Sagar Bhalekar

Others

4.3  

Sagar Bhalekar

Others

लग्नानंतरची एक आठवण

लग्नानंतरची एक आठवण

8 mins
453


रोहन आणि प्रीतीचे नुकतेच लग्न झालेले होते. दोघेही हनिमून करिता महाबलेश्वर येथे फिरण्यास आले होते. दोघेही आपल्या संसारी जीवनाचा खूप आनंद घेत होते. दोघांची आनंदांत रात्र निघून गेली. तेव्हाच रोहनच्या फोनची रिंग वाजली.रोहनने फोन उचलला.


रोहन: हॅलो, कोण बोलत आहे आपण?


टूर मॅनेजर: रोहन देशपांडे तुम्हीच का.तुम्ही मधुचंद्र ट्रॅव्हल्स मधून हनिमूनच package घेतलं आहे ना महाबळेश्वरच्या ट्रीपसाठी.


रोहन: हो.


टूर मॅनेजर: त्या संदर्भात मला काही बोलायचं आहे. तुम्ही मला थोडा वेळ देऊ शकाल का?


रोहन: हो, बोला ना.


टूर मॅनेजर: उद्या तुम्हला आमची एक गाडी तुम्हा दोघाना हॉटेलवर घ्यायला येईल. फक्त एक प्रॉब्लेम आहे. तुमच्यासारखेच अजूनही काही लोक तुमच्याबरोबर फिरणार आहेत. तर तुम्ही त्यांच्याबरोबर गाडीमध्ये comfortable असाल का?


रोहन: ठीक आहे. किती लोक आहेत आणि किती सीटरची गाडी आहे.


टूर मॅनेजर: सर, ४ ते ५ सीटरची गाडी असणार आहे. तुमच्या बरोबर गाडी शेअर करताना अजून दोन व्यक्ती असतील. तर तुम्हला चालेल का.


रोहन: ठीक आहे.


टूर मॅनेजर: धन्यवाद. उद्या तुम्ही सकाळी १०च्या आत नाश्ता करून रेडी राहा. आमची गाडी हॉटेलच्या गेटपाशी उभी राहील.तुम्ही वेळेत या.


रोहन:थँक्स.


दुसऱ्या दिवशी सकाळी रोहनने मोठ्या आवडीने कुर्ता घेतलेला तो प्रितीने मोठ्या हौशीने घातला. तिने जो कुर्ता परिधान केलेला त्यात ती खूप गोड दिसत होती. रोहनने प्रीतीला सुंदर दिसण्याचा इशारा केला आणि बोलला " तुझ्यावर हा कुर्ता खुप खुलून दिसत आहे." त्याला प्रीती म्हणाली, म्हणजे काय दिसणारच खुलून, एवढ्या प्रेमाने जो दिलाय तुम्ही मला. ह्यावर हसून रोहन आणि प्रीती दरवाज्याला कुलूप लावून नाश्त्यासाठी गेले.


प्रेम म्हणजे काय असत


त्याने हसून एकदा तिला विचारले


प्रेमा मध्ये फुलतात रंगीन फुले


प्रयत्नाने होतात सारे मार्ग खुले


त्याला नि तिला हवा असतो सहवास


सुखाचा एकांत आणि प्रेमाचा सुहास


प्रेम म्हणजे जीवनभरची साथ


जणू निर्जन वाटेवर आधाराचा हात


प्रेमात हसणं सगळ्यांनाच जमत नसतं


कारण प्रत्येकाला ते सुख मिळत नसत.


नाश्ता करता करता प्रीतीच्या फोनची रिंग वाजली. प्रीतीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. अरे! बाबाचा फोन. प्रितीने दोघेही आम्ही आनंदित आहोत अशी खुशाली सांगितली. नाश्ता करून रोहन आणि प्रीती बाहेर पडताक्षणीच गाडी पार्किंग लॉट मध्ये गाडी पार्क करून त्या दोघांचीही वाट बघत ड्राइवर उभा होता. तितक्यात ड्रायव्हरने रोहन देशपांडे म्हणून हाक दिली. रोहनने हात दाखवत त्याला इशारा केला. येत आहोत म्हणून. आणि दोघेही गाडीत बसले. दहा मिनिटांनी ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि सांगितले ह्याच हॉटेलमधून काही अजून लोक तुमच्या बरोबर प्रवास करायला येणार आहेत.समोर बघताक्षणीच अजून रिकाम्या दोन गाड्या उभ्या राहिल्या. दहा मिनीटांनी सर्व जण आले आणि त्या दोन गाड्यामध्ये विभागून बसले आणि शिल्लक राहिलेले दोन जणांना ड्राइव्हरने रोहन आणि प्रीतीच्या गाडीत घेतले. आता त्याच्या सफरीला सुरुवात झाली. तेथील रस्ते नागमोडी वळणाचे आणि डोगराळं होते असे वाटत होते जणू आकाशपाळण्यात बसल्यासारखेच वाटत होते. प्रीतीच्या बाजूला आजी बसलेली. आणि गाडी डावे उजवे वळण घेऊन भरदार वेगाने जात असल्याकारणाने सर्वाचा तोल जात होता. सारखी ती आजी प्रीतीकडे रागाने पाहत होती. प्रीती म्हणाली आता गाडीचं नागमोडी वळणाने चालली आहे.


पहिलं ठिकाण महाबळेश्वर मंदिर होत. दोघेही गाडीतून उतरून दर्शनास निघाले. ते मंदिर थोडं उंच होत आणि चालत जाताना तीन रस्त्याच्या दुतर्फा छोटी छोटी दुकान होती. दुकान बघत बघत ते मंदिरात पोचले. ऐतिहासिक नोंदीनुसार महाबळेश्वर मंदिर 1215 मध्ये बांधले गेले. या मंदिरात शिवाचा पलंग, डमरू आणि त्रिशूल असून ती अंदाजे ३०० वर्षे जुनी होती.महाबळेश्वर मंदिराच्या बाजूला रामदासी मठ आहे. हे सर्व बघून झाल्यावर दोघेही गाडीत येऊन बसले. त्यानंतर प्रीतीला ड्रायव्हरचा आवाज ऐकू आला म्हणून तिने खिडकीबाहेर डोकावून बघितले, बघते तर काय आजीबाई ड्रायव्हरचे कान भरत होती. हे दोघेही प्रत्येक वेळी एकत्र का बसतात. आम्ही जसे तीन गाड्यामध्ये विभागलों आहोत. तसेच त्यानाही विभक्त करा. हे प्रितीने रोहनला सांगितले, तेव्हा तिच्या बोलण्याकडे कानाडोळा करत त्याने घरी फोन लावला. आणि घरची खुशाली विचारली.


दहा-पंधरा मिनीटांनी सर्व जण दर्शन घेऊन आपापल्या गाडीत बसत होते. तेवढ्यात ड्रायव्हरने खिडकीवर knock करत दरवाजा उघडण्यास सांगितले. सर, तुम्ही पुढे बसाल का. असं आजीच म्हणणं आहे. तेव्हा रोहन बोलला, ठीक आहे. हे ऐकताच आजीने ड्रायव्हरला इशारा केला. नाही म्हणून त्या दोघांनाही वेगवेगळ्या गाडीत बसायला सांग. असं सांगून माझी मोठी लेक इकडे बसणार आहे असे कारण दिले. ड्राइवर रोहनला म्हणला, सर तुम्ही वेगळ्या गाडी बसतात का? तेव्हा रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. तो गाडीमधून बाहेर आला.


"हे काय चाललंय तुमचे? एकतर आम्ही गाडी शेअर केली आहे." त्यानंतर तुम्ही पुढे बसायला सांगितले आणि आता बोलत आहेत वेगळ्या गाडीत बसू मी. आणि माझी बायको ह्या गाडीत. हे कस शक्य आहे. पैसे दिले आहेत फुकट प्रवास नाही करत आहेत. तुमची मनमानी चालणार नाही. आम्हला आताच्या आता हॉटेलवर सोडा दोघाना.हा आवाज ऐकताच मुख्य ड्राइवर पुढे आला आणि म्हणला, काय चाललंय? तेव्हा रोहनने घडलेला सर्व प्रसंग सांगितला.


सर्व जण उपस्थित होते तेव्हा मुख्य ड्राइवर म्हणाला, हे बघा हे हनिमून couple आहे. त्यांना वेगवेगळं बसवता येणार नाही. हे ऐकताच सर्वाना त्याची आज्ञा पाळणं बंधनकारकच होत. हे ऐकताच प्रीतीचा जीव भांड्यात पडला आणि तिने सुटकेचा श्वास घेतला. हे सर्व हाताची घडी घालून आजी निमूटपणे बघत होती. तिला तिच्या मुलींनी भरपूर समजावले. तू असं का करतेयस तू. बस ना, थोड्यावेळची तर गोष्ट आहे. पण ती काहीकेल्या ऐकेना. कारण तिला तिच्या माणसांसोबत गाडीत बसायचं होत.शेवटी तिची मुलगी आणि जावई रोहन आणि प्रीतीच्या गाडीत बसायला आले.आणि बसताक्षणीच जावयाने रोहनची माफी मागितली.


"सॉरी, आमच्या सासूबाईमुळे तुम्हला त्रास झाला. काय करणार तिचा स्वभावच तसा."


ठीक आहे. झाले ते झाले. आता ते प्रतापगडाच्या दिशेने त्यांनी वाटचाल केली. शेजारी बसल्यामुळे रोहनने प्रीतीच्या खांद्यावरून हात टाकून आपल्या जवळ घेतले. आणि दोघांनी मिळून सेल्फी काढल्या. 

कळीचं फुलणं हा तर तिचाच गुण 

वेड्या कवींसाठी मात्र ती प्रेमाची खूण.

पाखराचे बोल कुणासाठी गाणे

कुणी येऊ धुंदी कोणी येई तराणे..

कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद 

कुणी शोधे राधा कुणी शोधे मुकुंद...

     आता त्याची गाडी प्रतापगडाच्या दिशने धाव घेत होती आणि प्रत्येकला जोराची भूक लागली होती. ड्रायव्हरने सांगितले एखाद्या चांगल्या हॉटेल मध्ये मी गाडी थांबवतो. सर्वजण तुम्ही जेवून घ्या. कारण प्रतापगढ बघायला खूप उशीर होईल. सर्वानी होकाराथी मान डोलावून गाडी बाहेर पडले. सर्व जण हॉटेल मध्ये खुर्ची पकडण्यास सरसावले. पुढे जाऊन प्रितीने खुर्ची पकडली आणि रोहनला हाथाने इशारा केला. आता जेवायला काय मागवायचे ह्या विचारात दोघांनीही मेनू कार्ड मध्ये डोके घातले होते. त्यांनी दोन जेवणाच्या थाळी मागवल्या. ऑर्डर येण्यास वेळ होता तेव्हा प्रीतीला तो न्यहाळात बसला तेव्हा त्याच्या मनात विचार सुरु झाला.

    हल्ली तुझं अस्तित्व माझ्यासाठी श्वासाइतकाच अनिर्वाय झालाय. तू काहीही समज पण. माझं आख्ख आयुष्यच व्यापून टाकलाय तू. तुझं असणं आणि नसणं हे माझ्यासाठी दखलपात्र कस? काही कळेनासे झालाय. माझ्या निरास, सपक आयुष्यात तू आलीस आणि माझं समग्र जीवनच बदलून गेलं. रखरखीत उन्हात श्रावणसरी बरसून जाव्या आणि चोहीकडे हिरवळ झाडाची अगदी तसेच काहीस झालंय. तुझी लाघवी बोलणं, मध्येच खळखळून हसणं, रुसणं. सार विलक्षणच.स्नेहबंध जुळले. आणि आता तू कायमची माझी झालीस. आपल्यात एक घट्ट नातं निर्माण झालं. या निनावी नात्याला कशाचीही गरज भासत नाही कि स्वार्थाचा लवलेशही नाही. सर्वकाही पवित्र, प्रेमळ, उत्तोरत्त वाढत जाणार.. आश्वासक दुःख सुखात देखील सोबत राहणार. आठवण तुझी आल्यावर मी होती वेडापिसा, निष्प्रभ लेखणी येते माझ्या मदतीस धावून. तुझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा, हव्याहव्या आठवणींची शिदोरी आनंद देऊन जातात मला.

   रोहन त्याच्या विचारात मग्न झालेला तेव्हाच प्रितीने हाताची टिचकी वाजवून त्याला वर्तमान काळात यायला लावले. काय झाले, कुठे हरवलात? ही काय जेवणाची ऑर्डर आताच आली आहे. चला जेवूया तुम्हला भूक नाही लागली का? रोहन हसला आणि दोघांनी जेवायला सुरुवात केली. दोघांनी जेवताना हास्य विनोद करून जेवण पुरे केले. जेवून आटोपल्यावर सर्व जण गाडीत बसले. आता गाडी थेट प्रतापगडाच्या पायथ्याशी थांबली. पार खिंडीचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्याचे बांधकाम करण्याचे काम मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी १६५६ मध्ये पूर्ण केले. शिवाजी महाराज आणि अफझल खानची ऐतिहासिक प्रतापगडाची लढाई ह्याच किल्ल्याच्या तटबंदीच्या खाली झाली. किल्ल्यावरती खूप जुनी तोफ बघितली. त्या दोघांनी भरपूर किल्ल्यावर फोटो काढले.तळपत्या उन्हाच्या गर्मीत आता प्रीती चालता चालता खूप दमली होती. तिला खूप तहान पण लागली होती. अगदी घसा सुकला होता तिचा. तेव्हाच तिच्यासमोर एक मोठं झाड आलं. आणि तिने विचार केला, रोहनला सांगून थोडा वेळ ह्या झाडाच्या पडणाऱ्या सावलीवर विश्रांती घ्यावी. तसे रोहन आणि प्रीती दोघेही तिथे थोडा वेळ विश्रांती करण्यास थांबले. दोघेही चालूनचालून गडाच्या टोकापर्यंत आले होते. अजून त्याना प्रतापगड फिरायला खूप वेळ लागणार होता. प्रीती आणि रोहन थोडा वेळ झाडाला टेकून त्यांनी डोळे मिटले होते. तेवढ्यातच रोहनला एका वेगळ्या संगीताचा आवाज ऐकू येऊ लागला. दोघेही उठून उभे राहिले बघतात तर काय एक बंजारी समूहाचा काफिला जात होता. ह्याच्याकडे पाणी मिळेल ह्या उद्देशाने प्रीती आणि रोहन त्याच्याकडे विचारयण्यास गेले. 

"बाबा, आम्हला थोडं पाणी मिळेल का तुमच्याकडील?" आम्हला खूप तहान लागली आहे.

हो, मिळेल ना. आणि बाबाने रोहन आणि प्रीतीला पाणी पिण्यास दिले. त्या दोघांची तहान भागली. रोहन आणि प्रितीने त्याचे मनोमनी आभार मानले. आणि त्या बंजारा काफिल्याबरोबरच रोहन आणि प्रीतीने पुढील वाटचालीस सुरूवात केली.

ती काळजाच्या कागदावर दोन शब्द गिरवून गेली 

तो गोड ओठांच्या कळांवर हात फिरवून गेला.

तो विस्कटलेल्या तिच्या मनाच्या तुकडयांना पटकन आवरून गेला 

ती त्याच्या भरकटणाऱ्या पावलांना क्षणात सावरून गेली..

तो तिच्या डोळयांवर खिळणारी तिची नजर घेऊन गेला 

ती त्याच्या ओठांवरच हसू चोरून डोळ्यात अश्रू ठेवुन गेली... 

   आता प्रतापगढ दोघेही उतरू लागले कारण ड्रायव्हरने दिलेली वेळ पूर्ण होत आली होती. सर्व जण गाडीत बसले आणि गाडी हॉटेलच्या दिशेने धावत होती. संध्याकाळ होत आली होती. वाटेतच ड्रायव्हरने गाडी थांबवली. आणि सांगितले सूर्य मावळताना इथून स्पष्ट दिसत आहे तरी कृपया सर्वानी खाली उतरून ही दृश्य आपल्या कॅमेरामध्य कैद करावी. गाडीतून उतरून तो नजारा सर्वाना बघितला. आता सर्व जण थकून गेले होते. प्रीती तर रोहनचा खांदा आधाराला घेऊन झोपी गेली. रोहन मात्र जागा होता, खिडकीमधून निसर्गरम्य दृश्य पाहत होता. थोड्यावेळेने गाडी हॉटेलवर पोहचली. आणि रूमवर जाऊन दोघांनीही सुटकेचा निश्वास टाकला. दोघेही थोडावेळेसाठी झोपी गेले. बेलचा आवाज झाला. रोहनने दरवाजा उघडला तर रूम सेर्व्हन्ट म्हणाला, डिनर रेडी आहे जेवायला या.

हो, ठीक आहे. त्याने प्रीतीला उठवले आणि दोघेही तयारीला लागले. नेहमीप्रमाणे ते डिनर रूम मध्ये गेले. तेव्हा त्याना सांगण्यात आले, डिनरची अरेंजमेंट स्विमिंगपूल पाशी करण्यात आली आहे. तर कृपया करून तुम्ही तिथे स्थानापन्न व्हावे.दोघेही लगेचच तिथे गेले आणि बघितले तिथली अरेंजमेंट काहीतरी वेगळीच होती. तिकडे सगळीकडे कॅण्डल लाईट लावण्यात आले होते.प्रीतीला ते फार सुंदर वाटले एकीकडे स्विमिंगपूल आणि दुसरीकडे जेवण्याची संपूर्ण व्यवस्था आणि तिसरीकडे मनोरंजनात्मक कार्यक्रम करण्यात आले होते. ह्या संधीचा फायदा घेत रोहनने स्टेज वर धाव घेतली आणि त्याने तेथील लोकांना सांगून गाणे गाण्यास सुरूवात केली. हे पाहून प्रीती एकदम थक्क झाली. तिला स्वप्नातही वाटले नव्हते तिचा नवरा इतका सुंदर आणि रोमँटिक असेल. 

मी पहावे तू दिसावे 

पारणे या मनाचे फिटेना 

अंतराची अंतरे ही 

का तरीही सारी मिटेना?

हीच प्रीती, हीच भीती 

वीण दोघातली ही तुटेना

हेच कोडे रोज थोडे

सोडवावे तरी सुटेना. 

रोहनचे गाणे संपल्यावर तिकडे उपस्थित असलेल्या सर्वानी टाळ्या वाजवून रोहनच्या गाण्याला प्रतिसाद दिला. हे सर्व झाल्यावर त्यांनी गप्पा मारत जेवण पूर्ण केले. आणि रात्री जेवल्यानंतर शतपावली करण्यास निघाले. वाटेतच त्यांना हॉटेलच्या परिसरात एक छोटेसे हनुमानाचे मंदिर दिसले. त्यांनी देवाचे दर्शन घेऊन पुढील वाटचाल सुरु केली. आता ते रूमच्या दिशने जाण्यास निघणार तितक्यात प्रीतीला एक झोपाळा दिसला. तिने रोहनने हट्ट केला, आपण पाच मिनिटे तरी त्या झोपाळयावर जाऊया का. रोहनने होकाराथी मान डोलावून ते दोघेही झोपाळ्याकडे गेले. इतके सुंदर वाटत होते, की रात्रीच गार वारा सुटलेला. झोपाळ्यावर दोघेही झोके घेत होता. आणि दुसरीकडून छान गाण्याचा आवाज ऐकू येत होता.


Rate this content
Log in