STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

2  

Tukaram Biradar

Others

माझे गांव :- बेलसकरगा

माझे गांव :- बेलसकरगा

2 mins
7

   माझ्या गावाचे नाव बेलसकरगा ता उदगीर जिल्हा लातूर आहे. उदगीर पासून अवघे दहा किलोमीटर अंतरावर आहे. गावात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह साठ वर्षापासून आजतागायत चालू आहे. हा सप्ताह सात दिवस सतत असून आठव्या दिवशी किल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद दिला जातो आणि अखंड हरिनाम सप्ताह ची सांगता होते. यात गावात भक्तीमय वातावरण असते. गावातील प्रत्येक जण या सप्ताहात सहभागी होतात. या सप्ताहात दररोज पहाटे काकडा, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथावरिल भजन, सायंकाळी प्रवचन, नंतर हरिपाठ आणि रात्री हरि कीर्तन हा नित्यनेमाने होते. प्रवचन आणि कीर्तन दररोज वेगवेगळ्या ह. भ. प

. महाराजांचे असत. गावातील सर्वजण प्रवचन आणि कीर्तन यांचा लाभ घेतात. 

    गावात दररोज गावपरु म्हणजे संपूर्ण गावातील लोकांना जेवण दिले जाते. सप्ताहाच्या सातव्या दिवशी रात्री भारुडाचा कार्यक्रम आयोजित केले जाते. आणि शेवटच्या दिवशी गावात ज्ञानेश्वरी ची टाळ मृदंगाच्या, ज्ञानोबा - तुकाराम यांच्या गजरात प्रभातफेरी काढली जाते. मोठा उत्सव साजरा केला जातो. गावातील व बाहेर गावचे भाविक भक्त दररोज येथे येऊ प्रवचन आणि भजन कीर्तनाचा लाभ घेतात आणि शेवटी सप्ताहची सांगता करून महाप्रसाद घेऊन जातात. गावातील प्रत्येकाला आनंदी आनंद होतो. सर्वजण दररोज स्नान करून तुळशीला पाणी घालून नैवेद्य दाखवून दर्शन घेऊनच जेवण करीत असतात. गावात एक अध्यात्मिक वातावरण निर्माण होते. यासाठी गावातील प्रत्येक घरुन पैसे जमा केले जातात. अतिथी देवो भव: म्हणून पाहुण्यांचे स्वागत केले जाते. वीना,टाळ- मृदंगाच्या तसेच ज्ञानेश्वर- तुकारामांच्या गजरात संपूर्ण गांव दुमदुमून जाते. सप्ताह संपल्यानंतर प्रत्येकाच्या कानात ज्ञानोबा- तुकाराम यांचा गजर घुमत असतो. 

   आमचे गाव वारकरी संप्रदायाचे आहे गावात प्रत्येकाच्या गळयात तुळशी माळ आहे. सर्वजण पंधरवाडी पासून अगदी सर्वच एकादशी करतात. एकादशी दिवशी हरिजागर आणि कीर्तन असते. 

   असे आमचे गाव या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे तसेच वारकरी संप्रदायाचे गाव म्हणून सर्वदूर परिचित आहे. 


Rate this content
Log in