Sagar Bhalekar

Abstract Others

4.3  

Sagar Bhalekar

Abstract Others

माझी छोटीशी डायरी - लहान मूल ट्रॉफी नसतात

माझी छोटीशी डायरी - लहान मूल ट्रॉफी नसतात

1 min
362


डायरी दिनांक - ४ जून २०२१ 

माझी प्रिय डायरी,

    आज माझ्या मामाचा वीडियो कॉलवर फोन आला होता. त्याला ८ वर्षाचा मुलगा आहे. तो गिटार खूपच चांगल वाजवतो. वीडियो कॉलवर बोलत असताना, त्याने त्यालाही आवाज दिला. अरे आशु एकडे ये जरा, दादा ला तुझा परफॉरमेंस दाखव जरा. आशु बिचारा अभ्यास करत होता, मी मामाला राहुदे म्हटल, की जेव्हा मी घरी येईल तो नक्की बाघिन. मामा ने साफ नकार दिला. आणि परत आपल्या मुलाला बोलवले. आशु जवळ आला, तसा मामाने त्याला कालच्या गाण्यावर गिटार वाजवायला सांगितले. आशु च्या चेहऱ्यावरून असे वाटत होते की,त्याला जबरदस्ती वाजवायला सांगत आहेत की काय. हे ऐकून मला खूपच दुःख झाले. समजत नाही, पेरेंट्स आपल्या मुलांना ट्रॉफी सारख जगाच्या समोर आण्यास

     कधी बंद करणार. लहान मुलांना सुद्धा मन असत, जबरदस्तीने त्यांना आपल्या नातेवाईकासमोर आणून प्रदर्शन दाखवणे हे कितपत बरोबर आहे. लहान मुल संगीत, नृत्य ह्यामध्ये त्यांची रूचि असते, नाही की, नातेवाईकाना प्रभावित करण्यासाठी ते शिकतात. आपल्या अपेक्षा कृपया करून त्या लहान मुलावर लादू नका. त्यांना ज्यांच्यामध्ये रूचि आहे, त्यासाठी त्यांना प्रेरित करा. त्यांना आपल्या अर्धवट असलेल्या स्वप्नाना पूर्ण करण्याचं साधन समजणं पहले सोडून द्या. अस नका होऊन देऊ की, तुमची स्वप्न पूर्ण करता करता ते हेच विसरुन जातील की, त्यांनी सुद्धा कधी तरी स्वप्न बघितली होती. 

      मी समोरून माझ्या मामाला हे सांगू शकलो नाही. आजकाल संबंध खूप नाजूक असतात, कोणालाही जरी काही बोललो तरी सगळ्यांना वाईट वाटत. त्यामुळे जे मी मोकळेपणाने बोलू शकत नाही, ते मी माझ्या रोजनिशीच्या मार्फत बोलतो. आभारी आहे. चला तर मग उद्या भेटू काही अजून नवीन गोष्टीसहित.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract