STORYMIRROR

Girish S

Abstract Drama Classics

2  

Girish S

Abstract Drama Classics

किमयागार भाग १८

किमयागार भाग १८

1 min
89

तिकीट खिडकीजवळ असताना त्याला कळपाची आठवण झाली आणि त्याच्या मनात आले आपण मेंढपाळ आहोत तेच बरे आहे. आतापर्यंत तो मेंढपाळाची सर्व कामे शिकला होता. लोकर काढण्याची कला त्याला चांगली अवगत झाली होती. गरोदर मेंढ्याची कशी काळजी घ्यावी हे त्याला समजले होते. मेंढ्यांची लोकर काढणे, लांडग्यांपासून मेंढ्यांचे रक्षण करणे यात तो तरबेज झाला होता. त्याला अंदालुसीआ मधील सर्व कुरणे, मैदाने माहित झाली होती. आणि आपल्या मेंढ्यांची योग्य किंमत करणे त्याला कळू लागले होते. त्याने मित्राच्या तबेल्याकडे लांबच्या रस्त्याने जाण्याचे ठरवले. तो शहरातून जाताना एके ठिकाणी थांबला आणि एका टेकडीवर चढला. तेथून काही अंतरावरील आफ्रिका दिसत होती.

 त्याला कोणी तरी सांगितले होते की " मुर " लोकांनी तेथून येऊन स्पेन काबीज केले होते. तो जिथे बसला होता तेथून सर्व शहर दिसत होते, म्हाताऱ्याबरोबर ज्या चौकात भेट झाली होती तो चौक पण दिसत होता.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract