Author Sangieta Devkar

Abstract Drama Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Tragedy

कलावंतीण नंदा (भाग 2)

कलावंतीण नंदा (भाग 2)

2 mins
206


साहेब,त्या वाड्यात कलावंतीण च भूत राहते,नका जावू तिकडे,तिथे जाणारा माणूस परत आलाच नाही.ती कलावंतीण नंदा कोणाला जिवंत सोडत नाही.


अहो,काका ही अफवा पण असू शकते.आजच्या जमान्यात अशा गोष्टी कुठे घडतात काय ? संग्राम चहा घेत म्हणाला.

साहेब,तुम्ही शिकली सवरली माणस,तुम्हाला नाही हे पटणार पण हे खर आहे,त्या वाड्यात भूत आहे,ज्यांना ती दिसली त्यांना तिने जिवंत नाही सोडले.

बघू,मी जावून बघतो खर खोट काय ते.संग्राम ने मग चहा चे पैसे दिले आणि निघाला.


संग्राम निमगावात आला.एक दोघांना वाड्याचा पत्ता विचारला.सगळ्यांनी त्याला तिथे न जाणयाचा सल्ला दिला.संग्राम ने एक बऱ्या पैकी गावातले लॉज बघितले आणि तिथे थांबला.

एक दिवस पूर्ण गावात फिरून त्याने वाड्याची माहिती गोळा केली.गाव वाल्यांना अमावस्येला तो वाड्यात जाणार अस सांगितले.लोकांना वाटले की हा मूर्ख माणूस आहे,समोर आपला मृत्यू दिसत असताना हा बाबा खुशाल वाड्यात जाणार बोलत आहे.

दुसऱ्या दिवशी अमावस्या होती.रात्री अकरा नंतर वाड्यातून घुंगरू आणि तबल्याचा आवाज सुरू होतो अस गाव वाले म्हणाले होते.म्हणून मग संग्राम अकरा च्या अगोदर त्या वाड्यात शिरला, सोबत त्याचा फोन आणि कॅमेरा ही होता.संग्राम वाड्यात जाणार ही बातमी गाव भर झाली होती,त्या मुळे सगळा गाव वाड्या बाहेर येवून थांबला होता.


संग्राम वाड्यात गेला.जुने दार कर कर आवाज करत उघडले.आत काळा मिट्ट अंधार होता.संग्राम कडे टॉर्च होती.ती चालू करून तो पुढे पुढे चालला होता. मेन दारातून तो आत आला,समोर एक मोठा दिवाणखाना होता.तिथे काही खुर्च्या आणि बसायला गादया होत्या.आजूबाजूला नक्षी काम केलेल्या पुरातन वस्तू,काही ऐतिहासिक वस्तू ही होत्या भिंती वर बंदूक,तलवार लटकलेली होती.त्या हॉल मध्ये सगळा नृत्य सादरी करणा चा दरबार भरला होता.पण आत एक चिट पाखरू पण नव्हते.संग्राम ने टॉर्च च्या उजेडात काही फोटो क्लिक केले.

तो सगळी कडे फिरून फोटो घेत होता आणि अचानक त्याला छूम छूम असा घुंगराचा आवाज ऐकू आला.त्याने पुन्हा एकदा कान देवून नीट ऐकले.छूम छूम ...आणि त्या पाठोपाठ एक स्त्रीचा हसण्याचा आवाज आला.त्या नीरव भयाण शांततेत तिचा आवाज मोठा वाटत होता.

कोण आहे इथे? समोर या..संग्राम म्हणाला.

मी कोण...आणि तुझ्या समोर येवू..अस बोलून ती स्त्री जोरात हासू लागली.

मला बघायचे आहे तुला,कोण आहेस तू? आणि इथे काय करतेस? गाव वाल्यांना वाटते की तू भूत आहेस.

हाहाहाहा ..मी भुतच आहे.. म्या कलावंतीण नंदा.. तमास गिरीन.तू इथ येवून चूक केलीस.आता तू जिवंत बाहेर नाही जावू शकणार.

तू कोण आहेस समोर ये,मी कोणालाच भीत नाही.मला ऐकायची आहे तुझी कहाणी.संग्राम म्हणाला.

माझी कहाणी,..ऐकून तू काय करणार.

ती मी जगा समोर आणीन.तुला काही मदत पाहिजे ती पण करीन.

नंदा ला आश्चर्य वाटले,आज पहिल्यांदा कोणी तरी वाड्यात आलेला जो तीच म्हणण ऐकायला तयार होता.

अचानक जोरात वीज चमकली, वारे सुटले..एक मोठा प्रकाश झोत त्या दिवाणखाण्यात पसरला..संग्राम चे डोळे दिपले,आणि समोर दिसली त्याला एक मूर्तिमंत सौंदर्याची अप्सरा... कलावंतीण नंदा!


क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract