Sarika Jinturkar

Abstract

4.5  

Sarika Jinturkar

Abstract

कराग्रे वसते मोबाईल

कराग्रे वसते मोबाईल

3 mins
217


मोबाईल फोनचा जन्म झाला आणि जगात मोठी संपर्कक्रांती झाली...  

बघता बघता टेलीफोन जाऊन सर्वांच्या कानाला मोबाइल लागला ..

 इकडच्या-तिकडच्या गप्पा ही आता मेसेज व्हिडिओ कॉल वरून रंगू लागल्या...

 हॅलो हॅलो च्या नादात सगळं नवीन पद्धतीने पुन्हा जुळून आलं ...

 मोबाईल फोनवर तासन-तास बोलता-बोलता आपण मात्र नेमकं काय... 

समोरच्याला काय सांगायचं आणि विचारायचं विसरून जाऊ लागलो...

 हल्लीच्या काळात फार मोठा बदल जाणवू लागला  

अन मोबाईल हा जीव की प्राण झाला..

 कराग्रे वसते लक्ष्मी... जाऊन "कराग्रे वसते मोबाईल " नवीन फंडा जसा चालू झाला...  

कोणत्याही ठिकाणी गेलो तर सगळेच मोबाईल हातात घेऊन नुसतं टुक टुक बघतयं...

व्हाट्सअप आणि फेसबुक यातच सगळं लक्ष असतं

 बोटावर बोट आपटीत मनातल्या मनात हसताय....

 पेन पुस्तक गेले आता फेसबुक ट्विटरचा चाच वाव  

भलतेसलते मोबाईल नको आहे आयफोन कडे आहे धाव... 

 माणूस माणसात बसत नाही..


या मोबाईल मुळे कुणालाच काही सुचत नाही.. मोबाईलची घंटा वाजली की डिस्टर्ब होतं म्हणुन दूरवर निघून जातो आहे... कोणी काही बोललं तर समोरचा जणू मुक्याप्रमाणे बसतो आहे... जेव्हा तेव्हा हातात त्याच्या मोबाईल खुडखुळतांना दिसतोय... ह्या मोबाईल मुळे सगळे झाले आहे व्यस्त... घरात कोण काय बोलत आहे, याकडे करतात सगळेच दुर्लक्ष... सगळेच नॉलेज मिळते ज्यांच्याकडे नेट आहे पण.... भलत्यासलत्या गोष्टीकडे आपले लक्ष सेट आहे... काहीजणांना तर स्मशानभूमीत गेले तरी व्हाट्सअप असतं छळत ...हा असतो त्यांच्याच धुंदीत ते जळणार असतं जळत... असो जे काही आहे...


"कराग्रे वसते मोबाईल" हा विषय अगदी गमतीचा आहे.. आपणच बघितले तर मोबाईल हा आपला जीव की प्राण आहे... पहाटेच्या रम्य सकाळ प्रहारात मंदिरात घंटानाद दिव्य भक्ती वलयात होतो... तसाच रम्य सकाळी मोबाईल खुळखुळतोय... मग काय.....? मोबाईल आणि आम्ही जसे मोबाईल आणि आमचे गेल्या दशकापासून चे नाते आहे... कधी,कसे, कुठे क्षण निघून जातात काहीच कळत नाही... पण ...


  पण माझ्या बाबतीत तसे नाही... माझ्या बाबतीत एक संकल्प मी रोज पाळला... पाळतच आहे... पहाट होताच मोबाईल हातात न घेतात विधीपूर्वक परमेश्वरा सोबत संवाद मी साधते... भजन पूजन करून परमेश्वराचे नामस्मरण केल्यावर स्वयंपाक घरात प्रवेश मी करते... माझ्या कुटुंबातील व्यक्तीला हवं-नको ते विचारल्यावर पटापट काम आटोपल्यावर मगच मोबाईल हाती घेते...


पण कधीतरी आपुलकीच्या, प्रेमाच्या, जवळच्या व्यक्तीला शुभेच्छा द्यायच्या असल्या तर सकाळीच शुभेच्छा देऊन मोकळी होते कारण स्वतःसाठी तर सगळे जगतात थोडं निःस्वार्थपणे दुसर्यासाठी जगता आलं पाहिजे याचं भान पण मी ठेवते.. कधी मेसेज तर कधी फोन कॉल करून संवाद साधते..सणासुदीला एक सेल्फी तरी घरंच्यासोबत काढते.... नात्यातले ॠणानुबंद मोबाईलच्या माध्यमांतून हळुवार जपण्याचा मी प्रयत्न करते....

 म्हणतात ना गृहिणी वाटतो मामुली शब्द पण याचा अर्थ खूप गेहरा आहे... सगळ गृह जिच ऋणी आहे ती आहे गृहिणी... दैनंदिन जीवनात संसार करत असताना होतच असं काही... म्हणूनच घरातील कामाला पहिले महत्त्व देऊन वेळ मिळाला की म्हटल्यापेक्षा वेळ काढूनच माझे मी छंद जोपासते... मोबाईलच्या माध्यमातून थोडं व्हाट्सअप मध्ये डोकावते...


आज काय नवीन विशेष? म्हणून थोडावेळ का होईना त्यात रमून जाते पण भान ठेवूनच.... कारण पाहता-पाहता काम आवरले की लगेच सायंकाळच्या स्वयंपाकाची वेळ होते... एकदा स्वयंपाक करायला लागले, कोणाला काय हवं नको ते विचारलं सगळे व्यवस्थित रित्या केले,आवरसावर केली की.... जीवात जीव आला यासारख थोडं फील होते....काम आटोपल... सांयकाळच दर्शन पूजन झालं की.... मग असतोच थोडा वेळ...काही काम करायचे राहिले का? आठवूण राहले असेल तर ते काम पूर्ण करून..


स्वतःसाठी पण थोडा वेळ काढून हृदयातलं प्रत्येक पान उलगडून पाहते... कधी लिखाण तर कधी काव्य जास्तच वेळ मिळाला तर पेन्सिलस्केच, गाणी भजन लिहिण्याचा, निसर्गरम्य वातावरण असले की आल्हाददायक सुख मिळवून... आपल्या डायरीत उतरवण्याचा प्रयत्न करते... अशाप्रकारे "कराग्रे वसते मोबाईल" असला तरी जबाबदारीपूर्वक मी हाताळते....कारण किती ही म्हटल तरी मोबाईलच सुखं गवताच्या इवलाश्या पानावर पडलेल्या दवबिंदू सारखं... सारासार सांगणाऱ्या उमलत्या कळीसारख...

 क्षणिकच तर असतं ना...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract