Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

3  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

कभी किसी रोज (भाग २)

कभी किसी रोज (भाग २)

2 mins
182


अमित आई ची काळजी घे.दोघे व्यवस्थित जा.आणि लवकर परत या.मोहन बोलले.

अमित आई सोबत रिक्षात बसून टुरिस्ट बस स्टेशन कडे निघाला.

सुमिता आणि अमित बस मध्ये बसले.थोड्याच वेळात बस चालू झाली.

आई आपण कोणाला भेटायला जात आहोत? मी तर त्यांना ओळखत पण नाही.

अमित ते माझे नातेवाईक आहेत,प्रसाद नाव त्यांचे ते हॉस्पिटल मध्ये आहेत.

पण मग माझे काय काम तिथे?

अमित सगळ्याच प्रश्नांना उत्तरे नसतात.या वर अमित काहीच बोलला नाही.

संध्याकाळी ते बेंगलोर ला पोहचले.

सुमिता चे माहेर ही इथे होते.अगोदर ते घरी गेले.मग फ्रेश होऊन सिटी हॉस्पिटल कडे आले .

हॉस्पिटल च्या जनरल वॉर्ड मध्ये अनेक पेशंट होते.अमित आई सोबत आत गेला एका बेड जवळ सुमिता थांबली.

प्रसाद,कसे आहात? त्या बेड वर झोपलेल्या माणसाला तिने विचारले.तो माणूस जवळ जवळ अमित च्या वडिलांच्या वया चा वाटत होता.त्याला सलाईन सुरू होते.

सुमिता ,मी आता बरा होणार मी नाही काहीच माहीत नाही.पण तू मला भेटायला आलीस ते खूप बरे झाले.निदान शेवटचं तुला पाहता तरी आले .

प्रसाद अस नका बोलू.तुम्ही लवकर बरे होणार आहात.

प्रसाद ने अमित कडे पाहिले, उंचा पुरा,गोरा,दिसायला आकर्षक अगदी सुमिता सारखा होता.

हा अमित आहे प्रसाद. सुमिता ने त्याला सांगितले.प्रसाद ने डोळे भरून अमित ला पाहून घेतले.

आई मी बाहेर थांबतो तू ये अस बोलून अमित वॉर्ड बाहेर गेला.

सुमिता,बर झाल तू अमित ला सोबत घेवून आलीस,त्याला पाहायची खूप इच्छा होत होती.

हो प्रसाद म्हणूनच घेवून आले निदान एकदा तरी तुम्ही तुमच्या मुलाला बघावे अस मला ही वाटत होते.

तुमचा मुलगा, हे शब्द बाहेर जाता जाता अमित ने ऐकले.तो क्षणभर विचलित झाला.हे आई काय बोलली,तुमचा मुलगा, म्हणजे मी त्या प्रसाद चा मुलगा आहे.मग बाबा माझे कोण लागतात.आणि म्हणून आई मला यांना भेट्वायला घेवून आली.अमित सुन्न पणे वॉर्ड बाहेर उभा राहिला.

थोड्या वेळात सूमिता बाहेर आली,तिचे डोळे भरून आले होते.चल अमित निघुया आपण.

ते दोघे घरी आले.आजची रात्र इथे थांबून सकाळी घरी जायला निघणार होते.

अमित रात्र भर विचार करत राहिला,की मी त्या प्रसाद चा मुलगा आहे, याचा अर्थ आई आणि प्रसाद एकत्र होते?मग त्यांनी लग्न का नाही केले? आणि इतकी मोठी गोष्ट आई ने माझ्या पासून लपवून ठेवली.बाबा तर या बद्दल माहिती असेल का? असेल कदाचित म्हणून तर त्यांनी मला आई सोबत आग्रह करून इथे यायला भाग पाडले.

अमित विचारात हरवला होता.पण त्याला मोहन आपले बाबा आहेत या बद्दल राग ही येत होता.

क्रमशः..


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract