Sagar Bhalekar

Others

4.0  

Sagar Bhalekar

Others

अपराजित योद्धा रावण.....!

अपराजित योद्धा रावण.....!

3 mins
267


मायावी रावणाचे चांगले गुण 


       वाल्मिकीने रावणाबद्दल रामायण बरोबर पद्मपुराण, महाभारत, कूर्मपुराण, श्री भगवतपुराण ह्याचा उल्लेख मराठी ग्रंथबरोबरच जैन धर्मामध्ये पण उल्लेख केला आहे. भगवान रामचंद्र चा विरोधी किंवा शत्रू असून देखील रावण हा चांगला नव्हता असं नाही, त्यांच्यामध्ये काही चांगले गुणही होते.


१. महापंडित रावण- असं म्हंटल जात, रामची वानरसेना जेव्हा समुद्रतटावर पोहचते.तेव्हा राम रामेश्वरम जवळ आला,आणि तिकडे त्याने विजय होमहवन तयारी केली. त्याची पूर्णाहुती साठी त्याने देवाचा गुरु बृहस्पतीला आमंत्रित केले, पण त्यांनी त्या विजय होमहवनमध्ये येण्यास असमर्थता दाखवली. तेव्हा प्रभू रामने सुग्रीव ला सांगितले, 'तू लंकापती रावणाकडे जा.' तेव्हा सुग्रीव प्रभू रामच्या आदेशावरून लंकापती रावणाकडे गेला. तेव्हा रावण म्हणाला, की, होमहवन पूर्ण करण्यासाठी मी वेळेवर येईन.तेव्हा रावण पुष्पक विमानाने सीतेला घेऊन तिकडं हजर झाला, आणि सीताला रामच्या बाजूला बसायला सांगितलं. रावणाने होम पूर्ण केला आणि रामाला विजयी आशीर्वाद दिला. 


२.शिवभक्त रावण- रावण शिवाचा खूप मोठा भक्त होता. त्याने शिव तांडव स्रोत ची रचना केली आणि अजून बऱ्याच ग्रंधामध्ये शिवची रचना केली. 


३. चांगला शासक- रावणाने राक्षस समाजाला एकत्रित केले आणि त्याच्या हितासाठी खुप कार्य केले. रावण शासन मध्ये जनता सुखी आणि सुमृद्धी होती. सगळे नियम व्यस्थित चालत होते, आणि त्यावेळी कोणाची हिम्मत नव्हती अपराध करायची. 


४. रावणाने लक्षुमणाला वाचवले- रावणाच्या राज्यात सुषेण नामक एक प्रसिद्द वैद्य होता. जेव्ह लक्ष्मणसकट काही वानर बेशुद्ध झाले. तेव्हा जामवंत नावाच्या भालू ने सल्ला दिला की, आता सुषेण नामक प्रसिद्ध वैद्यच लक्ष्मण आणि वानरांना वाचवू शकेल. रावणाच्या आदेशाविना त्याच्या राज्यात कोणताही व्यक्ती आपले कार्य करू शकत नाही.रावणाच्या आदेशांनुसारच सुषेण ने लक्ष्मणाला बघितलं आणि हनुमानाला संजीवनी बुटी आण्यासाठी सांगितले.


५. रावण एक महान वैज्ञानिक- रावण त्याच्या युगातला एक महान वैज्ञानिक होता. आयुर्वैद, तंत्र आणि ज्योतिषच्या क्षेत्रात रावणाचं महत्वपूर्व योगदान राहील आहे. इंद्रजाल सारखी अथर्ववेद विद्येचा शोध ही रावणाने लावला. रावणाच्या राज्यात सुषेण सारखा वैद्य होता. रावण देश विदेश मध्ये मिळणाऱ्या जीवनरक्षक औषधी वनस्पतीची माहिती आणि त्याचे गुणधर्म रावणाला चांगलेच माहित होते. 


६. माता सीतेला हातसुद्धा लावला नाही- भगवान रामाची अर्धागिनी सीता पंचवटी जवळ लंकापती रावणाने तिचे अपहरण करून २ वर्ष आपल्या कैदेत ठेवले, ह्याकाळात रावणाने सीतेला हातसुद्धा लावला नाही. 


७. शास्त्राबद्दल सखोल माहिती- रावणाने शिवची स्तुती तांडव स्रोतांमधून केली त्याव्यतिरिक्त ङ्कप्रकास, इंद्रजाल, कुमारतंत्र, प्राकृत कामधेनु, प्राकृत लंकेश्वर, ऋग्वेद भाष्य, रावनीयम, नाडी परीक्षा आदी ग्रंथचि रचना रावणाने केली. 


८. राजनीती बद्दल माहिती- जेव्हा रावण मुर्तूश्यावर होता, तेव्हा रामाने लक्ष्मणला राजनीती शिकण्यास रावणाकडे जाण्यास सांगितले. जेव्हा लक्ष्मण रावणाच्या डोक्याच्या बाजूस बसला, तेव्हा रावणाने लक्ष्मणला सांगितले, शिकण्यासाठी डोक्याजवळ नाही तर पायाजवळ बसले पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची आणि पहिली शिकवण रावणाने लक्ष्मणला सांगितली. रावणाने राजनीती मधले काही गूढ रहस्य देखील लक्ष्मणला सांगितले.


९. आपल्या सहकार्याच्या रक्षणासाठी प्रतिबद्ध- भगवान रामाचा भाऊ लक्ष्मणने रावणाची बहीण शुर्पनखा हिचे नाक कापले होते. पंचवटीमध्ये अपमानित होऊन शुर्पणखा हिने आपल्या भावास म्हणजे रावणाला झालेली हकीकत सांगितली. त्यावेळी आपल्या बहिणीच्या अपमान बदला घेण्यासाठी रावणाने आपला मामा मारीच ह्याला मदतीस घेऊन सीतेचे अपहरणाची योजना बनवली. रावणाच्या आदेशानुसार मामा मारीचने हरणाचे रूप धारण करून लक्ष्मणला वनात बोलवले आणि लक्ष्मणच्या अनुपस्थिती रावणाने सीतेचे अपहरण केले.                                                         


Rate this content
Log in