव्हाच इन्स्पेक्टर इनामदार ह्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन येतो.)

अनोळखी व्यक्ती - साहेब, आम्ही एका डेडबॉडी खाडीत फेकलेल्या माणसाचा व्हिडिओ काढला आहे.

इन्स्पेक्टर इनामदार - हो, पाठवा लवकरच.....

इन्स्पेक्टर इनामदार - डॉ.कुठे चाललात???

डॉ.विजय साळुंखे - काही नाही. emergency केस आहे तिथेच चालो आहे.

इन्स्पेक्टर इनामदार - चला, पोलीस स्टेशनमध्ये..

डॉ.विजय साळुंखे - तुमच्याकडे काही पुरावा वैगरे????

इन्स्पेक्टर इनामदार - चला, पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला सर्व पुरावे दाखवतो. तुमचे सगळे कारनामे कॅमेरामध्ये कैद झालेले आहेत. तेव्हा आता चला ह्यातून तुमची सुटका नाही.

डॉ.विजय साळुंखे - (तेव्हा पटकन डॉ.बोलून जातात) तिथे एकही CCTV कॅमेरा नाही.

इन्स्पेक्टर इनामदार - हे सगळं तुम्हाला माहित होत. तुमच्या माहितीकरता सांगतो, तुम्ही डेड बॉडी जेव्हा खाडीमध्ये फेकत होतात तेव्हा एका जोडप्यान निसर्गाचा व्हिडिओ करता करता तुमचाही सुंदरपद्दतिने व्हिडिओ केलेला आहे. तो आमच्याजवळ आहे. आता सगळं कबूल कर नाहीतर तुला चांगलाच चोप देतो.

डॉ.विजय साळुंखे - हो, मीच केला त्या म्हाताऱ्याचा खून… वीट आला होता. सारखा आपला फोन करून विचारायचा. "कधी देणार उरलेले पैसे"सारखं आपलं त्या म्हाताऱ्याचं पैसे नि पैसे.. कुठून आणून उरलेले पैसे. सांगितलं देतो पैसे. सध्या जेवढे होते तेवढे सगळे दिले. बाकीचे जसे मिळतील देईन. ऐकना म्हातारा . शेवटी राग अनावर नाही झाला. शेवटी मनाशी निश्चय केला की ह्या म्हाताऱ्याचा काटा काढायचा म्हणून.. त्यादिवशी रात्री मला त्याचा फोन आला.

"हे बघा, तुम्ही माझे सगळे जमिनीचे पैसे द्या अन्यथा माझी जमीन मला परत करा. साहेब अशावेळी काय करायचं मी,मी त्या जागेवर हॉस्पिटल उभारण्याचे बांधकामसुद्धा चालू केलं होत. माझा लाखो पैसा त्यात लागला होता.

इन्स्पेक्टर इनामदार - पुढे बोल????

डॉ.विजय साळुंखे - त्याच दिवशी रात्री संतापाने माझ्याकडे आले आणि म्हणाले, जर तू पूर्ण पैसे दिले नाहीस तर मी पोलीस मध्ये जाईन. माझ्यासारख्या विद्वान डॉक्टरला पोलिसांची धमकी.मी संतापलो, प्रथम मी त्याचा गळा दाबला. मला माहित होत की, त्यांना अस्थमाचा त्रास आहे ते. आणि दिशाभूल करण्यासाठी मी धारधार शस्त्राने त्याचा गळा कापला. आणि डेड बॉडी खाडीत फेकून दिली. आणि त्याच दिवशी रात्री मला नंदकुमार भेटला, त्याने मला त्याच्या बाबतीत घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्याचं सांत्वन करण्यास त्याला मिठी मारत असताना त्याच्या खिशामध्ये ते धारधार शस्त्र टाकलं.जेणेकरून खुनी सापडला तरी त्याचं पूर्ण शक नोकरावर जावं.

इन्स्पेक्टर इनामदार - तुला तर फाशीच झाली पाहिजे. चला रे घेऊन चला ह्याला कोर्टात….

(इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत डॉ.विजय साळुंखे ह्यांना बेड्या ठोकतात.)


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime