कठपुतली
कठपुतली
ताई,अहो जरा आठवडा भर येणार नाही कामा वर.सुभद्रा म्हणाली.
का ग अस अचानक काय आता,कशाला हवी सुट्टी.? प्रतिमा ने विचारले.
ताई ते माझी दोन नबरची मुलगी शकू..तीच लगीन ठरले.
कोण शकू..ती तुझ्या सोबत येते कामावर ..तीच ना.?
होय...ताई.
अग पण ती तर लहान आहे अजून.१८ वर्षाची पण नाही ती.आठवी पास होऊन तिला घरात बसवलेस आणि स्वतः सोबत काम करायला नेतेस सुभद्रा..हे बरोबर नाही.
ताई ,माझी मोठी लेक शांता,तिला मुल बाळ काही होईना.तिचा नवरा तिला सोडचिठठी देतो म्हणून मागे लागलाय.
अग पण याचा काय संबंध शकू च्या लग्नाचा.?
ताई, शांता चा नवरा दुसरी बाई घरात आणणार,म्हणून मग त्याला म्हंट्ल की दुसर लगीन करतो तर शकू बरोबर कर आणि शांता ला पण ठेव घरात.
तो तयार झाला का?
होय ताई, दोघी बहिणी एकत्र राहतील.
अग सुभद्रा पण विचार कर उद्या जर शकू ला पण नाही दिवस गेले तर ..दोष त्याच्या तच असेल तर.?
ताई ,अहो पुरुषात कुठला आलाय दोष आणि त्यानं माझ्या पोरीला सोडून देण्या परास हे चांगल हाय की.
सुभद्रा गेली..प्रतिमा विचार करत होती की किती भयानक आहे हे सगळ.मुलीला तीच आयुष्य तिच्या मर्जी ने जगता येत नाही.? आई वडील म्हणतील,जो निर्णय घेतील तो मुकाटपणे मान्य करणे..हेच चित्र जवळ जवळ सगळी कडे दिसून येते.कुठे वडील तर कुठे नवरा...बाई बाबतीत निर्णय घेत असतो.तिला निर्णय घेण्याचे स्वातंत्र आज ही नाही.
मी ही माझ्या मना विरुद्ध तर जगत आले.माझं प्रेम जतिन वर होत,तो लग्नाला तयार होता.त्याच्या घरून काही ही अडचण नव्हती. पण बाबा ना जेव्हा मी सांगितले तेव्हा ते भडकले,म्हणाले,प्रेम करायला काय हाच एक पंजाबी मुलगा मिळाला का तुला प्रतिमा?.जरा धर्म तरी बघायचा.
प्रेम जात, धर्म बघून केले जाते का? मी किती पोट तिडकीने सांगितले की जतिन किती चांगला आहे,विश्वासू आहे. मुळात आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे. पण नाही,बाबा म्हणाले,तुझ्या नंतर तुझे भाऊ बहीण लग्नाचे आहेत.त्यांचा विचार कर.आणि जतिन सोबत लग्न करायचे असेल तर, तुझा आणि आमचा संब ध कायमचा संपला.
नाईलाजाने प्रतिमा ने जतिन शी संबध तोडले.तिला अधिकारच नव्हता की तिच्या आयुष्याचा निर्णय घेवू शकेल.मना विरुद्ध लग्न करून आज ती प्रमोद सोबत आयुष्य जगतच होती ना? इच्छा असो ना नसो.
शकू तर खूप लहान आहे,तीच आयुष्य तिच्या हातात नाही.आयुष्याची डोर आता तिच्या आई वडिलांच्या हाती आहे,उद्या नव-या च्या हातात असणार आहे.आज ही कित्येक स्त्रिया या फक्त कठपुतली बनून जगत आहेत,त्यांना हवे तसे नाचवणारा पडद्या मागे असतो.त्याच्या हातात तिच्या सगळ्या नाड्या असतात.हेच खरे!.
समाप्त
