मराठी भाषेतील विविधता
मराठी भाषेतील विविधता
इतर प्रमुख भाषेप्रमाणे मराठी ही भाषा विविध पद्धतीने बोलली जाते. मुख्य भाषेशी नाळ कायम तिची उपभाषा दर बारा कोणाला वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. उच्चारात, शब्दसंग्रहात, वाचनात बदल असतो. पण लिखित भाषेत फारसा फरक नसतो.
पिढ्यानपिढ्या एखाद्या राज्यात स्थायिक असल्यामुळे मराठी भाषक यांच्या मुळ मराठी बोलीवर या राज्याचा स्थायिक भाषेचा ठसा स्पष्टपणे उमटलेला दिसून येतो. यामुळे "मी मराठी बोलतो" असे कोणी विधान केले तर कुठली मराठी बोलता असा प्रश्न निर्माण होतो. कारण मुळ भाषेचे व्याकरण जरी एक असले तरी स्थानिक महात्म्यांच्या बोली भाषेनुसार मराठी बोलीचे मराठवाडी, नागपुरी, कोकणी मराठी, कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, असे अनेक प्रकार ऐकिवात येतात. येथील परिसरानूसार मराठवाडी, नागपुरी, चंदगडी, बेळगावी, कोल्हापुरी, कोकणी, वऱ्हाडी, मालवणी, मोरे मराठी, झाडीबोली, तंजावर, बागलाणी, नंदबारी, खालल्यांगी, वाल्यांनी, ताप्तांगु, डोंगरांगी, जामनेरी, असे बोली भाषेचे अनेक प्रकार आहेत. या उपभाषा असल्या तरी यापैकी गोंडी, भिल्ली या पण उपभाषा आहेत. गोंडी भाषा महाराष्ट्रातील प्रामुख्याने आणि मध्य भारतातील मोठ्या विस्तृत पट्टयात बोलली जाते. नागपूर, चंद्रपूर , गडचिरोली, नांदेड व अमरावती या जिल्ह्यात व आंध्र प्रदेश सिमालगट गोंडी भाषा बोलली जाते. भिल्ली भाषा महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यात ही भाषा बोलली जाते. महाराष्ट्रात मराठी भाषेची उपभाषा म्हणून समजली जाते. खानदेशी आणि अहिराणी महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त प्रमाणात बोलली जाणारी बोलीभाषा आहे. मुख्य म्हणजे मराठी भाषेचे आणखी दोन प्रकार पडतात अहिराणी ही भाषा धुळे, जळगांव व नंदुरबार आणि दुसरी म्हणजे बागलाणी ही भाषा नाशिक भागात बोलली जाते.
