रामचरितमानस
रामचरितमानस
आई वडिलाना आपल्या मुलाचे बोबडे बोलणे गोड वाटते. पण कुटील विचाराच्या लोकाना ज्यांना दुसऱ्याचे दोष काढणे आवडते ते तर हसतातचं. स्वत: केलेली कविता आपल्याला आवडतेचं पण दुसऱ्यानी लिहीलेलं ऐकून प्रसन्न होणारे लोक कमीच असतात. आपल्या प्रगतीने लोक खुश होतात पण दुसऱ्याच्या प्रगतीने खुश होणारे कमीच असतात.
मला विश्वास आहे की माझे बोलणे ऐकून सज्जन खुश होतील. दुर्जन चेष्टा करतील पण त्यातही माझेच हित होईल.
ज्याना प्रभूंबद्दल प्रेम नाही त्याना ही कथा आवडणार नाही पण ज्याना भगवान विष्णू व महादेवांबद्दल भक्ति आहे त्याना श्रीरामचंद्रांची कथा गोड वाटेल.
मी कवि नाही तसेच रचनेत कुशल नाही आणि बुद्धीमान पण नाही तरी सज्जनलोक ती भक्तिने ऐकतील.
यात श्रीरामांचे नाव आहे जे पवित्र व अमंगळाचे हरण करणारे व कल्याणकारक आहे.भगवान शिव व पार्वतीदेवी या नामाचा जप कंरीत असतात.
मी आदरपूर्वक श्री शिवजीना शिरसा वंदन करून श्रीरामचंद्रजींची कथा सांगतो.
चैत्र महीन्यातील नवमीला जेव्हा
श्रीराम जन्मोत्स्व होतो त्यादिवशी असे
म्हणतात की सारी तिर्थं अयोध्येला जातात.
नाग,पक्षी,मनुष्य, मुनी,देवता येऊन सेवा
करतात. लोक श्रीराम जन्मोत्सव साजरा करतात. श्री शरयु नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करून श्रीरामाचा जप करतात.
ही अयोध्या नगरी सर्वात सुंदर व कल्याणकारी समजून मी कथेची सुरवात करतोय जी ऐकल्यावर काम,मद,दंभ नष्ट होतात.
या कथेचे नाव रामचरितमानस आहे. जी ऐकून मन शांत होते.
मनरुपी हत्ती विषयरुपी अग्नीत जळत आहे तो या रामचरितमानसरुपी सरोवरात पडेल तर
सुखी होईल. हे त्रिदोष , दुःख ,दरिद्रता व कलीयुगातील पापांचा नाश करणारे आहे.
श्री महादेवानी याची रचना करून मनात ठेवले व योग्य वेळ पाहून पार्वतीदेवीना सांगितले.
हे महादेवांच्या ह्रदयात असलेने महादेवानी
प्रसन्नतेने याचे नाव रामचरितमानस ठेवले.
मी ही सुखदायक कथा आपल्याला ऐकवत आहे ती प्रेमपूर्वक ऐकावी.
हे रामचरितमानस जसे आहे, ज्याप्रकारे याची रचना झाली व ज्या हेतूने याचा जगात प्रचार झाला ती सर्व कथा मी श्री उमामहेश्वराचे
स्मरण करून सांगतो.
