Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

3  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

कभी किसी रोज (भाग 1)

कभी किसी रोज (भाग 1)

2 mins
213


अमित,तू आई सोबत बेंगलोर ला जात आहेस,मोहन म्हणाला.

बाब पण मी का जावू आई सोबत,तुम्ही जा ना.मला कॉलेजचे एक फंक्शन आहे ,मला नाही जमणार.

अमित ,तुला आई सोबत जावे लागेल,एक महत्वाचे काम आहे.अस पण आई एकटी आहे तर तिच्या सोबत जा.

बाबा,आई चे माहेर आहे ते,या आधी खूपदा ती एकटी गेली आहे.मग आता कशाला मी सोबत पाहिजे?

अमित ,मला जास्त या विषया वर बोलायचे नाही,तू जातो आहेस.

बाबा पण काम काय आहे आणि माझं जाणं का महत्वाचं आहे ते तरी सांगा.

अमित आई चे एक नातेवाईक खूप आजारी आहेत,त्यांना भेटायला तुम्ही दोघे जात आहात.

बाबा,पण मी कोणाला ओळखत नाही मग मी का,तुम्ही जा ना.

अमित तू माझ्या सोबत येणार हा माझा हट्ट आहे समज.आता या वर चर्चा नको.आई सुमिता बोलली.

आई पण माझं पण काम आहे इथे.का तू आग्रह करतेस मला.तू जावून ये ना एकटी.

अमित तुझं माझ्या सोबत येणे गरजेचे आहे म्हणून मी बोलत आहे,नाहीतर तुला असा आग्रह कधी केला नसता.

आई पण काम काय,आणि त्या नातेवाईकांना मी ओळखत पण नाही.

अमित,तिथे गेले की तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.प्लीज माझ्या सोबत चल.आजच बॅग भर सकाळी लवकरच आपण बाहेर पडू.

अमित या वर पुन्हा काही बोलला नाही.आईचा चेहराच सांगत होता की काहीतरी सियियस गोष्ट आहे.तिच्या डोळ्यात त्याच्या येण्या साठी आर्जव होते,मग अमित आई सोबत जायला तयार झाला.

अमित तू आलास की आपण तुझी ती बाईक घ्यायला नक्की जावू.बाबा बोलले.

अमित ला आश्चर्य वाटले, काल पर्यंत बाबा या नवीन बाईक साठी तयार नव्हते,मग आज अचानक असे काय घडले की बाबा ती स्पोर्ट्स बाईक घ्यायला तयार झाले? अमित ला प्रश्न पडला.तसे ही लहान पना पासून अमित चे बाबां नी खूप लाड केले होते.एकुलता एक मुलगा म्हणून जीवापाड त्याला जपले ही होते.त्याच्या आनंदात ते नेहमी आपला आनंद शोधत आले होते.आता अमित एकवीस वर्षाचा तरुण होता,पण आज ही बाबा साठी लहान पणीचा त्यांचा हात धरून चालणारा,क्रिकेट खेळणारा,पडला की रडत बाबा कडे धावत येणारा अमू होता.

सकाळी लवकर उठून अमित आवरून तयार झाला, सुमीता ही तयार होती.आपले सामान घेवून दोघे घरा बाहेर पडले .

अमित आई ची काळजी घे.दोघे व्यवस्थित जा.आणि लवकर परत या.मोहन बोलले.

अमित आई सोबत रिक्षात बसून टुरिस्ट बस स्टेशन कडे निघाला.

क्रमशः..



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract