Girish S

Abstract Drama

3  

Girish S

Abstract Drama

किमयागार - भाग १३

किमयागार - भाग १३

1 min
207


माणसे काही वेळा इतके विचित्र बोलतात ना !. त्यापेक्षा मेंढ्याबरोबर राहणे बरे , त्या बोलत तरी नाहीत, किंवा एकटेच पुस्तक‌ वाचलेले बरे. पुस्तकं पण अविश्वसनिय गोष्टी सांगतात पण आपण वाचले तरचं ना. माणसाशी बोलताना तो विचित्र बोलू लागला तर संभाषण कसे चालू ठेवावे कळतचं नाही. माझे नाव मेल्विजेदक. राजा म्हणाला.

त्याने विचारले 

 तुझ्याकडे किती मेंढ्या आहेत ?

 " भरपूर आहेत" मुलाने उत्तर दिले. हा आता आपली माहिती काढतोय मुलाच्या मनात आले. म्हातारा म्हणाला, तुझ्याकडे भरपूर मेंढ्या आहेत असे तुला वाटत असेल तर प्रश्नचं आहे की मी तुला कशी मदत करणार. आता मुलगा वैतागला, तो काही मदत मागायला गेला नव्हता म्हाताऱ्यानेच वाईन मागण्याचे निमित्त काढून संभाषण सुरू केले होते. g

'माझे पुस्तक द्या, मला मेढ्यांना घेऊन निघायचे आहे ' मुलगा म्हणाला. तुझ्या मेंढ्यांचा दहावा हिस्सा मला दिलास तर मी तुला खजिना कसा सापडेल ते सांगेन म्हातारा म्हणाला. मुलाला स्वप्न आठवले आणि त्याला वाटले की म्हातारीने फी घेतली नव्हती आणि हा म्हातारा कदाचित तिचा नवरा असेल आणि जी गोष्ट अस्तित्वात नाही अशा गोष्टींची माहिती देण्यासाठी पैसे काढायला बघतोय. हा म्हातारा जिप्सीच असणार.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract