Girish S

Abstract Inspirational

2  

Girish S

Abstract Inspirational

भगवद्गीता ७

भगवद्गीता ७

3 mins
37


श्री भगवान म्हणाले पार्था ! माझ्या आश्रयाने मन माझ्यापाशी ठेवून संशय सोडून मी तुला सांगत असलेला पूर्ण योग ऐक. तुला आत्मज्ञान व प्रपंच पूर्णपणे सांगतो. हे तुला एकदा समजलं की तुला अन्य समजण्यासारखे कांही राहणार नाही. सिद्धि मिळवण्यासाठी हजारातून एखादाच प्रयत्न करतो त्यातून एखादाच मला यथार्थाने जाणतो. धरा, जल, अग्नि, वायु, नभ, मन ,बुद्धी आणि अहंकार अशी ८ रूपांची माझी प्रकृती आहे. तिला अपरा म्हणावे. आणि दुसरी परा प्रकृती आहे ती या जगाला धारण करते व तीच जीव भूत चैतन्य आहे. या दोन्हीपासून सर्व प्राणी व जग उत्पन्न झाले आहे. मीच सर्व जगाचा आदि आणि अंत आहे. हे धनंजया, माझ्याहून अन्य काही नाही. जसे दोऱ्या मध्ये मणी ओवले जातात तसे सर्वकाही माझ्यात गुंफले आहे.

 ( जसे सोन्याचे मणी करून सोन्याच्या दोऱ्यात ओवले जातात तसे मी हे जग उभारले आहे.). 

हे कौंतेया पाण्यातील रस मी आहे व चंद्र सूर्यातील प्रकाश पण मी आहे. ॐ पण मी व पौरुष तत्व पण मी. गगनातील शब्द पण मी. पृथ्वीचा मृद्गंध (सुवास) मी. अग्नीतील तेज मी. समस्त प्राणिमात्रांचे जीवन, तपस्वी लोकांचे तप सुद्धा मी. भूत मात्रांचे शाश्व़त बीज,बुद्धिमानांची बुद्धि मीच. बलवानांचे आसक्ती कामना विरहित बल आहे व सर्वामध्ये असलेला धर्माला व शास्त्राला अनुकूल असलेला काम आहे. 

सत्व गुण, रजोगुण व तमोगुण यांची निर्मिती मीच करतो. ते जरी माझ्यात असले तरी मी त्यांच्यात नाही (त्रिगुण) असे जाण. 

त्रिगुणांच्या मायेने मोहित आहे हे सर्व जग. पण अविकारी व गुणातीत अशा मला मात्र हे जग जाणत नाही. माझी ही त्रिगुणी माया तरुन जाणे दुष्कर आहे.

 मला जे शरण येतात त्यांना मात्र ती सुकर. ज्यांचे ज्ञान मायेने नष्ट झाले आहे असे आसुरी प्रवृत्तीचे मूर्ख, दुष्ट अधम मला शरण येत नाहीत. माझी भक्ति करणारे ४ प्रवृत्तींचे असतात. १ज्ञानी २ लाभेच्छू, ३ जिज्ञासू, ४ दुःखात्मे.  ज्ञानी एकचित्त होऊन एकरूप होऊन माझी भक्ति करतात व त्यांना मी प्रिय असल्याने ते पण मला प्रिय आहेत. 

मी आणि ज्ञानी एक होतो व त्याला भक्तीमुळे श्रेष्ठ गती मिळते. ज्ञानी मला शरण येतो. इतर जे असतात त्यांचे ज्ञान कामनांमुळे हरपलेले असते. ते अन्य देवतांची पूजा करतात. ते निरनिराळ्या देवतांची भक्ति करतात त्या देवांपाशी त्यांची श्रद्धा मीच स्थिरावतो. ते देवतांचे पूजन करतात व त्या अल्पबुद्धी लोकांना त्याचे फळ मिळते पण ते नाशिवंत. जे मुढ असतात ते अव्यक्त अशा मला व्यक्त मानतात. अविनाशी सर्वोत्तम असे माझे जे रूप आहे ते त्यांना समजत नाही. माझा न जन्म झालाय न माझा नाश होतो.

मी सर्व झालेल्या,असलेल्या, प्राणिजनांना घटना ना तसेच पुढे होणाऱ्या घटना पण जाणतो. पण मला कुणीच जाणत नाही. इच्छा, द्वेषातुन सुख दुःखाचे द्वंद्व निर्माण होते. हे अर्जुना सर्व जण जन्मतः च त्या मोहात अडकतात. ज्यांनी पुण्य कर्म केलेली असतात अशा माझ्या भक्तांची पापे संपतात, व या मोह द्वंद्वातुन ते मुक्त होतात. माझी भक्ति करणारे लोक मोक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. त्याना ब्रह्ममयतेची प्राप्ती झालेली असते व त्याना अध्यात्माचे पुर्ण ज्ञान झालेले असते. वार्धक्यामधे मृत्यू जवळ आला असता लोकांना भीती वाटते पण माझ्या भक्ताना ज्ञान झालेले असते व द्वैत राहत नाही. माझी भक्ति करणाऱ्यांच्या मनात मृत्यू चे भय ऊपजत नाही. मृत्यू समयी ते माझ्याशी एकरुप होतात. माझी भक्ति करणारे जे मला सर्वश्रेष्ठ परमेश्व़र मानतात. सर्व भौतिक गोष्टी चे (प्रकटीकरणाचे) नियामक तत्व मानतात. सर्व यज्ञांचा हेतू मानतात. सर्व दैवतांचे दैवत भगवंत म्हणून जाणतात. त्याना मृत्यू समयी भय वाटत नाही व ते खंबीर मनाने मला समजतात व माझ्यात विलीन होतात.

सातवा अध्याय समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract