STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Abstract Inspirational

2  

🤩ऋचा lyrics

Abstract Inspirational

माझा अनुभव - श्यामची आई

माझा अनुभव - श्यामची आई

1 min
336

पहिलं वाक्यच मला म्हणायचंय की श्यामची आई हे पुस्तक, अनेक संस्कारांचे भांडार आहे. प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक वाचावंच.

बालवयात केलेले योग्य संस्कार आयुष्यभर पुरतात हे नाकारता येणार नाही. या पुस्तकाबाबतही हेच वाक्य अगदी 100 टक्के लागू होतं. श्यामच्या आईने संस्कार श्यामला दिले आणि श्यामने साऱ्या जगाला ह्याच पुस्तकाच्या माध्यमातून.

 

खरंतर ह्या पुस्तकात गुरुजींनी त्यांच्या आईबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. आईवरच त्यांचं निस्सीम प्रेम साऱ्या दुनियेला माहीत आहेच! पुस्तकात बेचाळीस रात्री म्हणजेच छोट्याशा श्यामवर आईने संस्कारांची केलेली उधळण व त्यातून घडलेले साने गुरुजी यांचं दर्शन आपल्याला घडतं. त्यांच्या आईने दिलेली संस्कारांची झोळी त्यांनी समस्त जनतेसमोर उघडी केली त्यांच्या या पुस्तकरूपाने... खरंतर पुस्तकाचं प्रमोशन नाही, हे सर्वस्वी माझं मत आहे. चांगल्या गोष्टी, चांगली पुस्तकं इतरांपर्यंत पोचवणे हे माझं कर्तव्य आहे असंच समजून मी हे लिहिलंय...😊


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract