Girish S

Inspirational Others Children

2  

Girish S

Inspirational Others Children

अष्टावक्र गीता

अष्टावक्र गीता

1 min
61


अष्टावक्र गीता - सुरुवात

अष्टावक्र गीता ही राजा जनक व अष्टावक्र ऋषी यांच्यातील संवाद आहे. जेव्हा राजानी अष्टावक्र ऋषींना पाहिले तेंव्हा ऋषींचे शरिर आठ ठिकाणी वक्र असलेने राजाच्या मनात विचार आला की किती कुरूप मनुष्य आहे हा. तेव्हा त्यांनी आत्मज्ञानाने राजाच्या मनातील भावना ओळखून त्याला सांगितले की हे राजा ! जसे मंदिर तिरके असले तरी आकाश तिरके होत नाही , मंदिर गोल अथवा लांब असल्याने आकाश गोल अथवा लांब होत नाही, कारण आकाशाचा व मंदिराचा कांहीही संबंध नाही. आकाशाला अवयव नाहीत पण शरिराला अवयव आहेत. आत्मा नित्य असून शरिर अनित्य आहे. शरिर वक्र असू शकते पण आत्मा नाही. ज्ञानी माणसाची दृष्टि आत्मदृष्टि असते व अज्ञानी माणसाची चर्मदृष्टि असते. तूं माझ्याकडे आत्मदृष्टिने पाहशिल तर तुझ्या मनातील घृणा नष्ट होईल.

ऋषींचे हे बोलणे ऐकून राजाच्या मनात आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा झाली व त्यानी ऋषींना प्रार्थना केली की आपण माझ्या कडे यावे व माझ्या मनातील संशय दूर करून आत्मदृष्टि निर्माण करावी. त्याप्रमाणे ऋषी राजाकडे आले राजानी त्यांना एका सिंहासनावर बसविले व प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. या प्रश्नोत्तरातुन अज्ञानाचे निराकरण व ज्ञानाचा उगम झाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational