माझी छोटीशी डायरी
माझी छोटीशी डायरी
दिनांक - १ जून २०२१
मी आजपासून रोजनिशी म्हणजे डायरी लिहायला सुरूवात केली आहे. मी आतापर्यंत कधीही डायरी लिहली नाही आहे, पण कोणास ठाऊक? पण आज मी ठरविले, मी डायरी लिहणार. माझा स्वभाव थोडा लाजाळू असल्याकारणाने मी माझ्या मनातील गोष्टी कोणाला सांगू शकत नव्हतो. स्टोरी मिररवर लिखाण काम चालू करून मला अवघे २ महिनेसुद्धा झाले नाहीत अजून. पण आज एवढ्या कमी कालावधीत स्टोरी मिरर मला खूप जवळचे वाटू लागलं आहे. म्हणून मी एक स्वतःची डायरी लिहण्याचा विचार करत आहे.
कोणत्याही माणसांसाठी डायरी हे असं पुस्त
क असत की, तो ते सर्वांपेक्षा वेगळं ठेवतो आणि ते पुस्तक वाचायची कोणालाही परवानगी देत नसतो. डायरी मध्ये माणूस आपल्या सर्व गोष्टी लिहतो आणि त्या गोष्टी कोणाशीही शेअर करु इच्छित नाही. प्रत्येक माणसांच्या आयुष्यात डायरीला खूप महत्तव असते, कारण डायरी मध्ये त्या माणसाच्या आयुष्याशी निगडित बरे वाईट प्रसंग घडलेले असतात. ते त्याच्या व्यतिरिक्त कोणालाच माहित नसतात.
म्हणून आपल्या हृदयाच्या पुस्तकामध्ये लपलेली पाने जगासमोर आणणे हे खूप हिंमतीचे काम आहे. मी स्टोरी मिररचे आज खूप खूप आभार मानतो की, त्यांच्यामुळं आज मी डायरी म्हणजेच रोजनिशी लिहण्याचा विचार करू लागलो.
हृदयाच्या पुस्तकांमध्ये काही पाने लपलेली असतात,
ज्यांना अजून आपण आपल्या मनांमध्ये लपून ठेवले असते.
काही वेदनांनी घेरलेली गाणी, जी आतापर्यंत होती आपली,
आता सगळ्यसमोर उघडकीस येणार आहे.