लॉकडाउन तेव्हाचे आणि आताचे
लॉकडाउन तेव्हाचे आणि आताचे
सुखदुःख समान येती जाती प्रतीवर्षी जगावेगळे अनुभवले मागीलवर्षी विसरण्यासारखे कदापि नाही....कुठून आला हा विषाणू अस्तित्व ज्याचे नाही उद्ध्वस्त केले सर्वांचे जगणे केली उलथापालथ साऱ्या जगाची..पिंजऱ्यात प्राणी राहतात कसे विचार आला होता मनात सुरू झाले जेव्हा लॉकडाऊन घरातली पावले अदृश्य बेडीत कैद झाली काही क्षणात...
तेव्हा शासनाव्दारे देशातील सर्व भागांना बंद करण्यात आलं, महामारी नियंत्रणात करण्यासाठी लॉकडाउन झालं,अचानक सारं काही ठप्प झाल.. आता काय करावे, कसे करावे..? विचार प्रत्येकाच्या मनात संपूर्ण जग स्तब्ध झाल अवघ्या काही क्षणात...वाटले की संकटाच्या निमित्ताने का होईना सर्वांना मिळाली एक नवी संधी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायला विनाकारण केल्या जाणारया खर्चाला खीळ बसली कमी पैशात घर चालवता येत, कुटुंबासोबत तणावमुक्त आनंदी जीवन जगता येत ही शिकवण मिळाली..
लॉकडाउन मुळे तेव्हा शेजाऱ्याची शेजारयास भेट दुर्मिळ झाली बंद दरवाजाआड चार भिंतीत कुटुंब सारे राहली कशी बिकट परिस्थिती जगासमोर आली चेहऱ्यावरती मास्क आणि भेदरलेले डोळे संशयाने बघती एकमेकांना अंतर राखून सारे तेव्हा रस्ते ओस पडले, शाळा विद्यालय बंद झाली लहान बाल गोपालविना बागेतली फुले झाडे ही मुक झाली आप्तस्वकीयांचा वेदनादायी विरह सहन केला कित्येकांनी शत्रूवरही असा प्रसंग नको ही शिकवण सर्वांना मिळाली.
माणसांत न राहून खरी माणुसकी सव॔ जण शिकले न भेटता न कुणाच्याही घरी जाता online एकत्र सगळेच भेटले शिकली न नुसती तत्वे न जाणता आचरणात आणली सहनशक्ती वाढवून संयम आला वेदना वाढलेल्या पण संवेदना सगळ्यांच्या जागृत झाल्या कुटुंब रंगल घरात,माणसे जवळ आली होती जी दुरावली आई सोबत वडीलांनी नवीन पदार्थ बनवण्याचे कौशल्य आत्मसात केली.आजी आजोबा सोबत रमली नातवंड घराला आले नव्याने घर पण...मंदीर बंद झाले घराघरात पुजा अच॔ना दरवळला धूप अगरबत्तीचा सुगंध
सव॔ घरात पसरला अनोखा आनंद एकत्र कुटुंब जेवायला बसले हे सुंदर दृश्य पाहून घरही नव्याने हसले..घरातली जळमठ दूर करताना मनातील अडगळ ही दूर झाली... छंदांना जणू नवे मिळाले जीवन लॉकडाऊनच्या निमित्याने प्रत्येकाने अनुभवले सुंदर क्षण कोणी नाही मोठा लहान सगळे एकसमान म्हणून कोणी जनसेवाही केली गरजूंना संकटात मदत ही मिळाली महिन्या मागून महिने गेले" जग हादरणे हे तेव्हा समजले. तेव्हाच्या लॉकडाउने प्रत्येकाला अनेक जाणीव दिल्या अन् शिकवले बरेच काही .....लॉकडाउन संपले...
आपल्याला काही नवीन सवयी जडल्या काही लावून घ्याव्या लागल्या ..स्वतः मध्ये बदल घडून आणण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी मिळाली पुन्हा एक नवी संधी...योगायोगाने लस ही आली...लसीकरण सुरू झाले....पण...मग काय ...आता महामारी ही जाणार...लस जी आली आहे.... काय होईल... बघता येईल...या विचाराने झाली सर्वत्र गर्दी..विनाकारण घरा बाहेर पडतांना कोणाला भीती न राहली ...दिवाळी ही धूमधडाक्यात पार पाडली...भेटीगाठी वाढल्या अन् वाढली झपाट्याने पुन्हा रूग्ण संख्या..आली पुन्हा लॉकडाउन ची स्वारी...पुन्हा लॉकडाउन या विचाराने गंभीर झाली मनस्थिती..
आता आणखी लॉकडाउन....? जीवनावश्यक वस्तू सोडून नियमावली नुसार पुन्हा सर्व बंद झाले, काय करावे कसे जगावे नाना विचार डोक्यात पिंगा घालू लागले, काही ठिकाणी कडक निर्बंध काही ठिकाणी काही परिणाम नाही अशी स्थिती....श्रीमंताचे ठीक आहे हो...गोरगरीब जगणार कसे...कामधंदा तर करावा लागणार ना... लॉकडाऊन चा परिणाम गरीब, कामगार लोकांवर तर झाला उर्वरित व्यावसायिकांना या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागला..अद्यापही करावा लागत आहे... प्राणघातक विषाणूचा हल्ला हा पुन्हा झाला.. जगभरात कोट्यावधी लोकांनी आपले जीव गमाविले...मृतांची संख्या वाढली, दवाखान्यातही रूग्णाला जागा मिळेनासी झाली, प्राणवायू उपलब्ध नसल्याने कित्येकानी आपले जीव गमाविले, हा असला कसला हा विषाणू वर्ष सरले तरी जात नाही म्हणून सर्वानी हतबल होऊन परिस्थिती पुढे हात टेकवले..अद्यापही संक्रमणाचा धोका वाढत आहे आताचे लॉकडाउन, ही बिकट परिस्थिती,
संचारबंदी.... सुरू झाला पुन्हा संघर्ष... प्रत्येकालाच आताच्या लॉकडाउनचे बरे-वाईट अनुभव आले लोकांनी अनेकांनी आपली जिवलग माणसं गमावली अनेकांचे जिवलग जगण्यासाठी अजूनही झुंज देत आहेत.. आताच्या लॉकडाउन मध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अंगाने आपल्या सर्वांचेच आयुष्यात प्रचंड बदल घडून आणला आहे "जिवंत राहणे" ही प्राथमिकता झाली.
या सूक्ष्म जीवाने लहान-मोठा गरीब-श्रीमंत हे भेदभाव संपवले आपण मनुष्य आहोत हे प्रत्येकाच्या मनावर बिंबवले. याने दाखवून दिली माणसाला मर्यादा दाखवून दिली निसर्गाची ताकद... दाखवून दिला कौटुंबिक जिव्हाळा आणि माणसाला माणसाची किंमत पुसून टाकला भेद मग तो गरीब असो की श्रीमंत...
आपण तेव्हा कसे होतो आणि आज कसे आहोत यातला फरक कुठेतरी जाणवला.. आयुष्यभर आपण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नाराज असायचो नाखूष असायचो मात्र ही महामारी चालू झाली आणि आपल्यात किती बदल घडून आला,कितीतरी लहान बाबतीत आपण समाधान मानायला लागलो.. कठीण परिस्थितीतही जगायला शिकलो नुसतं पळत राहण्यापेक्षा थांबून सुख शोधायला लागलो निसर्गाचा आदर करायला लागलो... मिळाले ते आपले सुटले ते नियतीचे हे एवढे गणित आज आपण समजायला लागलो...लॉकडाउन आताचे त्याच्याशी संबंधित असंख्य बाबी.... परंतु मनात कुठेतरी आहे आशा होईल पुर्वीसारखे सगळे निघून जाईल हे क्लिष्टदायक वर्ष दूर होईल संकट सारे मिळेल पुन्हा तोच आनंद तोच हर्ष...
मागणे एकच देवाला
सुख समाधान निरामय आयुष्य मिळो सर्वांच्या जीवनाला...🙏
