Sagar Bhalekar

Others

4.4  

Sagar Bhalekar

Others

फसवणूक

फसवणूक

4 mins
416


       लग्नानंतरची ती पहिली रात्र. तिच्या जवळ नवरा म्हणून जो पुरुष होता, त्याच्या जवळ येण्याचा तिचा तो पहिलाच अनुभव होता. त्या रात्रीविषयी तिच्या मनात काही वेगळ्याच कल्पना होत्या. काहीश्या अस्पष्ट आणि स्वप्नाळू असा कल्पना होत्या. तसेच तिच्या मैत्रिणीसोबतच्या गप्पामधून तिने लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या कल्पना रंगवल्या होत्या. पण तिच्या स्वप्नांचा चकनाचूर झाला. तीच नाव अदिती.लहानपणापासून खूपच हुशार आणि रंगरूपाने खूप काळी पण तिचे मन खूपच सुदंर. तीन भाऊ आणि अदिती एकुलती एक लाडकी बहीण. तीन भाऊ, अदिती आणि आई वडील असं एकत्र कुटुंब. अदितीच्या सगळ्या भावाची लग्न झाली. ते तिघेही आपापल्या संसारात रमले होते. पण ह्या मोठ्या घरात अदितीला खूपच एकट वाटायचं.

कॉलेजच्या दिवसांमध्ये आणि पुढे नोकरीच्या ठिकाणी ती मुलामुलींमध्ये जिवलग मैत्री बघायची. जोडीदाराबरोबर हातात हात घालून आणि खांदयावर विसावणारी मुला-मुलीची जोडी पहिली की तिला असूया वाटायची. मनातल्या मनात पुटपुटयाची "मला असा जोडीदार कधी भेटेल???अदितीच वय सुद्धा वाढत होते, पण लग्न काहीकेल्या जमत नव्हतं. म्हणून घरच्यांना अदितीची खूप काळजी वाटत असें. अदितीला एकटेपणाने घेरले होते.अदिती स्वतःहून नकार कधीच सांगत नसे, पण तिला बघूनच मुले तिला नकार देत असे. अदितीच्या मनात नेहमी एक प्रश्न यायचा, की मी रंगरूपाने काळी असल्यामुळे माझं लग्न जमत नसे. पुरुष अश्या काळ्या मुलीचा तिरस्कार का करतात? माझं रंगरूप बघता, घरच्यांना माझ्यासाठी जोडीदार पाहणं कठीण जात असेल का?? मी आयुष्यभर लग्न न करता राहू का?? मला कधीच लैगिक सुख आयुष्यात मिळणार नाही का??हे असें प्रश्न अदितीला भंडावून सोडायचे.


      अखेरीस ३५ वर्षाच्या अदितीला एका ४० वर्षांतल्या किशोरने अखेर पसंद केलेच. घरातील अगदी सगळेच आनंदी झाले. अदितीच्या चेहऱयावर हसू उमटले. बऱ्याच वर्षानंतर आई वडिलांची काळजी मिटली. पण कोणाला थोडीच माहित होते, हा आनंद अदितीच्या चेहऱयावर फार काळ काही टिकणार नव्हता ते.रीतसर पद्दतीने लग्नाची बोलणी झाली. मोठ्यांची बोलणी झाल्यावर अखेरीस किशोर आणि अदितीला एकांतात वेळ घालवायला मिळाला. किशोर एक इंजिनियर होता, आणि सरकारी कर्मचारी. मुंबईसारख्या शहरात स्वतःचा मोठा प्लॉट.अदिती आपल्या जोडीदारला बघून खूपच उत्साही होती. किशोर मात्र अदितीपासून दोन हात लांबूनच बोलत होता.


अदितीने आपल्या सर्व भावना किशोरला सांगितल्या. पण त्याने तीला काहीच प्रतिसाद दिला नाही, उलट किशोरला तिच्या बोलण्यामध्ये काहीच रस नव्हता. हे बघून अदितीला सुरुवातीला थोडं वेगळंच वाटलं. ह्याबद्दल अदितीने आपल्या आईलासुद्धा ह्या सर्व गोष्टी सांगितल्या. पण आईने एवढचं सांगितले, पहिलीच वेळ असेल. मुलं थोडी लाजतात. थोड्या कालांतराने अदिती आणि किशोर लग्नाच्या बेडीमध्ये अडकले. लग्नाच्या पहिल्या दिवशी अगदी पारंपरिक पद्दतीने अदिती दुधाचा ग्लास घेऊन किशोरच्या खोलीमध्ये गेली. पुढे काय घडणार ह्याची जरासुद्धा अदितीला कल्पनासुद्धा नव्हती. किशोरने अगदी अदितीकडे बघितलेसुद्धा नाही, उलट तो लग्नाच्या पाहिल्यादिवशी खोलीमधून निघून गेला. अदिती मात्र विचारात पडली, असे किशोरने केले का असेल??? मी रंगरूपाने काळी आहे हे तर कारणीभूत नसेल ना ह्या सर्व गोष्टीमागे??अदिती मात्र विचारात पडली.अदितीला वाटले, लग्नाच्या पहिल्या दिवशी माझा नवरा मला मिठीत घेईल, मला खुप स्वप्न दाखवेल. मला घट्ट जवळ घेईल. रात्रभर माझ्यावर प्रेमाची उधळण करेल. पण असे काहीच झाले नाही.


    किशोरने असे वागून अदितीला प्रचंड गोंधळात टाकले. दुसऱ्या दिवशी अदितीने किशोरला विचारले, "तब्येत तर तुमची बरी आहे ना??" त्यावर किशोरने "हो" असे उत्तर दिले आणि तिथून निघून गेला. अदितीला अगदी कळेनासे झाले. म्हणून न राहवता तिने सासूबाईंना विचारले. तर सासूबाईंनी सांगितले, तो लहानपणापासून खूपच लाजरा. शाळेत कॉलेज मध्ये मुलीशी तर बोलणेच नाही. शेवटी तो मुलांच्या शाळेत शिकलेला, आणि बहीण नसल्यामुळं मुलीशी बोलायची सवय नाही. अशी सासूबाईंनी सारवासारव केली.हे ऐकून अदितीला हसायला आले.रोजचे हे असेच चालू राहिले.अदितीच्या मनातलं काहूर काही संपत नव्हतं.तिच्या अस्वस्थेचे कारण शरीरसुख नव्हते. किशोर तिला स्पर्शसुद्धा करायचा नाही. बोलयाचासुद्धा कवचितच.


अदितीला असं वाटू लागले, की कदाचित दबावाखाली येऊन तर किशोरने लग्न केले नसेल ना?? हे कोणाशी बोलायचे तिला कळतसुद्धा नव्हते. माहेरच्या लोकांशी मोकळेपणाने बोलू शकत नव्हती. अदिती खूप आनंदात आणि आपल्या संसारात तीच मन रमल आहे असा त्यांचा समज होता. अदितीच्या सहनशक्तीचा मात्र अंत होत होता. ह्यातून लवकरात लवकर तिला मार्ग काढायचा होता. एकदिवस सासू-सासरे एका कार्यक्रमाला गेले असताना, घरात किशोर आणि अदिती दोघेच होते. किशोर आपल्या खोलीमध्ये पुस्तक वाचत होता, तेव्हाच अदितीने खोलीचा दरवाजा लावला. आणि किशोरला विचारले,"तुला मी आवडत नाही का?? मी बघते तू नेहमी माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. पुरुष स्त्रीच्या सौन्दर्याबद्दल किती बोलतात, पण तुझ्या तोंडातून एक अक्षर नाही. तू कोणाच्या दबावाखाली लग्न केलंस का??? हे ऐकून किशोर थोडावेळ स्तब्ध झाला. आणि म्हणाला, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हीच संधी साधून अदिती त्याच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा एक ही अवयव उत्तेजित झाला नाही. हे सगळं पाहून अदिती समजून गेली,की माझा नवरा नपुसंक आहे तो. ह्यावर किशोरने एकच उत्तर दिले,"तू कोणासोबत सुद्धा संबंध ठेव, माझी काहीच हरकत नाही आहे. उलट त्यातून जन्म देणाऱ्या मुलाला मी माझे नाव लावीन.अशी भयावह कल्पना आतापर्यंत कोणत्याच पत्नीने ऐकली नसेल.


    इथेच सर्व स्पष्ट झाले, त्याने अदितीला फसवले. आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी काकुळतीला येऊन त्याने तिला सांगितले, कृपया करून हे कोणालाच सांगू नकोस, मला घटस्फोट देऊ नकोस. पण अदितीने मात्र निर्णय घेतला घटस्फोट द्या.चा. अदितीच्या अगदी सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. अदितीने आपल्या जोडीदाराबरोबर रंगवलेली स्वप्न मातीत मिळाली. दोन वर्षात अदिती आणि किशोर ह्या दोघांचा घटस्फोट झाला.किशोरने आपल्यामधील असलेला व्यंगदोष लग्नाच्या आधीच जर का अदितीला सांगितला असता, तर आज अदितीचे आयुष्य काही वेगळेच असते. 


Rate this content
Log in