Sagar Bhalekar

Others

4.0  

Sagar Bhalekar

Others

बक्षीस

बक्षीस

4 mins
226


    रोहन आणि प्रीतीचे नुकतेच लग्न झाले होते. दोघेही हनिमून करिता महाबळेश्वरला गेले होते. आज मात्र दोघांचीही शेवटची रात्र होती महाबळेश्वर मधली. उद्या रोहन आणि प्रीती दोघेही परतीच्या प्रवासाला म्हणजे मुंबईला जाणार होते. रोहन आणि प्रीतीला जावंसच वाटत नव्हते. दोघेही झोपाळ्यावर बसून समोरच दिसणारा तलावाकडे पहात होते.रम्य संध्याकाळ,एक अतिशय आवडत गाण आणि ते दोघच…. आज ती अजूनच सुंदर दिसत होती. निळ्या रंगाची कुर्ती आणि पिवळसर रंगाची लेगींग्ज. वाऱ्यावर उडणारे मोकळे केस आणि चेहऱ्यावर नेहमीसारखे स्मित हास्य.कधी तुझ्या जवळून जाताना, तुझ्या श्वासाच्या होणाऱ्या स्पर्शाने सुद्धा विचलित होऊन जातं. खूप बोलावसं वाटत तुझ्याशी... तेव्हा कुठे मन तृप्त होईल असे वाटते.. तुझं वागणं, तुझं बोलणं.. तुझ्या असंख्य नजाकती अनुभवाश्या वाटतात.. असे म्हणतात, लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात. "फक्त ती वेळ यावी लागते तेव्हाच त्याच्या भेटी होतात. भेटीतून असे काही घडले कि त्याचे जीवन बदलून जाते. 

देवाच्या चरणी मागितलेली एक दुवा माझी असेल,

तिथे मागितलेली प्रत्येक खुशी तुझी असेल,

जेव्हापण तुझ्या ह्रदयाला प्रेमाची हाक ऐकू येईल

ती प्रेमाची प्रत्येक हाक माझी असेल.


आज शेवटची रात्र असल्यामुळे रोहनने प्रीतीला एक आठवणीत राहील अशी भेटवस्तू घ्याचे ठरवले. लगेचच रोहन प्रीतीला म्हणाला, मला थोडं काम आहे, तू एक तास थांबू शकशील का? मी लगेचच जाऊन येतो. एक महत्वाची वस्तू घ्याची आहे. प्रीती थोडी चिंतेत पडली. पण नंतर तिने हो तू जाऊन ये. मी थांबते. तसा लगेचच रोहन बाहेर जाण्यास निघाला. झोपाळयावर आता एकटीच प्रीती बसलेली होती. तेव्हा तिला लगेचच मोबाईलवर आईचा फोन आला. 


प्रीतीची आई: काय चालाय. सर्व ठीक आहे ना. आताच आठवण काढली तुझी. आणि आमचे जावईबापू कसे आहेत.

प्रीती: हो, ठीक आहेत. 

प्रीतीची आई: काय मग. कसा आहे स्वभाव जावईबापूचा.

प्रीती: एकदम मस्त! मला खूप समजून घेतात, माझी काळजी घेतात. माझ्यावर प्रेम करतात. खरंच बाबांनी खूप चांगला मुलगा शोधला माझ्यासाठी. तुम्ही सर्व कसे आहात.

प्रीतीची आई: हो, आम्ही सर्व ठीक आहोत. उद्या परतीचा प्रवास. सामानाची बांधाबांध झाली.

प्रीती: हो, आई. तुम्ही सगळे जण काळजी घ्या. मी करते उद्या मुंबईला आल्यावर फोन.

बराच वेळ झाला प्रीती खूप चिंतीत होती. अजून कसा आला नाही रोहन. आतुरतेने वाट बघत होती ती रोहनची. रोहन धापा टाकत प्रीतीजवळ आला. 

प्रीती: काय रे. किती उशीर केलास यायला. मी वाट बघून बघून थकले. आणि हे काय तुझ्या हातात. अरे! छान. हा ड्रेस माझ्यासाठी. 

रोहन: हो, तुझ्यासाठी. आवडला तुला.

प्रीती: हो, खूप. तेव्हाच मागासपासून माझ्यासाठी काहीतरी लपवत होताच. किती सारे अर्थ भेट देत असतात आपल्याला. भेट... हा दोन अक्षरी शब्द सुख, दुःख, आनंद, प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी, आठवण...अजून कितीतरी. खरंच तू दिलेली ही पहिली भेट मी कधीच विसरणार नाही. ह्याची जागा नेहमी


जागा माझ्या हृदयात असेल.

तो क्षण खूप गोड होता 

नजर मिळत नव्हती नजरेला,

काय कळलं काय माहित

तेव्हा माझ्या या वेड्या मनाला.

निरव शांतता होती तिथे 

हृदय धडधडत होत फक्त,

मनातील भावना सुद्धा 

पटकन होत नव्हत्या व्यक्त..

दोघेही अबोल होतो 

अनोळखी होतो एकमेकांसाठी,

माहित नव्हतं जोडले जाऊ 

असे आपण आयुष्यभरासाठी...

 

रोहनने दिलेला ड्रेस प्रीतीला खूप आवडला. त्यादिवशी त्याची शेवटची संध्याकाळ होती. तेव्हा तेथील सेर्व्हन्टने येऊन रोहन आणि प्रीतीला सांगितले, की तुम्ही खेळ खेळण्यास उत्सुक आहात का? दोघांनीही होकाराथी मान डोलवली, आणि लगेचच खेळ खेळण्याच्या जागेवर पोचले. तिकडे रोहन आणि प्रीती सारखे बरेच कपल्स पण आले होते ते ही खेळण्यास उत्सुक होते. खेळ असा होता की, प्रत्येक जोडप्याने पुढे येऊन एखाद्या गाण्यावर नृत्य सादर करावे. आता दोघांनाही टेन्शन आलेले होते. प्रीती म्हणाली, मी शाळेत असताना नृत्य केलेले आता जमेल की नाही हे मी सांगू शकत नाही. त्यावर रोहनने उत्तर दिले मला तर ह्यातले काहीच माहित नाही. तरी दोघांनाही नृत्य करण्याचा प्रयत्न केला.


त्याच्या नावाची announcement करण्यात आली, प्रीती आणि रोहन दोघेही स्टेजवर आले आणि त्यांनी जमेल तसे नृत्य केले. ते दोघे एकमेकांमध्ये एवढे गुंतले गेले की, त्यांना आजूबाजूचा विसर पडला आणि आपण दोघेच आहोत असा भास निर्माण झाला. प्रेक्षकांची सुद्धा त्याच्या नृत्याला दाद मिळाली. प्रीती कॉलेज मध्ये असताना अप्रतिम नृत्य करायची, पण वडिलांच्या धाकामुळे तिने नंतर नृत्य करणं जवळजवळ सोडूनच दिले होते.त्यानंतर तिने रोहन बरोबर नृत्य केले. घड्याळात रात्रीचे १० वाजले सर्वांनी जेवण उरकून घेतले होते. तेव्हा अजून एक अंऊन्समेंट झाली. हा खेळ आपण आपल्या बायको किंवा नवरा बद्दल काही गोष्टी सांगायच्या असतील तर सांगू शकतात सर्वांच्या समक्ष. रोहन आणि प्रीतीची पाळी स्टेजवर येण्याची आली. प्रथम प्रीतीला विचारण्यात आले.


प्रीती: रोहन खूप समजूतदार, प्रेमळ, काळजी घेणारा, मनमिळावू आहे. माझं नशीब एवढं चांगलं की, मला त्याच्याबरोबर आयुष्य घालवण्याची संधी भेटत आहे. मी त्याची खूप आभारी आहे. आणि शेवटी एकच सांगीन.

कधीही काहीही झाले तरी स्वतःला एकटं समजू नकोस,

श्वासात श्वास असेपर्यंत मी नेहमी तुझ्यासोबत असेंन.

आता मात्र रोहनची बारी आली. 

रोहन: " जवळ तिच्या असताना शब्दांना फुटली ना भाषा,

विसरून जात मन माझं सार, अशी तिच्या प्रेमाची नशा..


प्रीती खूप समजूतदार आहे. तिला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला खूप आवडतात. माझ्याकडून मला जेवढं जमेल तेवढं प्रेम मी तिला देण्याचा प्रयत्न करिन. अगदी ती बोली तशी शेवटच्या श्वासपर्यंत मी तिच्यासोबत राहीन. हे ऐकून मात्र प्रीती अगदी भारावून गेली. तिने लगेचच रोहनला सर्वांच्या समक्ष मिठी मारली, आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. शेवटी स्पर्धेचा निकाल व्यासपीठावर असलेले judge ह्यांनी लावला. नाव घेण्यात आले ते रोहन आणि प्रीतीचे. दोघांना खूप आनंद झाला. दोघेही व्यासपीठावर आले आणि त्यांना बक्षीस म्हणून प्रीतीला एक पैठणी साडी आणि रोहनला सफारी देण्यात आली. दोघांनाही ते बक्षीस स्वीकारले. त्यावेळी त्याचे स्वागत टाळाच्या आवाजात झाले. रोहन आणि प्रीती खूप खुश होते.


दुसरा दिवस उजाडला. रोहन आणि प्रीतीला इथून निघावसे वाटतच नव्हते. पण तिकडे आपले नातेवाईक, आई व वडील आपली आतुरतेने वाट बघत होते. शेवटी दुपारच्या सुमारास त्यांनी मुंबईसाठी बस पकडली. त्याचबरोबर त्यांनी त्याच्याबरोबर महाबळेश्वरचे अनेक प्रसंग आणि आठवणी सोबत नेल्या. 


Rate this content
Log in