सुमित बारी

Abstract Children Stories Drama

5.0  

सुमित बारी

Abstract Children Stories Drama

लबाड सावकार, चतुर मुलगी

लबाड सावकार, चतुर मुलगी

2 mins
586


      एका गावात एक शेतकरी त्याच्या मुलीबरोबर राहत होता. शेतकऱ्या जवळ शेती पेरणी साठी पैसे नव्हते, तो गावातील सावकाराकडे कर्ज घेण्यासाठी गेला. सावकार त्याला म्हणाला तू माझे कर्ज फेडशीलचं याची काय हमी? शेतकरी म्हणतो माझे पीक आल्यावर ते विकून तुमचे कर्ज फेडीन. सावकार दृष्ट नजरेचा असतो, तो शेतकऱ्याला एक अट घालतो ,ती अट अशी की शेतकरी कर्ज फेडू शकला नाही तर त्याच्या मुलीचे लग्न सावकारा बरोबर करावे लागणार. शेतकरी मान्य करतो, कारण शेतकऱ्याला स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असतो म्हणून शेतकरी होकार देतो. शेतकऱ्याचे घामाचे पीक जोमात येते, सावकाराला हे कळताच तो शेतकऱ्याच्या पिकाला आग लावून देतो. शेतकऱ्याची मेहनत वाया जाते, कर्ज फेडण्याच्या वेळेस शेतकरी सावकाराला विनवणी करतो पुढच्या वर्षी मी आपले कर्ज नक्की फेडणार, पण सावकार म्हणतो पुढील वर्षीही तू माझे कर्ज फेडशील याची काय शाश्वती. सावकार सांगतो तुझी विनवणी ऐकून मी तुझ्यासाठी एक करू शकतो. नदीकाठी गावकर्यां समोर मी कापडाच्या पिशवीत एक काळा दगड व एक पांढरा दगड ठेवणार, तुझ्या मुलीने त्या पिशवीतून काळा दगड काढला तर तिला माझ्याशी लग्न करावे लागणार पण तिने पांढरा दगड काढला तर मग मी तुझ्या मुलीशी लग्न करणार नाही व तुझे कर्ज देखील माफ करेन. शेतकरी होकार देतो.


      ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याची मुलगी गावकऱ्यांसमोर हा उपक्रम करायला लावते, सावकार तयार होतो कारण त्याच्या मनात दुसरीच योजना असते. सावकार पिशवीत दोघही काळेच दगड ठेवतो मुलगी हे पाहून घेते, मग ती मुलगी त्या पिशवीतून एक दगड काढते व तो फेकून देते. मग सावकार म्हणतो तू दगड काढला व तो फेकला तो काळा दगड होता. मुलगी म्हणते पिशवीत जर पांढरा दगड निघाला म्हणजे मी काळा दगड फेकलेला असणार, पण काळा दगड निघाला म्हणजे मी पांढरा दगड फेकला असणार. गावकरी देखील असेच सांगतात. मग पिशवीत काढा दगड निघतो मग मुलगी म्हणते पिशवीत काळा दगड आहे, म्हणजे मी पांढरा दगड फेकला आहे व तुमच्या शर्तीप्रमाणे पिशवीतून जर मी काळा दगड काढला तरच मला तुमच्याशी लग्न करावे लागणार, पण आता मी पांढरा दगड काढल्याने तुमचा आमचा काहीही संबंध नाही. सावकार खजील होऊन घरी जातो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract