Sagar Bhalekar

Others

4.3  

Sagar Bhalekar

Others

संसारातील खटके

संसारातील खटके

5 mins
292


       शालिनीताई आणि गुलाबराव आज भलतेच खुश होते.आज त्याची लाडकी प्रीती येणार होती घरी. गुलाबराव आज नेहमीप्रमाणे सकाळी उठले. आंघोळ करून लवकरच बाहेर पडले. इकडे शालिनीताई पण लवकर आटपून जेवण्याच्या तयारीला लागल्या. आज खास लेकीच्या आवडीचे गुलाबजाम शालिनीताई बनवणार होत्या. लहान असताना प्रीतीला गोड पदार्थ खूप आवडायचे. आईला न सांगता प्रीती गोड खूप खायची. सणासुदीला पेढे किंवा गुलाबजाम आणले की संध्याकाळ होत नाही तोपर्यंत प्रीती तो पुढा संपवून टाकायची. आणि मग शालिनी ताईला समजल्यावर तिचा ओरडा पण खूप खायची. शालिनी ताई आणि गुलाबराव दोघांना प्रितीच्या ह्या सवयीचं खूप टेन्शन यायचं. प्रीती तशी बलिष्च होती. लग्न झाल्यापासून प्रीती माहेरी आलीच नव्हती. आणि आता तब्बल 8 महिन्यांनी प्रीती घरी येणार होती. प्रीतीचा भाऊ पण खूप आठवण काढत असे. ती गेल्यापासून तो एकदम शांत शांत आपल्याच कामात मग्न असायचा. रोहित आपल्या सर्व गोष्टी आपल्या ताईला म्हणजे प्रीतीला सांगत असे. पण आज मात्र गुलाबराव शालिनीताई आणि रोहित आज तिघेही खूप खुश होते.


    शालिनीताई जेवण्याच्या गडबडीत असताना जोरात फोन वाजला. शालिनीताई काम अर्धवट सोडून बाहेर आल्या. आई मी प्रीती बोलतेय, मी घरातून निघाली आहे एक तासाभरातच आपल्या घरी पोहचेल. माझ्याबरोबर बाबा आहेत. काळजी करू नकोस. ठेवते फोन. लेकीचे हे बोलणे ऐकून शालिनीताई एकदम गहिवरून गेल्या. पदराने तोंड पुसून परत जोमाने कामाला लागल्या. इकडे गुलाबराव यांनी प्रितीच्या आवडीचे गुलाबजाम घेतले. वाटेतच त्यांनी तिच्या आवडीची जिलेबी सुद्धा घेतली आणि लागले घरच्या वाटेला. घरी खूप आनंदी वातावरण होते. गुलाबराव आणि प्रीती वाटेतच भेटले. आपल्या लेकीला बघून गुलाबराव यांना अश्रू आवरता आले नाही. तेव्हा लगेच प्रितीचे सासरे म्हणाले, काळजी करू नका. आम्ही तिला आमच्या मुलीसारखंच मानतो. पण कितीही झालं तरी सखे आई वडील जेवढे प्रेम करतात तेवढं ह्या जगात कोणीच करणार नाही. घरी आल्यावर मात्र प्रीतीने सुटकेचा निःश्वास टाकला. प्रीतीला बघून शालिनीताई पण खूप खुश झाल्या. एवढ्या दिवसांनी प्रीती आपल्या घरी आली होती. मात्र प्रीती थोडी चिंतेत दिसत होती. आणि मोबाईलवर सारखा रोहनचा फोन येत होता. मात्र प्रीती फोन उचलत नसल्याकारणाने घरातले थोडे चिंतेत दिसत होते. शेवटी प्रीतीच्या घरच्यांनी रोहनच्या वडिलांचे चांगले स्वागत केले. दुपारी जेवण करून प्रीतीचे सासरे घरी जायला निघाले. जाताना मात्र प्रीतीला म्हणाले, सर्वकाही ठीक होईल. हे ऐकताच प्रीतीच्या माहेरचे तिच्याकडे संशयाने पाहू लागले. जेवण झाल्यानंतर शालिनीबाईंनी प्रीतीला विचारले. असं अचानक काय झालं. सासरी सर्व ठीक आहे ना? जावईबापू ठीक आहेत ना. हे ऐकताच प्रीती ढसाढसा रडू लागली. तेव्हा प्रीतीने आईला घडलेला सगळा प्रसंग सांगितला. 


       रोहन आणि प्रीतीचे कडाक्याचे भांडण झाले होते. कारण असं विशेष नाही. रोहनची आई आणि प्रीती नेहमीप्रमाणे स्वयंपाक घरात मेथीचे लाडू बनवत होती.पण नेहमीप्रमाणे रोहनला कुणाचे ऐकावे आणि कुणाचे नाही ह्या द्विढ़ा मनःस्थिती रोहन दिसत होता.त्याचाही पारा चढलेला.आणि माणसाला तरी कुठे मर्यादा असते. बायको आणि आईवर दोघांवर सारखेच प्रेम असते. काहीजण बायकोची बाजू घेऊन आईला दुखावतात आणि काहीजण आईची बाजू घेऊन बायकोला नाराज करतात. यातलं नेमक काय करावं हे रोहनला सुचत नव्हते. आणि असच काहीस गाऱ्हाणं आज प्रीती रोहनला ऐकवत होती. आणि ऑफिसमध्ये पण रोहनच आज डोकं गरम झालेलं होत. आणि त्यात घरी आल्यावर प्रीतीच सुरु झालं, तुमची आई अशी म्हणते आणि तुमची आई तशी म्हणते मला अजिबात नाही आवडत असं बोलले. आता मात्र रोहनचा संयम संपला होता. बाहेरून आलेला माणूस घरात शांती शोधत असतो पण त्याला तिथेही शांतता नाही मिळाली तर त्याचा राग अजून वाढतो. असंच काहीतरी आज रोहनच्या बाबतीत घडत होत. आणि जे नको होत तेच झालं, रागाच्या भरात रोहन प्रीतीला खूप ओरडला. त्यात प्रीतीपण प्रतिउत्तर देतच होती. कोणीही माघार घ्याला तयार होत नव्हतं. दोघेही आपलंच घर ते करत होते. आणि रागाच्या भरात रोहनने प्रीतीला बरच सुनावलं. "जास्त बोलायचं नाही माझ्या घरात... चल निघ माझ्या घरातून... जे बोलायचं ते तुझ्या घरी. इथे नाही. रागाच्या भरात का होई ना, सासूबाई जे म्हणल्या तेच आज रोहन म्हणाला. रोहनच्या एका वाक्याने तिला सासूबाईचे वारंवार बोलले शब्द तिला आठवले. तिचा पारही चढला आणि ती पण जोरात भांडू लागली. 

"माझ्या घरी म्हणजे? हे घर माझं नाही आहे का?


काय तुमची आई आणि तुम्हीदेखील तेच म्हणत आहे. माझ्या घरी नाही, तुझ्या घरी जा. माझं घर हे नाही आहे का.

तेव्हा रोहन म्हणाला, तुझ्या बाबांच्या घरी जाऊन ही सर्व नाटक कर, इथे आगाऊपणा करायचा नाही. मर्यादेत राहायचं. बायको आहे तर बायको सारखीच राहा. राहायचं असेल तर राहा नाहीतर चालती हो इथून. हे वाक्य ऐकल्यानंतर प्रीती रडू लागली. राहायचं असेल तर राहा नाहीतर चालती हो इथून. हे वाक्य तिला परकेपणाची आठवण करून देत होती. ज्या व्यक्तीसाठी आपण माहेर सोडलं, त्याला आपण आपलं सर्वस दिल तो आज असं म्हणाला म्हणून प्रीती जोराने रडू लागली. माहेरी लग्नाच्या वेळी सांगितलं जात की, " आता सासर हेच तुझं घर आहे, आणि सासरची माणसं हि तुझी हक्काची माणसं आहेत. आता तू आम्हाला परकी झालीस, माहेरची पाहुनी झाली. "दिल्या घरी तू सुखी राहा" असा आशीर्वाद घेऊन सासरचा उंबरठा ओलांडणारी सून/मुलगी आज विचारात पडली की माझं नेमकं घर कोणतं...


स्वतःच्या मनालाच प्रीती प्रश्न विचारू लागली, माहेरचं घर फक्त लग्नहोइस्तोवर का? लग्नानंतर नवरायचं नाव लावायचं. त्याच घर स्वतःच घर समजवून स्वीकारायचं, त्याची माणसं ती आपली माणस समजायची. मला माझं स्वतंत्र अस्तिव नाही का. माझं नेमकं घर कोणतं... माझं असं हक्कच घर कोणतं आहे तिथून मला कोण बाहेर काढणार नाही. माहेरचं घर बाबांच्या नावावर असते. सासरचं घर एकतर सासू सासऱ्यांच्या मग नवराच्या... मग माझे काय. म्हणजे ज्याच्या मनात येईल त्याने माझा पाणउतारा करायचा का?


कोणत्या अटी घेऊन जन्म घ्यचा मी? बाबांना सांगू का तुमचे घर माझ्या नावावर करा ते. पण ते कसे करतील, मुलगी परक्याची धन असते. मग लग्न ठेवताना अट ठेवायची का, की माझ्या नावावर घर लावलं तरच मी लग्नाला होकार देईन. पण इकडे सगळं उलट चाललंय. मुलगी द्याची, हुंडा द्याचा, गृहपयोगी वस्तू द्याच्या मुलीच्या वडिलांनी. पण मग सासरी अशी अट मान्य करतील का? पण सासरे मात्र प्रीतीची खूप समजूत घालत होते. शेवटी सासऱ्यांनी प्रीतीला सांगितले की, थोडे दिवस माहेरी जा आई वडिलांकडे. तुलाही बरं वाटेल. आमची काळजी करू नकोस. मी रोहनची समजूत काढीन. आपल्या वडिलांप्रमाणे असलेल्या सासऱ्याचे बोल ऐकून प्रीती भानावर आली आणि तिने लगेचच बॅग भरली आणि माहेरी जायला निघाली. 


Rate this content
Log in