गिरनार प्रवास एक अविस्मरणीय अनुभव !
गिरनार प्रवास एक अविस्मरणीय अनुभव !
जेवण आटोपल्यावर मी माझी बॅग पुन्हा भरायला लागलो. आई च सारखं बोलणं कि रे बाबा सर्व कपडे, साबण, स्वेटर सर्व नीट घेतले ना रे, आणि गाडी किती वाजताची आहे, मोबाईल, बॅटरी वैगरे , नंतर असं नको व्हायला कि निघताना घाई व्हायची.
अचानक 9 च्या सुमारास मित्राचा फोन आला की सगळं नीट घेतलंस ना! खूप उत्सुकता लागून राहिली होती मी एका नवीन प्रदेश बघणार होतो त्या प्रदेशचा नाव होत गुजरात . गुजरात बद्दल पुस्तक आणि टीव्ही वरती खूप पाहिलं आणि वाचल होत. आई व बाबांना नमस्कार करून मी निघालो, स्टेशनवर आल्यावर कल्याणसाठी मी गाडी पकडली . नोव्हेंबर चा महिना असल्यामुळे खूप थंडी वाजत होती. कल्याण ला पोचल्यावर आमची ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर येणार होती. ट्रेन च नाव होत. ११0८८ पुणे ते वेरावळ एक्सप्रेस सुमारे १० मिनिट उशिरा येणार होती. इथे माझी सर्वांची ओळख झाली , गाडीत लागणारी सगळ्यात मोठी वस्तू म्हणजे पाणायची बाटली आम्ही स्टॉल वरून घेतली. रात्रीच्या सुमारास १०.३० ला ट्रेन ५ क्रमांक वर आली . भारतातील ट्रेनचा प्रवास तुम्हाला तुमच्या संस्कृतीच्या, तुमच्या लोकांच्या आणखी जवळ घेऊन जातो. तुमच्या सोबत प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची एक वेगळी कहाणी असते. ट्रेन तुम्हाला लोकांबरोबर बसण्याची संधी देते. त्यात सर्व प्रकारचे लोक असतात आणि तुम्ही त्यांच्या कहाणीचा एक भाग बनतात.तुम्ही धबधब्यांच्या जवळून जाता किंवा जंगलातून जाता किंवा लाटांमधून जाता. वेगाने जाणारी ट्रेन जेव्हा एका बोगद्यातून जात असते, त्या वेळी प्रत्येकाच्या हृदयात उत्पन्न होणारा रोमांच तुम्ही कधी अनुभवला आहे काय किंवा पावसाळ्यात दाट जंगलाचे किंवा धबधब्याचे संमोहक दृश्य तुम्ही विसरू शकता काय?
जवळजवळ संध्याकाळीचे ५ वाजले होते ट्रेन वेरावळ ह्या स्टेशनवर पोचली होती. तिथून आम्ही रिक्षा करून गिरनारच्या पायथ्याशी आलो, तेव्हा संध्याकाळीचे ७ वाजले होते. आता एकदम कडाक्याची थंडी वाजत होती. जवळच्या टपरी मधून आम्ही चहा सर्वानी घेतला. थोडं बरं वाटलं . जेवण झाल्यानंतर गिरणार पर्वतावर जाऊ इच्छिणाऱ्यांची चौकशी आम्ही केली आणि जवळपास नऊ व्यक्तींचा ग्रुप तयार झाला. दहा हजार पायऱ्या चढणे आणि उतरणे असा हा प्रवास होता. तेव्हा सर्वांनी विचार करुनच निर्णय घेतला. मनाचा हिय्या करून आम्ही सगळे चढाईसाठी तयार झालो. दत्तात्रयांच्या दर्शनाची ओढ असल्याने सर्वजण उत्साहात होते.जुनागढपासून गिरनार पर्वताचे प्रवेशद्वार साधारण पाच किमी अंतरावर आहे. प्रवेशद्वारापासून पुढे गेल्यावर थोडे सपाट अंतर चालावे लागते. येथून पुढे मग दगडी पायऱ्या सुरू होतात. मध्
यरात्र असल्यामुळे दिव्यांच्या मंद प्रकाशात आम्ही पायऱ्या चढत होतो. बाकी चहूकडे अंधार होता. थोड्या पायऱ्या चढून गेलो की आम्ही काही वेळ विश्रांती घ्यायचो. संपूर्ण ग्रुप सोबतच होता. घाई करून किंवा कुणालाही मागे सोडून पुढे जायचे नाही असा निर्णय सगळ्यांनी घेतला. आमच्या मागे पुढे चालणारे भाविक हातात काढी घेऊन चालत होते. गप्पांच्या ओघात आम्ही काढी घ्यायचे विसरलो होतो.हजार पायऱ्या चढून जायच्या असल्यामुळे पहाट होणार होती. पण रस्त्यात बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या बाटल्या, सरबत, चहा यांची व्यवस्था होती. सोबत सामान नव्हते आणि वातावरण थंड असल्यामुळे थकवा जाणवत नव्हता.पुष्कळ वेळ आम्ही चालत होतो. पहाट उजाडली होती. आता जरा दमायला झाले होते. मंदिराजवळ कधी पोहोचतो अशी सर्वांची अवस्था झाली होती. मंदिर जवळ असल्याचे दिसले खरे मात्र येथेच आमचा भ्रमनिरास झाला.
थोड्या वेळाने गोरक्षनाथांचे मंदिर दिसले. दत्तात्रय मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी अजून एक ते दोन तास अवधी लागणार होता. आम्ही सगळे एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागलो. महाराज आमच्या सहनशक्तीची परीक्षाच पाहात होते. पण काहीही झाले तरी मंदिरापर्यंत पोहोचून दर्शन घ्यायचेच हा निश्चय सर्वांनी केला होता. पायऱ्या उतरताना खूप भीती वाटत होती. पण समोर मंदिर दिसत असल्याने नवीन उत्साह संचारत होता. शेवटच्या काही पायऱ्या शिल्लक राहिल्या होत्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव निर्माण झाले होते.आम्ही मनोभावाने मंदिरचे दर्शन घेतलं. महाराजांची मूर्ती खूप सुबक, सुंदर आणि प्रसन्न होती. ते पाहून आमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज निर्माण झालं. दर्शन आणि आरती झाल्यावर आम्ही थोडा वेळ मंदिरच्या आवारात गप्पा मारत बसलो होतो, असं वाटत होत की किती उंचावर मंदिर बांधलं गेलं असावं. असो आता पायऱ्या उतरयाणाची वेळ आली , पायऱ्या उतरताना दोन मार्ग दिसतात. एक मार्ग जातो धुनी कडे येथे चोवीस तास धुनी सुरु असते. सेवेकऱ्यांनीआम्हांस प्रसाद घेऊन जाण्यास सांगितले.आम्ही धुनीचे दर्शन व प्रसाद घेऊन पायऱ्या उतरायला लागलो. आता हुळूहुळू आमच्या सर्व हालचाली मंदावल्या होत्या. आता आमच्यात उतरणायचे त्राण ही शिल्लक नव्हते. थोड्याथोड्या वेळाने आम्ही विश्रांती घेत होतो आम्ही. आणि अखेरीस दुपारी १ च्या दरम्यान आम्ही गिरनार च्या पायथ्याशी आलो. आता आमच्या जीवात जीव आला .रुममध्ये गेल्यावर पलंगावर पडलो. पायात गोळे आले होते आणि शरीरात काहीच त्राण उरले नव्हते. सर्वांची अवस्था अशी झाली होती. दुसऱ्या दिवशी मात्र आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानी भाव होते. ही अवघड चढाई अविस्मरणीय ठरली.