Shobha Wagle

Abstract

4.5  

Shobha Wagle

Abstract

लाडला

लाडला

2 mins
200


‌      कशी तुला मी दूर करू रे ? तुझ्या शिवाय नाही मला करमणार. 40 वर्षांचा सहवास आपला. तुझा विरह नाही मी सहन करू शकणार. लोकांना काय पाहिजे ते बोलू दे, तू आहे तसाच मला आवडतोस. आणि काय तुझ्यात कमी आहे? तेव्हा होता तसाच आता सुध्दा आहेस. तू माझी कामे चोख करतोस. हं, आता खूप वर्षे झाली. रूप रंगात फरक पडलाय. मी नाही कां आता वयस्कर झाले? पण आमचं दोघांचं खूप छान जमतं ना! लोकांना म्हणू दे काही, आपण नाही त्यांची पर्वा करायची. तुझ्या शिवाय मला कोण बरे चांगलं ओळखत असेल ह्या घरात? माझे राग - रुसवे, लाड -प्यार, आदळ -आपट सगळं सगळं पाहणारा तुच एकमेव आहे ना! घरांतल्या लोकांचा राग तर मी तुझ्यावर किती तरी वेळा काढलाय! पण तू मात्र एवढा शांत, हुं की चू केलं नाही कधी. आपलं बिन बोभाट काम करतच राहिला. ह्याच कारणाने माझी खूपच प्रीत बसलीय तुझ्यावर. नाही तुला दूर करणार. "जुनं ते सोनं" ह्या म्हणी प्रमाणे आहेस तू, म्हणून दूर नाही करणार मी तुला राजा.

‌तुझ्या सोबत काढली मी चाळीस वर्षे. माझ्या आयुष्याचे चढ-उतार, बरे-वाईट, सुख-दुःख, ह्या सगळ्यात तू सहभागी होतास. माझ्या नंतर तुझे काय होईल मी सांगू शकत नाही. कुणाच्या तरी, गरीब असला तरी, चांगल्या माणसाच्या घरात तू जावे हे एवढे मागते मी देवाकडे.

‌आजकल काय फॅड आलंय बघतो ना तू. मोठ्या उत्साहाने आणतात, एक दोन महिने होतात तर लगेच त्यांच्या तब्बेतीच्या कुरुबुरी सुरू होतात व लगेच कंपनीत हाकलतात. तुझ्या सारखा तनदुरूस्त एक तरी आहे कां? आता तूझ्या कंपनीचाच काही पत्ता नाही. तुझे स्पेअर पार्ट पण कुठे आढळत नाहीत. तू मात्र मला काही म्हणजे काही त्रास दिला नाहीस हं, एकदा तुझा बल्ब गेला होता, व एकदा दरवाज्याचा वरचा नट गंजुन तुटला होता तेवढच तुझं आजारपण. बाकी काही म्हणजे काहीच कटकट नाही.

‌अशा माझ्या सुंदर राजाला दूर करणे माझ्या अगदी जीवावर येतंय. माझ्याकडे कोणी नवीन आलं तर तुझ्याकडे पाहुन नाक मुरडतात. पण खरं सांगू का, त्यावेळी त्यांच्या मनात विचार येत असतात " काय बाबा हिच्याकडे सगळ कसं ठीक असतं! कसं बरं वापर करत असेल ही? नाही तर आमच्यकडे, किती ही महागडी आणली तरी दोन तीन महिन्यात त्याचे बारा वाजतात. नशीबवान आहे बाबा ही". त्याच्या अंतरमनातले विचार जाणवल्यावर मला खरंच धन्य धन्य वाटतं व मी तुझ्यावर जास्तच फिदा होते.

‌नजर न लागो बाबा आम्हाला कुणाची! चला, मीठ ओवाळुन टाकुया. तुला व मला कुणाचीच नजर ना लागो. तू भी कुल मी सुध्दा कुल. चल थंड गार गोड आईसक्रीम खाऊन सेलिब्रेट करू. बेल वाजली... कोणीतरी आलं वाटतं...येऊ दे...कुल कोल्ड आईसक्रीम त्यांना पण देऊ. सगळे मिळून सेलिब्रेट करू.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract