Girish S

Abstract Drama

3  

Girish S

Abstract Drama

किमयागार - भाग १४

किमयागार - भाग १४

2 mins
173


आणि पुढे काही बोलायच्या आतच तो म्हातारा वाकला व काठीने तेथील वाळूवर लिहू लागला. आणि अचानक त्या म्हाताऱ्याच्या छातीवर काही तरी चमकले , त्या प्रकाशाने मुलाचे डोळे दिपले. त्या म्हाताऱ्याने अगदी तरुणाच्या चपळाईने आपल्या कोटाने सर्व झाकून टाकले. मुलाचे डोळे उघडले तेव्हा त्याला वाळूवरील शब्द दिसू लागले. वाळूवर त्याच्या आई वडिलांचे नाव लिहीले होते. त्याच्या विद्यालयाचे नाव होते एवढेंच नव्हे तर त्याला स्वतःलाही माहित नसलेले त्या व्यापाऱ्याच्या मुलीचे नावही होते. आणि अशा काही गोष्टी होत्या ज्या तो आजपर्यंत कोणाजवळ बोलला नव्हता.  

मी सालेमचा राजा आहे असं म्हातारा म्हणाला होता ते त्याला आठवले. "एक राजा माझ्यासारख्या मेंढपाळाशी का बोलेल " त्याने नम्रपणे विचारले , हे विचारताना त्याचा चेहरा गोरामोरा झाला होता. " खूप कारणें आहेत पण मुख्य कारण आहे की तू आपले भाग्य (नियती) शोधण्यात यशस्वी झाला आहेस." मुलाला स्वताचे भाग्य , नियती याबद्दल काही माहीत नव्हते. हे ते असते जे प्रत्येकजण मिळवण्यासाठी झटत असतो. प्रत्येकाला तरुणपणी स्वप्न (भाग्य) काय आहे हे माहीत असते. त्यांच्या त्या काळात सर्व स्पष्ट असते व सहज शक्य वाटत असते. ते स्वप्ने पाहायला घाबरत नाहीत आणि आतुरतेने त्याना जे घडावे असे वाटत असते त्याची वाट पाहत असतात. पण जसा काळ जातो तशी एक अगम्य शक्ति त्याना घेरते व त्याना वाटू लागते की आपले भाग्य प्राप्त करणे अशक्य आहे. म्हातारा बोलत होता ते मुलाला कळत नव्हते पण ही अगम्य रहस्यमय शक्ति म्हणजे काय हे त्याला कळावेसे वाटत होते कारण व्यापाऱ्याच्या मुलीला प्रभावित करण्यासाठी त्याचा त्याला उपयोग होणार होता. ही ताकद जरी नकारात्मक वाटत असली तरी खरेतर तीच आपले स्वतःचे भाग्य दाखवत असते. ती तुमच्या मनात इच्छा तयार करते कारण या जगात एक गोष्ट सत्य आहे की माणूस कोणी ही असो काही ही करत असो पण त्याची काही तरी इच्छा असते आणि ती पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करतो. कारण आपल्या इच्छांचा स्त्रोत विश्वात्मा आहे. ती इच्छाच आपल्या जीवनाची प्रेरणा असते आणि तोच आपल्या जीवनाचा उद्देश असतो. जसे आता तुला प्रवास करायचा आहे, व्यापाऱ्याच्या मुलीशी लग्न करायचे आहे किंवा खजिना शोधायचा आहे. तुला माहित आहे का की लोकांच्या आनंद, दुःख, हेवा, मत्सर यांतून विश्वात्म्याला शक्ति मिळत असते. स्वतःचे भाग्य (नियती) मिळवणे आपला धर्म आहे. आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून करू इच्छिता तेव्हा वैश्विक शक्ति तुम्हाला सहाय्य करते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract