Sagar Bhalekar

Others

4.3  

Sagar Bhalekar

Others

अविस्मरणीय रेल्वेची सफर

अविस्मरणीय रेल्वेची सफर

4 mins
332


         नमस्कार मी सागर गणेश भालेकर. स्टोरी मिररचा नियमित वाचक आहे. तशी वाचनाची आवड लहानपणापासूनच आहे. आजच्या या आंतरजालाच्या काळात प्रवासवर्णन वैगरे वेळखाऊ असते असे म्हणतात कारण विविध बॅकपॅकर्स आणि फूड ब्लॉगर्स यांच्या व्हिडिओमधून आपल्याला बरीच आगाऊ माहिती मिळून जाते. पण माझ्यामते भावना आणि अनुभव व्यक्त करण्यासाठी पुस्तक हेच सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. फिरण्याची आवड तर मला आधीपासूनच होती. प्रवासात आपल्याला असंख्य वेगळ्या जागा,माणसं भेटतात त्यांच्याकडेबघून आपण आपल्या सेफ झोन मधून बाहेर पडतो आणि आपल्यातील आत्मविश्वास वाढतो.मी प्रवासाच्या गंतव्य ठिकाणी पोहोचल्यावर शक्य असल्यास पायी किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रयत फिरण्याचा प्रयत्न करतो. विविध माणसे, त्यांच्या चालीरीती, खानपान, तेथील इतिहास,एखाद्या विशिष्ट ठिकाणाची आख्यायका समजून घेताना एक वेगळ्याच अनुभवाची शिदोरी सोबत येते. ताणतणाव कमी करण्यासाठी प्रवास हे एक उत्तम साधन आहे. या प्रवासासाठी माझे जवळपास एक महिनांपासून नियोजन सुरू होते. त्यामुळे कुठेही काहीही अडचणी आल्या नाहीत कारण त्यासाठी पर्याय नियोजनाच्या वेळीच ठरवला होता. अशा या माझ्या रेल्वेच्या अनुभवाचा हा छोटासा लेखनप्रपंच!

        रेल्वे ही आधुनिक जगाची जीवनवाहिनी. रेल्वे इंजिनाची धडधड माणसांच्या ह्रदयाशी कायमची जोडली गेली आहे. दळणवळणाबरोबरच माणसाच्या भावनिक-सांस्कृतिक विश्वाशीही रेल्वेने नातं जोडलं आहे. भारतीय रेल्वेने जात-धर्म, लिंग भेद दूर करत गरीब-श्रीमंत अशा माणसांना माणूस म्हणूनही एकत्र जोडलं. वाफेच्या इंजिनाच्या गाडीपासून वेगवान मेट्रो ते बुलेट ट्रेन असा जगभरातला रेल्वे उभारणीचा इतिहास जवळपास दोनशे वर्षाचा आहे. रेल्वेची निर्मिती, रेल्वेचे रूळ, उभे राहिलेले पूल, स्टेशन्स, प्लॅटफॉर्म बांधणी, डब्याची बांधणी, अंतर्गत व्यवस्था आणि सोइ -सुविधा ही सगळी वाटचाल थक्क करणारी आहे. हा प्रवास रेल्वेरुळांसारखा अफाट आहे. वेगवान गतीने तो सुरूच राहणार आहे. रेल्वे प्रवासाच्या आवडीने झपाटलेल्या एका मुशाफिरान अनुभवलेली आणि सांगितलेली ही रेल्वेची रोचक, रंजक आणि विस्मयकारक कहाणी.

        दुपारची वेळ. आम्ही बॅगा भरल्या आणि रात्रीची १०च्या सुमारास आम्ही कल्याण स्थानकावर पोचलो. सगळीकडे नुसती गर्दीच गर्दी. गाडी यायला अजून एक तास होता. लहानपणी रेल्वेने बऱ्याचदा प्रवास केला... मला माझ्या लहानपणा पासुन हा प्रवास अत्यंत ओढ लावणारा,उत्कंठा वाढवणारा असा वाटत आला आहे... झुकझुक अगीन गाडी... लहानपणी कोळशाच्या इंधनावर चालणार्‍या गाड्या फार वेगळा प्रवासाचा अनुभव द्यायच्या... धूर,खिडकीतुन बाहेर पाहण्याचा प्रयत्न केल्यास डोळ्यात जाणारे बारीक कोळश्याचे कण ! आणि त्यामुळे डोळा लाल होउन पाणी यायचे... अश्या अनेक आणि अगणित आठवणी रेल्वे प्रवासाशी निगडीत आहेत. निरिक्षण करत प्रवास करणे ही माझी आवड आणि सवय सुद्धा आहे, त्यामुळे अनेक गोष्टी टिपण्यास,समजण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत होते.

         आता डिझेल आणि इलेक्ट्रीक पॉवरवर धावणारी इंजिन्स आहेत... आणि यांच्या प्रवासातुन सुद्धा वेगळा आनंद मला मिळतोच!२०१७ साली मिरजला जाताना मी काही फोटो प्रवास करताना टिपले ते आज इथे देत आहे... तुम्हाला ते आवडतील अशी अपेक्षा करतो. रेल्वे स्टेशनवर पदार्पण करताच मनाला जाणवले की हे स्टेशन नसून जगाची छोटी प्रतिकृती आहे. हे स्थानक म्हणजे प्रशस्त फलाट, गाड्यांचे आगमन-निर्गमन दाखवणारे विद्युत फलक, दर मिनिटाला धडधडत येणाऱ्या रंगीबेरंगी गाड्या, फलाट सोडताना त्यांच्या शिट्या, त्यातच दिल्या जाणाऱ्या विविध भाषांतील सूचना हेच सिद्ध करते की, विविधता हे रेल्वे स्थानकाचे खास वैशिष्ट्य असते.तेवढ्यातच आमची महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर आली. लोकांची गाडीत चढ़यनासाठी नुसती तारांबळ उडाली. सकाळी उठल्यावर रेल्वेच्या डब्यातुन फोटो काढण्यास सुरुवात केली, अर्थात पहिला फोटो रेल्वेच्या बोगीचा काढुन मग मी इतर फोटो काढण्यास सुरुवात केली...

         अनेक वेगवेगळे लोक, वेगवेगळे भाषा बोलणारे लोक, कधी सहकुटुंब प्रवास करणारे लोक, तरी कधी एखादा एकटाच प्रवास करणारा व्यक्ती. मध्येच येणारे विक्रते, भीक मागणारे, भेळवाले, किंवा अचानक येऊन ठेपणारे रेल्वे सुरक्षा दल. ट्रेन मध्ये अचानक भेटणारे, गप्पा मारणारे,भांडणारे परत या प्रवासात एकमेकांना भेटणार सुद्धा नाहीत... तरी सुद्धा काही काळ प्रत्येक जण या प्रवासाच्या अनुभवातुन एकत्रपणे जात असतो...मला प्रवासात रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुंनी दिसणार्‍या अनेक गोष्टी पहायला फार आवडतात... शेत, रस्ते, नद्या, पूल आणि बरंच काही.वेगवेगळ्या पद्धतीने नांगरलेली, नुकतीच कापणी झालेली, हिरवीगार, मधेच एखादे झाड असणारी, भाजणी झालेली, एखादा मळा असलेली असे अनेक प्रकार या पळत्या प्रवासात पहायला मिळतात. 

          ट्रेन वेगाने आपला रस्ता कापत होती. मध्येच दिसणारे धबधबे. वाहणाऱ्या नद्या, मोठं मोठे ब्रिज, पूल सगळंच दृश्य मनाला भेदून घेणार होत. कधी कधी एखादा लाईनमन त्यांचे काम इमानेइतबारे करताना नजरेस पडतो... एक वाहतुक व्यवस्था आणि त्याच्यावर निर्भर असणारे लाखो करोडो लोक! 

          थोड्याचवेळात मिरज स्टेशनवर मी उतरलो. मी एका चहाच्या स्टॉलवर जाऊन चहा प्याला. चहा गरम आणि चवदार होता. तेथे इतर लोक देखील खात पीत होते. काही लोक कोल्ड ड्रिंकचा आनंद घेत होते. प्लॅटफॉर्मवर कोठेही मोकळी जागा नव्हती. जर कुणीतरी पडून असेल तर कुणीतरी बसलेला खंडपीठही भरले होते.टी.सी, गार्ड, मेकॅनिक आणि इतर कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते. पोलिसही तेथे गस्त घालत होते. लाऊड स्पीकर्सवर गाड्या सांगितल्या जात होत्या.लगेच आम्हला कुलीने पकडलं.आणि आम्ही व्यासपीठावरुन बाहेर आलो. टॅक्सी घेतली आणि घरी निघून आलो. वाटेतही बरीच रहदारी होती आणि आमची टॅक्सी सर्वत्र थांबायची होती. शेवटी आम्ही घरी पोहोचलो आणि आम्ही शांततेचा श्वास घेतला. परंतु रेल्वे प्रवास व स्थानकाचे हे दृश्य त्याच्या विविधता आणि विचित्रतेमुळे माझ्यासाठी संस्मरणीय बनले.


Rate this content
Log in