Sagar Bhalekar

Inspirational Others

4.3  

Sagar Bhalekar

Inspirational Others

पहिला प्रवास-विमानाच्या सफरीचा

पहिला प्रवास-विमानाच्या सफरीचा

4 mins
277


        आपण अनेक मोठया मोठ्या लेखकांनी लिहिलेली प्रवासवर्णन वाचली असतील व त्याचा मनसोक्त आनंदही घेतला असेल. त्यामुळे माझ्यासारख्या एक नवशिक्या लेखकाने प्रवासवर्णन लिहावे हे थोडेसे धाडसच होतेय याची मला जाणीव आहे. पण एखादा प्रवास किती मजेशीर होऊ शकतो याची एक झलक म्हणून हा लेखनप्रपंच. या प्रवासातील सर्व घटनाच इतक्या मजेशीर होत्या कि आज जवळ जवळ वर्ष झाले तरी हे प्रसंग माझ्या पूर्ण आठवणीत आहे.

       माझं एका संस्थेतर्फे अनेकदा हैद्राबादला जाणं व्हायच.नेहमी मी रेल्वेने प्रवास करायचो. पण कुणासठाऊक आम्ही ठरवलं ह्या वेळेला की आम्ही विमानाने प्रवास करायचे. चला तर वेळ ठरली ती फेब्रुवारी ७, २०१९. हैद्राबादला निघायची लगबग. पहाटे ५.१५ चे स्पाईसजेट विमान पकडायची घाई. साधारणपणे एक तास अगोदरच विमानतळावर पोचणे आवश्यक होते. चिंता नव्हती की आम्हाला डोमेस्टिक हवाई तळावर विमान पकडायचे असल्यामुळे आमचा त्यात अधिक वेळ जाणार नव्हता. कारण तळ हा हायवे पासून जवळच होता. एक तास अगोदर पोचण्याचे कारण म्हणजे विमानात प्रवेश देण्यापूर्वी सिटीरुकी चेक केला जातो, तो पार पडणे गरजेचे आहे.

      विमानात बसायचं हा माझा पहिलाच अनुभव आणि वेळ होती. विमानात पाहिलांदाच बसणार होतो म्हणून मला कोण जाणे झोप काही लागत नव्हती. सारखे माझे डोळे त्या भितींवरच्या घडयाळाकडे जात होते, की कधी एकदाचे रात्रीचे १ वाजतात आणि मी विमानतळावर जाण्यासाठी पोहचतो आणि विमानात बसतो असें झाले होते. विमानात बसल्यावर ते वर जाताना, कसे बरे वाटणार आणि काय अनुभव येणार ह्याची मनाला हुरहूर लागली होती. वरती गेल्यावर सगळीकडे ढग दिसतात आणि एवढ्या उंचीवर असल्याकारने खाली काहीच दिसत नाही हे मी ऐकून होतो. हैद्राबादचा प्रवास हा माझा दीडदोन तासांचा प्रवास. ह्या दीडदोन तासांत काय होणार ह्याची मनांमध्ये विचारधारा चालू झाली. नेहमी मी जमिनीमधून आकाश पाहत आलो, पण आता मी आकाशमधून जमीन बघणार होतो. पायलट कशापद्दतीनें हवेमधून मार्ग काढेल. त्याला मुंबई ते हैद्राबाद हवेतून मार्ग मिळेल ना अश्या नानाप्रकारचे बालिश प्रश्न उभे राहत होते. मनाची घालमेल आणि चिलबिचल चालू होती. आणि मनामध्ये एक प्रकारचा आनंदही दाटला होता. ह्या हैद्राबाद सफारीने माझ्या सर्व शंकांचे निरसन होणार होते आणि मला प्रत्यक्षात हवाई सफारीचा आनंदही लुटता येणार होता.

     रात्री एकचा आलार्म वाजला आणि मी खडबडून जागा झालो. माझी प्रवासाला जाणायची लगबग चालू झाली. कसेबसे सर्व कार्यक्रम आटपले आणि मी एकदाचा पहाटेचे ४ वाजता विमानतळावर पोहचलो. लगेचच स्पाईसजेटच्या तिकिटकॉउंटरवर गेलो आणि तिकीट दाखवलं आणि मी बोअर्डींगपास घेतला आणि सिटीरुकी साठी प्रयाण केले. सिटीरुकी म्हणजे आपण आपल्या विमानाचे टर्मिनल शोधायचे आणि चेक-इन डेस्ककडे जायचे. चेक-इन डेस्ककडे पोहोचल्यानंतर आपले सामान तपासले जाणार आणि मग तपासून झाल्यावर आपला E-बोर्डिंग पास बनवला जाणार. पण खरंच सिटीरुकी मध्ये आमचा जवळ जवळ अर्धा तास गेला.सिटीरुकी करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे एअरपोर्ट वरील दहशतवादी हल्ले, होणारे बॉम्बस्फोट रोखण्यासाठी केला जातो.

     आता पुढची तयारी विमानात बसण्याची. त्यामुळे तेथून आपण पुढे लाउंज मध्ये जातो आणि मग आपण आपल्याला ईच्छित विमानाच्या बोर्डिंग गेट कडे रवाना होतो. पुढे आम्ही गेट नंबर २८ कडे रवाना झालो. कधी एकदाच विमान येत आहे आणि आम्ही विमानात बसतोय असं झालं होत, मनाची चलबिचल खूप होत होती. आणि तिकडे पहिले तर भली मोठी रांग लागलेली. त्या रांगेमध्ये आम्ही नंबर लावला. थोड्यावेळाने बोर्डिंग पास दाखवून आम्ही विमानाच्या आत शिरलो .आता थोडी मनाची चलबिचल थांबली. केवढं ते मोठं विमान आणि एवढ्या उंचीवरून हे विमान एका अंतरावरून दुसऱ्या अंतरावर पोहचवते. आत शिरल्यावर आम्ही लगेचच स्थानापन्न झालो आमच्या जागेवर. त्यानंतर आमचे स्वागतकरण्यासाठी दोन हवाई सुंदरी आल्या. खरोखरच त्या खूप सुंदर, सडपातळ बांधा, डोक्यावर गांधी टोपी घातलेल्या त्या दोन तरुणींनी आमचे स्वागत खूप छान पद्धतीने केलं. संपूर्ण लाल गणवेश त्यानी परिधान केला होता. आता मनामध्ये खूप प्रकारचे विचार होतेच. आता पुढीलअनुभव कसा असणार ह्याची उत्सुकता लागून राहिली होती.लगेचच विमानाचा दरवाजा बंद झाला आणि सर्व माणसे आपापल्याला जागेवर स्थानापन्न झाली. थोड्यावेळाने हवाई सुंदरीने घोषणा केली की, तुमच्या जवळचे लॅपटॉप, मोबाईल वैगरे बंद ठेवावेत. व सगळ्यांनी आपल्याला खुर्चीचे बेल्ट बांधून घ्यावेत. बरोबर ५.१५ वाजता आमच्या विमानचे इंजिन सुरु झाले. पायलटने एक वळसा मारून विमान रनवेकडे घेण्यास सुरुवात केली. मन बैचैन होत होते. थोड़याचवेळात आम्ही आकाशात असणार. ह्या गडबडीत अर्धा तास निघून गेला आणि रनवे एकदाचा मोकळा झाला. इंजिनचा आवाज जोरात होऊ लागला आणि आमचं विमान धावपट्टीवर जोरात धावू लागले. थोड्याचवेळात आमचे विमान आकाशात झेप घेऊ लागले, आणि विमानेने धावपट्टी सोडली. मनात खूप भीती दाटून आली. पुढे जवळ जवळ १० मिनीटांनी आमचे विमान आकाशात स्थिरावले. सगळ नीट झाल्यावर हवाई सुंदरीने "सेफ्टी रूल्स" बद्दल प्रत्यक्ष करून दाखवले. हा खेळ जवळ जवळ १० मिनटे चालला. माझी सीट खिडकीलगत असल्याकारणाने मला संपूर्ण प्रवास हा खिडकी बाहेरील दृश्य बघून करता आला. बाहेरील दृश्य बघत कसा माझा दीडदोन तासांचा प्रवास कधी संपला कळलंच नाही मला. खाली जमीन, नद्या, डोगर, उंच उंच इमारती, बाजूला ढग, त्या ढगांमधून वाट काढत जाणार आमचं विमान. अशाप्रकारे एक नवीन अनुभव माझ्या पदरात पडला.

     थोड्याच वेळात हवाई सुंदरीने घोषणा केली की, दहा मिनीटात आपण हैद्राबाद कडे प्रस्थान करणार आहोत. आता विमान विमानतळावर कसे उतरणार ह्याची चिंता मला सतावत होती. हाही माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. ह्याची मी उत्सुकतेने वाट बघत होतो.पुढच्या १० मिनिटांत आमच्या विमानाने लॅन्ड घेतलं. विमानामधील आणि जमिनीमधील अंतर आता कमी होऊ लागले. आणि विमानाचा टायर आता जमिनीला लागू लागला. थोड्यावेळाने विमान बाजूला थांबले, आणि सर्व प्रवासी खाली उतरू लागले. हा सर्व प्रवास मी माझ्या कॅमेरा मध्ये बंदिस्त केला आणि हा अनुभव कधीतरी घेता येईल, ह्या आशेने आम्ही आमचा विमान प्रवास संपवला.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational