Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

भुकंपातलं उद्ध्वस्त गांव सावरल

भुकंपातलं उद्ध्वस्त गांव सावरल

2 mins
203


30 सप्टेंबर 1993 वार गुरुवारची काळ पहाट आठवली की मृत्यू चे तांडव अजूनही डोळयासमोर उभे राहते. निसर्गाने मानवावर केलेली ती मात होती. 

   गाव किल्लारी वाडी ता. औसा जिल्हा लातूर. किल्लारी पासून जवळच असलेले हे गाव आहे. भूकंपाचा केंद्र बिंदू गावाच्या उडाला होता. भुकंपात जवळ जवळ गावातील 50./. लोक मृत्यूमुखी पडले होते. त्यावेळेस गावाला धड रस्ताही नव्हता. गुडघ्यापर्यंत चिखल होत होता. त्या चिखलातून जावे लागत असे. त्यामुळे या गावाला मदतही फार उशीरा मिळाली होती. 

    हे गाव सुखा-समाधानाने नांदणारे होते. गावातील सर्व लोक गुण्यागोविंदाने राहत होते. ते एकमेकांना संकटात मदत करत असत. गावातील वडाच्या मोठया झाडावर मुले सूरपारंब्या खेळत असत. तर गावातील मंडळीचे याच ठिकाणी गप्पांचा फड रंगत असत. याच ठिकाणी गावातील बायका वटसावित्रीला आपल्या नवऱ्याच्या जास्त आयुष्यासाठी पूजा करत. त्यांना काय ठाऊक की याच ठिकाणी आपल्या चिता पेटणार आहेत. एका घरातील जवळपास अठरा व्यक्तीना याच ठिकाणी एकाच सरणावर अग्नी देण्यात आला होता. 

    आता मात्र सारे बदललेले आहे. एका संस्थेने हे गाव दत्तक घेतले आहे. त्यांनी या गावातील घरांचे पुनर्वसन केले मात्र इथले सर्व मानसिक पुनर्वसन करु शकले नाही. शासनाने अनेक प्रकारे मदत केली. नवीन गावात अजूनही गुरांच्या निवाऱ्याची सोय होत हनाही. पण नवीन गावात केलेल्या वृक्ष लागवडीमुळे गावच्या सौंदर्यात भर पडली आहे. या गावचे हळूहळू नागरीकरण होत आहे. गावात महिला मंडळ स्थापन झाले आहे. या चांगल्या बाबीबरोबर काही व्यसने गावातील तरुणांना लागत आहेत. एवढे बदल होऊनही ग्यानबा तुकाराम यांच्या गजरात ज्ञानेश्वरी सप्ताह दरवर्षी आनंदात पार पडतो. 

   असे हे गाव आज पण गुण्यागोविंदाने राहत आहेत. 


Rate this content
Log in