किमयागार - भाग १५
किमयागार - भाग १५
थोडा वेळ दोघेही शांत बसले. नंतर म्हाताऱ्याने विचारले तू मेंढपाळ कां झालास?.
"मला प्रवास करायला आवडतो ". म्हाताऱ्याने चौकातील एका बेकरीत उभ्या असलेल्या माणसाकडे बोट दाखवले व म्हणाला तो लहान असताना त्याला पण प्रवास आवडत असे. पण त्याने ठरवले की बेकरी काढू व पैसे जमा करू. तो जेव्हा म्हातारा होईल तेव्हा तो आफ्रिकेत एक महिना राहिल. त्याच्या हे कधी लक्षात आले नाही की माणूस त्याला हवे ते करण्यासाठी, आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणत्याही वेळी समर्थ असतो. मुलगा म्हणाला त्याने मेंढपाळ व्हायला पाहिजे होते. हां, त्याने तसा विचार केला होता पण मेंढपाळापेक्षा बेकरीवाल्याला मान असतो त्याचे घर असते, मेंढपाळाना उघड्यावर झोपायला लागते. वडिलधारी माणसे मेंढपाळा पेक्षा बेकरीवाला जावयी म्हणून अधिक पसंत करतात. मुलाच्या मनात व्यापाऱ्याच्या मुलीचा विचार आला. तिच्या गावात पण बेकरीवाला असेल. त्याच्या ह्रदयात कळ आली. म्हातारा पुढे बोलू लागला. त्याच्या दैवात काय आहे यापेक्षा लोक मेंढपाळ व बेकरीवाला यांच्या बद्दल काय विचार करतात हेचं त्याना महत्त्वाचे वाटते. म्हातारा पुस्तकाची पाने पलटत ज्या पानावर पोचला होता ते वाचू लागला. मुलाने त्याला थांबवत विचारले, ' हे सर्व तुम्ही मला कां सांगता आहात ?. " कारण तू तुझी नियती (भाग्य) समजण्याचा प्रयत्न करतोयस आणि तू अशा वळणावर आहेस की तू कदाचित हे सगळे सोडून देणार आहेस."
