Girish S

Abstract Others

3  

Girish S

Abstract Others

किमयागार कथामालीका भाग १९

किमयागार कथामालीका भाग १९

2 mins
15


कुठुन तो म्हातारा आपल्याला भेटला असं त्याच्या मनात आले. तो या शहरात त्याला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ सांगणाऱ्या जिप्सी स्त्रीला भेटण्यासाठी आला होता. जिप्सी किंवा तो म्हातारा या दोघांनाही तो मेंढपाळ आहे याचे काहीच अप्रुप नव्हते. त्या दोघांना कोणत्याही बाबतीत विशेष रस नव्हता आणि ते कशावरही विश्वास ठेवणारे नव्हते. आणि त्यांना मेंढपाळाला त्याच्या मेंढ्यांविषयी किती प्रेम असू शकते याचा अनुभव नव्हता.

तो त्याच्या कळपातील प्रत्येक मेंढीला‌ नीट ओळखत होता. कोणती मेंढी नीट चालु शकत नाही, कोणती दोन महिन्यांत पिल्लाला जन्म देणार आहे आणि कोणती आळशी आहे, कोणती लोकर काढण्यास योग्य आहे व कोणती कापण्यास योग्य आहे हे त्याला चांगले समजत होते. त्याने मेंढ्यांना सोडण्याचे ठरवले तर त्यांना दुःख होईल.

 त्याच्या मनात विचार आला माझ्या समोर आता मेंढ्या व खजिना असे दोन पर्याय आहेत. एक आपल्याला पूर्ण माहिती असलेले क्षेत्र व दुसरे त्याला हवें असलेले मिळण्याचे पण अनिश्चित आहे.

आणि व्यापाऱ्याच्या मुलीचा विचार पण होताच. पण ती काही मेंढ्या इतकी महत्त्वाची नव्हती कारण ती त्याच्यावर अवलंबून नव्हती. आणि ती त्याला विसरली असण्याची पण शक्यता होती. आणि तो कोणत्या दिवशी तिला भेटेल याने तिला काही फरक पडत नव्हता कारण तिच्यासाठी सर्व दिवस सारखेच होते. कारण अशा लोकांना त्यांच्या जीवनात प्रत्येक नवीन दिवशी काही तरी चांगले घडू शकते हेच कळत नाही. 

मी माझ्या आई वडिलांना सोडून आलो, त्यांंना मी ' नसणे ' सवयीचे झाले आहे तसेच मेंढ्यांना मी नसण्याची सवय होईल. त्याच्या मनात आणि काही विचार येत होता इतक्यात त्याच्या चेहऱ्यावर वारा झोंबला. याच वाऱ्याबरोबर मुर लोक आले होते . आणि हे लोक हिंमत करून काही मिळवण्यासाठी इकडे आले होते.  

वारा जसा स्वतंत्र असतो तसे आपणही स्वतंत्र असतो तर त्याच्या मनात आले. त्याला आता त्याच्याशिवाय कुणीच थांबवू शकत नव्हते, 

 ना मेंढ्या ना‌ व्यापाऱ्याची मुलगी ना अंदालुसीआची मैदाने व कुरणे.  

तो त्याच्या भाग्यातील संधी मिळवण्यापासून आता थोडीच पावलं दूर होता. तो त्याचे नशीब आजमावणार होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract