Tukaram Biradar

Abstract

2  

Tukaram Biradar

Abstract

काय आहे माझ्या नशिबात ?

काय आहे माझ्या नशिबात ?

1 min
191


  उद्या काय घडणार आहे याचा विचार करत जमेल तसे भविष्यकाळात डोकावून पहायचे हा प्रत्येकाच्याच स्वभावाचा आवडता भाग. कोणी कबूल करो किंवा ना करो प्रत्येक जण आपल्या भविष्यातील सोनेरी दिवसाची स्वप्ने

पहात असतो. आज आहे त्यापेक्षा अधिक उत्तम जीवनशैली असावी. मान मराठी, पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता असावी. असे स्वप्न नसणारा माणूस विरळाच! येणाऱ्या दिवसामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला लाभतील की नाही? सांगता येत नाही. 

प्रत्येकाच्या जीवनात, मनात लपून बसलेला प्रश्न आहे. आपण सर्वच अगदी हायटेक जमान्यात वावरत आहोत, असलो तरी मोठ्या संख्ययेने तरुणाईला भविष्य पाहणे वगैरे या प्रकारामध्ये जाम इंटरेेस्ट आहे यात शंका नाही. 

  आता एखादी उदा. एक मुुलगा दहावीत तो बोर्डात प्रथम श्रेणीत येईल त्याची स्वत:ची, त्याच्या पालकाची, एवढेच काय तर त्याच्या शिक्षकांंना देखील खात्री होती. मात्र त्याचवेळी एका ज्योतिषाने सांगितले की या मुुलास First Class च्या वर गुण मिळणार नाहीत. आणि इंजीनियरिंग वगैरे करण्यापेक्षा कला शाखेकडे त्याची जास्त भरभराट होईल. योगायोगाने त्याला अगदी तसेच झाले. पुढे एम. ए. करून तो ज्योतिषाने सांगितले त्या प्रमाणे झाले. नंंतर त्याचा त्या ज्योतिषावर अधिक विश्वास बसला. 

   असेच एक त्याला कुुुणीतरी सांगितले की मुुंबईत अमूक हस्तरेखातज्ञ आहे तो फार फेेमस आहे. मात्र तो 5000/- रुपये फिस घेेेतो व अचूक माहिती सांगतो. तो मुलगा मित्राकडून उसनवारी करुन पैसे घेतो व मुंबईला जाऊन देऊन येतो. काही फरक झाला नाही. उलट तो नंतर हातपाय.गाळून बसतो. पैैसे ते पैसे गेले व लाखमोलाचा वेळ ही गेला. नंतर नशिबाला दोष देत बसतो. काय आहे माझ्या नशिबात म्हणून देवाला दोष देेऊ लागतो. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract